Submitted by बेफ़िकीर on 14 July, 2011 - 13:21
एक स्फोट तर झाला आहे
इतक्या भाषा, इतक्या जाती
धर्म हजारो, प्रांत शेकडो
भिन्नतेतली ही समानता
बॉम्ब लावुनी रोज तडफडो
एक स्फोट तर झाला आहे
अमुच्याइथला अमका मेला
तुमच्याइथला तमका गेला
लोक पुन्हा कामाला गेले
देशाने बस निषेध केला
एक स्फोट तर झाला आहे
उद्या पुन्हा पेटेल मुंबई
पुन्हा मला सुचतीलच ओळी
तवा दुखवट्यास मानुनी या
मी अपुली उलटेनच पोळी
एक स्फोट तर झाला आहे
दोष कसा देईन तुला मी
शिखंडीच बनवेन मला मी
खात्री धर दुनिये.... आवडते...
माझ्या मातीलाच गुलामी
एक स्फोट तर झाला आहे
-'बेफिकीर'!
गुलमोहर:
शेअर करा
Good one..
Good one..
मस्त ( रचनेसाठी ) आशय
मस्त ( रचनेसाठी )
आशय प्रत्येकाच्या मनातलाच...
विषण्णता जाणवतेय प्रत्येक
विषण्णता जाणवतेय प्रत्येक ओळीतून
(No subject)
व्वा ! अगदीच वास्तव
व्वा ! अगदीच वास्तव
(No subject)
वास्तव मांडलत......
वास्तव मांडलत......
खूप छान .... तुमची हाफ राईस
खूप छान ....
तुमची हाफ राईस दाल मारके खूप आवडली ...
माझ्या ह्याना सुद्दा खूप आवडली...
आजुन ही परत परत वाचाविशी वाटते...
पु. ले. शु.
खुपच छान बेफिकिर जि खुपच
खुपच छान बेफिकिर जि
खुपच छान
फक्त काहि ....मला हि ह्यास धरुन काहि बोलायचे आहे
एक स्फोट तर झाला आहे....अरे पण एक काय ३ वेळा ..दरवेली तेच होत आहे
काहीनी श्रधांजलि वाहिली ..काहीनी मेणबत्ती पेटवली
काहिनी काला दिवस मानला ..तर काहिनी ...काही वेगलच...
एक स्फोट तर झाला आहे
दिवसामागून दिवस जातील , महिन्यामागुन महीने ......आपण परत आपल्या मुळ पदावर येउन पोहचणार ....सर्व काही विसरून आपलेच सुख पहात बसणार
मग ह्या गोष्टीला एक वर्ष पूर्ण होईल ...परत त्यावर बोलले जाईल...परत श्रधांजलि ,मेणबत्ती,नि काला दिवस असे शब्द कानी पडतील ...
राजकारणी लोक ..ह्यावर दुःख करतील....यातन आपल्याला काही साधता येइल का ...एवढेच ते पाहू बघतील ....
त्यांच्या जख्मेवरच.... आपली राजकरनाची पोळी भाजून घेतील ......दोन दुखाचे भाषण करून आपल्याकडून मत मिलवुन घेतील
काही दिवसानी ह्यावर काही चित्रपट बनतील......त्यावर मग मीडिया आपल TRP वाढवण्याच बघतील
कवी लोक काव्यातून काही शोकांकीता काव्य करतील ....तुमच्या आमच्या सारखे मित्र मंडली त्यावर फ़क्त चर्चा करतील
बाकी काही नाहि झाले
एक स्फोट तर झाला आहे
कलतय का आपल्याला ह्याला आपण काय म्हणु .......
फ़क्त एकच बोलेन मी ........की आपण सर्व षंढ आहोत ......
चेतन र राजगुरु
(स्वछंद टाकाऊ कागद)
बेफि काळ वाचली तेव्हा काय
बेफि
काळ वाचली तेव्हा काय प्रतिसाद देऊ या विच्रात होतो.. आज उकाकांचा प्रतिसाद वाचला.. १०० टक्के सहमत आहे
खरं आहे
खरं आहे
छान.
छान.
खात्री धर दुनिये....
खात्री धर दुनिये.... आवडते...
माझ्या मातीलाच गुलामी>> खरचं अस आहे का???
(No subject)
जबरदस्त.... चालू घडामोडीच्या
जबरदस्त....
चालू घडामोडीच्या कैक धाग्यांना उत्तर म्हणून बेफिजींची ही एकच कविता पुरेशी आहे..!
आशय प्रत्येकाच्या मनातलाच...
आशय प्रत्येकाच्या मनातलाच... >> +१
Very very real and genuine
Very very real and genuine expression
कविता आवडली. लय मस्तच
कविता आवडली. लय मस्तच आहे.
भा(वना) पो(चल्या).
खरोखर मस्त कविता.
खरोखर मस्त कविता.
लई भारी... खात्री धर
लई भारी...
खात्री धर दुनिये.... आवडते...
माझ्या मातीलाच गुलामी>> अगदी भिडणारी ...
चालू घडामोडीच्या कैक धाग्यांना उत्तर म्हणून
बेफिजींची ही एकच कविता पुरेशी आहे..!>>>
छानच
छानच
सत्य परिस्थिती.....
सत्य परिस्थिती.....
छान लिहिल्ये.. एक स्फोट तर
छान लिहिल्ये..
एक स्फोट तर झाला आहे..
जोवर खुर्ची खाली होत नाही
जनता मेल्याने,
काही फरक पडत नाही
निशेधाचं मॅटर तयार आहे
त्यात काय
एक स्फोट तर झाला आहे