Submitted by गजानन on 14 July, 2011 - 02:56
मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातली/देशातली ही परिस्थिती सुधारून असे हल्ले टाळण्यासाठी एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे?
'मी' म्हणजे भारत देशातला एक सामान्य नागरिक.
कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं
या व्यतिरिक्त.
मला प्रामाणिकपणे हे जाणून घ्यायचे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक नागरिक म्हणून तुमच्या मते
एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे? > अगदी. मलाही हाच प्रश्न पडला आहे. `होमगार्ड' हे यासाठी असतं का ?
मी काय करणार? रंग दे बसंती
मी काय करणार?
रंग दे बसंती आणि वेंसडे फक्त सिनेमातच. मी मतपेटीत योग्य त्या उमेदवारास मत टाकूनही नंतर या बेरजेच्या राजकारणात कोण सत्तेवर येईल याचा भरवसा नाही.
आत्ता राज्य आणि केंद्रशासन एकमेकांवर ब्लेम टाकतील, मुंबईस्पिरीटचे गोडवे गातील आणि परत जैसे थे.
खरं तर खराखुरा जनाभियोग होऊन अकार्यक्षम मूर्ख उमेदवारांना कॉलबॅक करायची सोय पाहिजे होती.
जितके दिवस मुंबईत राहात होतो तितके दिवस अशा प्रत्येक बाँबस्फोटातल्या, आपत्तित सापडलेल्या लोकांची सरकारी इस्पितळात सेवा केलीय.
दुसरं मी हे करू शकते-
१. कोणतीही मालमत्ता भाड्याने देताना भाडेकरूची चवकशी करणे.
२. आजूबाजूला कुणी संशयास्पद व्यक्ती ,घटना दिसल्यास पोलिसांना कळवणे.
सार्कॅस्टिकली बोलायचं तर मुंबई फार काय हा देशच सोडुन अतिरेक्यांना न घाबरणार्या आणि प्रतिकार करण्याची क्षमता बाळगणार्या, किमान हातात आलेल्या अतिरेक्याला फेअर ट्रायलच्या नावाखाली पाहूणचार न करणार्या एखाद्या देशात रहायला जाणे.
कविता करणं ललित/लेख
कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं
गजानन
वरील उपायांबाबत तुमचं मत काय आहे ?
पुढे बोलूच आपण
केवळ या उपायांनी दहशतवादी
केवळ या उपायांनी दहशतवादी हल्ले थांबत नाहीत, असं माझं मत आहे.
गजानन मी बराच वेळ विचार केला
गजानन मी बराच वेळ विचार केला की काय लिहू शकते मी इथे आणि मला लाज वाटतेय सांगायला की खरंच मी असा सक्रिय विचार कधी केला नाही की 'मी काय करु शकते नक्की?'
प्रामाणिक, सतर्क नागरिक म्हणून मी माझी कर्तव्य खरंच पूर्णपणे पार पाडत आहे का? की मला काय त्याचं? मला वेळ नाही. माझा थेट संबंध नाही, मी काहीच करु शकत नाही अशी वेगवेगळी कारणं नकळत स्वतःला देत राहीले?
बसमधे माझ्या शेजारचा माणूस जर त्याची बॅग सोडून गेला तर मी नक्कीच सावधपणे त्याला हाक मारते पण यात स्वत्;च्या जीवाची भिती जास्त.
ती नसताना मी काय केलं आहे नक्की? मला उत्तर देता येत नाही कारण ते मी केलेलं नाही.
का नाही मी मेटल डिटेक्टरच्या शेजारी बसून स्टेशनांवर झोपा काढणार्या पोलिसांना खडसावून प्रश्न विचारले? एक जबाददार नागरिक म्हणून मला ते विचारता आले असते, तसा हक्कही आहे मला.
खूप कठोरपणे आत्मपरिक्षण करायला लावणारा प्रश्न विचारला आहे तुम्ही. इथल्या पोस्ट्स वाचत राहीन. कदाचित त्यातून काही आत्मबोध घेता येईल. " मी काय करु शकते?" हे कळेल.
इतरत्र दिलेला प्रतिसादच इथे
इतरत्र दिलेला प्रतिसादच इथे पुन्हा टंकतोय...
घटना घडल्याबरोबर सामान्य माणूस इतकच करू शकतो. त्या वेळी विचारांपेक्षा विकारच मनाचा ताबा घेत असतात. साधकबाधक विचारांसाठी काळ जाणं आवश्यक असतं.
पण सरकारी खात्यांबाबत मात्र लोहा गरम होता है तभी हथोडा मारना पडता है.. कारण प्रकरण थंड झालं कि सुस्ती येते असा अनुभव आहे.
शर्मिलाला अनुमोदन. नागरिक
शर्मिलाला अनुमोदन. नागरिक म्हणून स्वतःला शून्य मार्क्स दिले जीडी तुझा प्रश्न वाचून.
१. सतत इतरांनी काहीतरी करावं,
१. सतत इतरांनी काहीतरी करावं, ही अपेक्षा करणं थांबवणं
२. एक जबाबदार नागरीक म्हणून आपली सगळी कर्तव्यं पार पाडणं. गरज पडल्यास नगरसेवक, आमदार, खासदार यांना जाब विचारणं. त्यासाठी दबावगट स्थापन करणं.
३. प्रत्येक गोष्टीचा संबंध जातीशी, धर्माशी लावणं थांबवणं.
४. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपण भ्रष्टाचार करणार नाही, याची काळजी घेणं. सर्व कायदे पाळणं. आपण भ्रष्ट आहोत. म्हणून आपले पोलिस, सरकारी अधिकारी, नेतेही भ्रष्ट आहेत, कारण ते आपल्यातलेच आहेत. सुरुवात आपल्यापासून केल्यास 'इतरांनीही' काहीतरी करावे, असं आपल्याला न संकोचता म्हणता येईल.
दुर्दैवानं प्रत्येकजण दहशतवादी संपवण्याच्या गोष्टी करतो. दहशतवादी संपवले तरी दहशतवाद संपणार नाही.
घटनांचं विश्लेषण करता यायला
घटनांचं विश्लेषण करता यायला हवं. मध्यंतरी हेडलीने स्टेटमेंट दिलेलं कि त्यांचा भारतातल्या एका लोकप्रिय राजकिय संघटनेच्या प्रमुखाला अमेरिकेत आणण्याचा डाव होता. त्यांच्या प्रतिक्रियेमुळं हेडली वगैरेंचं काम सोप्प होतं असं वृत्तांकन झालेलं आहे. ते अर्थातच तपासून पाहणे गरजेचं आहे.. पण हे जर खरे असेल तर आपण काय प्रतिक्रिया देतो यावर "मी" विचार करणे गरजेचं आहे.
दरवेळी हल्ला झाला की हाच
दरवेळी हल्ला झाला की हाच प्रश्न डोक्यात येतो आणि मला अजून उत्तर मिळालेलं नाही त्यामुळेच अर्थात मी शून्य किंवा मायनस मार्क मिळून नापास आहे.
ह्या बाफवरून मदत मिळावी
गजानन तुमचे बरोबर, तुम्ही
गजानन तुमचे बरोबर,
तुम्ही पश्न दिलेत, त्याचे उत्तरही काही अंशी तुमच्या जवळ असेलच.
पण मला वाटते. जेव्हा लढाई सुरु होते, तेव्हा प्रत्येक जण सोपवुन दिलेले कर्तव्य पार पाडते. ज्याला जे शस्त्र चालवता येते ते तो करतो. तसेच येथे ही आपण ही
कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं
मिळेल त्या मार्गाने सरकारलाच घेरण्याचा प्रयत्न करत असतो.
आपला देशात आंदोलने करायला जावे तर सरकार एवढ्या खालच्या स्तराला जात आहे की, त्यात ही कित्येक प्राण गमावतील.
एकटा दुकटा एवढे मोठे आंदोलय उभारणे शक्यच नाही.
आपण रामदेव बाबा, अण्णा यांचे आंदोलन पाहीलेच आहे.
तेव्हा एवढेच पुरे
धन्यवाद !
काय करणार डोंबल.... आपल्या
काय करणार डोंबल.... आपल्या हातात काय आहे? अगदी कितीही ठरवलं की पुढच्या निवडणूकीला एका चांगल्या (?) उमेदवाराला निवडून द्यायचं, तरी सुद्धा ते आपल्या हातात आहे का? अमेरिकेत ९/११ नंतर काय कमी दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न झाला असेल का? पण त्या घटनेनंतर गेल्या ११ वर्षात अमेरिकेत दहशतवादी कृत्याची कुठलीही मोठी बातमी नाही..... हे ते कशाच्या जोरावर करू शकले? सामान्य नागरिकाच्या बळावर, की योग्य शासनव्यवस्थेमुळे..... काहीही असो, पण भारतात हे शक्य नाही... दर ६-८ महिन्यानी कुठे ना कुठे बाँबस्फोट, दहशतवादी हल्ले आपल्या देशात अगदी निवांत चालू असतात...
हे म्हणजे, दोन लहान मुलांना कंटाळा आला की 'चल ना यार, काहीतरी खेळू' म्हटल्यासारखं दहशतवादी संघटनेतले लोक 'चल यार बोर झालं.. जरा मुंबईत बाँबस्फोट करून येऊ' म्हटल्यासारखं वागतात. आणि यात सामान्य नागरिकाला काही वेळासाठी शॉक बसून परत आपापल्या रूटीन मधे प्रवाहपतित होण्याशिवाय पर्याय आहे का?
फार तर फार, दर वेळप्रमाणे
१. पराकोटीचे धैर्य दाखवणे
२. मदतीचा खारीचा वाटा उचलून समोरच्याला अचंबित करणे
३. नव्याने आयुष्याला सुरूवात करणे
४. स्थितप्रज्ञाची भूमिका चोख बजावणे
५. पुढचा दहशतवादी हल्ला होईपर्यंत आपण नॉर्मल असल्याचे भासवणे, नव्हे तसे आपल्या अंगी बाणवूनच घेणे
६. दरवर्षी निवडणूकीला मतदान न करता, मग भलते उमेदवार निवडून आले की शासनाला यथेच्छ शिव्या घालणे
७. सुरक्षा यंत्रणा, पोलिस यंत्रणा यांच्याशी आपला काडीचाही संबंध नसताना त्यांच्याकडून कार्यक्षमतेच्या अचाट अपेक्षा करणे
एवढे आपण सामान्य नागरिक म्हणून नक्की, अगदी नक्कीच करू शकतो.
चिनूक्सच्या मुद्दा क्र. ३ आणि
चिनूक्सच्या मुद्दा क्र. ३ आणि ४ ला जोरदार अनुमोदन.
मी दोनदा मंडई मधे आणि एक्दा
मी दोनदा मंडई मधे आणि एक्दा पार्किंग्च्या जवळ असणारा CCTV कॅमेर्याची दिशा लोकांनी ( भाजीवाला आणि कॉलेजकुमार्-कुमारींचा घोळका) बदलताना पाहिलं आहे. हे लोकं स्वतः दहशदवादी नव्हते पण त्यांच्या ह्या कृतीचे परिणाम फार घातक होउ शकतात ही जाणिवच नव्हती. मी भांडाभांडी केल्यावर मलाच 'काय होतय' , 'रोज रोज काय घाबरायच' इ. ऐकवण्यात आलं. अर्थात मी तिथून निघाल्यावर जो पहिला ट्रॅफिक पोलिस दिसला त्याला हे सांगितलं ( तो लगेच बघतो आणि थँक्यू पण म्हणाला होता
) .
अर्थात ही ४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
आपण केलेल्या अथवा न केलेल्या साध्या कृतीचे परिणाम दूरगामी आणि धक्कादायक होउ शकतात ही जाणिव सगळ्यांना हवी. आणि पोलिस आणि नागरिक यांच्यात सुसूत्रता हवी. फक्त नागरिक किंवा फक्त पोलिस फारसं काही करू शकणार नाहीत.
घराची मी जशी काळजी घेतो तशीच
घराची मी जशी काळजी घेतो तशीच आपण राहत असलेल्या परिसराची घेतली तरी बरेच गुन्हे व्हायच्या आधी उघडकीला येऊ शकतील.
३. प्रत्येक गोष्टीचा संबंध
३. प्रत्येक गोष्टीचा संबंध जातीशी, धर्माशी लावणं थांबवणं.>>> चिनुक्स, मग याचा कशाशी संबंध लावायचा? ह्यालाच म्हणतात गुन्ह्याच्या मुळाकडे दुर्लक्ष करणं... हेच तर काँग्रेस सरकार आजवर करत आलं आहे! आणि बीजेपी सरकारने तर अत्यंत मुर्खपणा केलाय मशीद पाडून... पुढच्या परिणामांची जाणीव आणि ते निस्तरण्याची क्षमता नसेल तर असल्या फालतू कृती करुच नये ना!!!
बरं लोकांनो, मला एक सांगा, भारतातले दहशतवादी हल्ले होण्याचे मुळ कारण काय आहे? काश्मिरचा प्रश्न, हेच ना? पाकिस्तानला हवा असलेला काश्मिरचा भाग आपण त्यांना देऊन का टाकत नाही आहोत? आपली अकार्यक्षमता मान्य करुन त्यांना काश्मिर देऊन टाकावा ना एकदाचा! सगळा प्रश्न निकालात निघेल.
मग चीनलाही असाच अजून कुठला भाग हवा असेल, तर तोही एकदाचा देऊन टाकूया.
अजून कोणत्या राज्यांना आपले राज्य भारतापासून स्वतंत्र झालेले हवे असेल, तर तेही करायला काय हरकत आहे?
विविधतेत एकतेचा अभिमान बाळगणारे आपण, त्या गोष्टीला खरंच काही अर्थ आहे का? याचा विचार करुया.
युरोपात आहेत तसे छोटे छोटे देश सांभाळायला सोपे पडतात... तेंव्हा असेच भारताचे छोटुकले तुकडे करुन त्यांना आपापली प्रगती करायला मोकळे सोडून देऊया. किमान भाषिक अस्मितेचा प्रश्न तरी निकालात निघेल.
मग मात्र ह्या प्रत्येक छोट्या देशातल्या नागरीकाला दुसर्या देशात प्रवेश करण्यासाठी व्हिसा लागायला हवा.
आपापल्या देशाची सुरक्षितता ज्याने त्याने बघावी!
हा विचार कृतीत आणण्यासाठी काही योजना बनवायची असल्यास आणि संघटना स्थापन करायची असल्यास मी त्यात सक्रिय सहभाग देईन... बाकी कुठलाही पर्याय माझ्याच्याने शक्य नाही...
कविता करणं ललित/लेख
कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं हे ही नसे थोडके
सतर्कता दाखवणे हाच एकमेव उपाय
सतर्कता दाखवणे हाच एकमेव उपाय आहे प्राप्त परिस्थितीशी थेट भिडायला असं मला वाटतं... मानसिकता बदलणं, भ्रष्टाचार थांबवणं, या गोष्टी लाँग टर्म आहेत... सध्या, RIGHT NOW, संकटाशी थेट सामना सामान्य नागरिकालाच करायचा आहे. म्हणून कान-डोळे उघडे ठेवून वावरणे हेच बेस्ट!
सतर्कता दाखवा नाहीतर शस्त्र
सतर्कता दाखवा नाहीतर शस्त्र उचला... मुळाशी घाव घालणार नाही, तोवर हे घोंगडं भीजतच राहणार आहे. फुकाच्या चर्चा सगळ्या!
सध्या, RIGHT NOW, संकटाशी थेट
सध्या, RIGHT NOW, संकटाशी थेट सामना सामान्य नागरिकालाच करायचा आहे. म्हणून कान-डोळे उघडे ठेवून वावरणे हेच बेस्ट!>>>>
मूळ प्रश्न जो विचारला आहे तो असा:
असे हल्ले टाळण्यासाठी एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे?>>>
सतर्कतेने (सामान्य नागरिकांच्या) हल्ले कसे टळतील?
सानीला अनुमोदन. फक्त काश्मीर
सानीला अनुमोदन. फक्त काश्मीर दिला की शत्रू अधिक जवळ येईल हे लक्षात ठेवावे.
३. प्रत्येक गोष्टीचा संबंध जातीशी, धर्माशी लावणं थांबवणं.>>
आणि दहशतवाद्यांना लोकल सपोर्ट कुठल्या धर्माकडून मिळतो ते आधी तपासा आणि मग असली बाळबोध किंवा पेड न्युज छाप विधाने करा.
चिनूक्सच्या क्र. २ च्या
चिनूक्सच्या क्र. २ च्या मुद्द्याचा वापर २६ नोव्हेंबरच्या हल्ल्याच्यावेळी जमेल तसा केला होता (स्वतःच्या नाव, पत्ता व फोन नं सकट पत्रं पाठवली होती). नेटवरुन पंतप्रधान कार्यालयाला मेसेज पाठवला होता. फक्त शासन व इतर सिस्टिम्सना तेव्हा नुसता जाब विचारला नव्हता. या वेळी तुमच्या कठोर भूमिकेची आणि कृतीची अत्यंत गरज आहे आणि ही कृती करण्यासाठी आमचा तुम्हाला पुर्ण पाठिंबा आहे अशा टाईपचं काहीतरी म्हटलं होतं, आता नीट शब्द आठवत नाहीत. दहशतवाद्यांचा नगरसेवकांशी डायरेक्ट संबंध नसला तरी ते सिस्टिममधला महत्वाचा दुवा असतात म्हणून, मुलुंडमधलं १ आणि ठाण्यातल्या २ ऑफिसेसमध्ये मी स्वतः गेले होते. नगरसेवक भेटले नाहीत तरी ज्या ग्रेडचे कमिशनर्स भेटू शकत होते त्यांना भेटून आले. अजून जास्त काही मला करता आलं नाही
बाकी ३ आणि ४ साठीही पुर्ण अनुमोदन.
१च्या बाबतीत जेव्हा दुर्घटना घडते तेव्हा माणूस दु:खाच्या भरात फ्रस्ट्रेशन दुसर्यावर काढू शकतो. एरव्ही मात्र स्वतःच सतर्कता किंवा नियम पाळणे बाबतीत शक्य तितकं काटेकोर राहिलं पाहिजेच.
फक्त काश्मीर दिला की शत्रू
फक्त काश्मीर दिला की शत्रू अधिक जवळ येईल हे लक्षात ठेवावे. >>> त्याने काय फरक पडेल? शत्रूशी एकतर चार हात करण्याचे सामर्थ्य कमवायचे, नाहीतर शत्रू जर जास्त बलवान असेल तर त्याने केलेल्या मागण्या मुकाटपणे मान्य करायच्या... अशाने आपण नक्कीच सुरक्षित राहू, शत्रू जवळ असला तरीही!
३. प्रत्येक गोष्टीचा संबंध जातीशी, धर्माशी लावणं थांबवणं.>>
आणि दहशतवाद्यांना लोकल सपोर्ट कुठल्या धर्माकडून मिळतो ते आधी तपासा आणि मग असली बाळबोध किंवा पेड न्युज छाप विधाने करा.>>> प्रचंड अनुमोदन!!!!
आपल्या मातीची प्रवृत्ती अधिक
आपल्या मातीची प्रवृत्ती अधिक शांतताप्रिय व दुर्दैवी प्रकार विस्मरणात टाकणारी आहे.
रस्यावर येणार का गजानन? कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता केवळ 'एक नागरीक' म्हणून रस्त्यावर येऊन शासनाचा व न्यायसंस्थेतील त्रूटींचा निषेध करायचा आणि जनजीवन अॅफेक्ट करायचे. हळूहळू अॅफेक्ट झालेले लोकही सामील होतील. सगळे ठप्प झाल्याशिवाय सरकार दरबार हालणार नाही.
लोकांची 'शाही' हा अर्थच लावत नाही आपण!
मुंबईच्या दहशतवादी
मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातली/देशातली ही परिस्थिती सुधारून असे हल्ले टाळण्यासाठी एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे?
>>मेड इन चायना वस्तू विकत घेणे थांबवणे. माझा एक शेजारी दुसर्या शेजार्ञाला मदत करतो. हा म्हणून मी त्या मदत करणार्या शेजार्याचे घर भरू नये.
कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार न होऊ देणे.
जातपात, धर्म आणि भाषा यावरील राजकारण थांबवणे.
सर्व कायदे काटेकोरपणे समजून घेऊन पाळणे.
हल्ले 'टाळण्यासाठी' यातील एक
हल्ले 'टाळण्यासाठी' यातील एक तरी उपाय आहे का नंदिनी?
=============================================
आज सकाळी आणि काल रात्री मायबोलीवर विचारणा होत होती. सर्व माबोकर सुरक्षित आहेत ना? माबोकरांना माबोवर लिहिताना माबोकरांबद्दल आस्था वाटण्यात गैर काहीच नाही. पण आज पासून पंधरा दिवसांनी हा विषय माबोवरही संपलेला असेल. याचे कारण आपण या गोष्टी विसरण्याकडे अधिक कललेले असतो.
शासन त्याचाच फायदा घेणार!
जातपात, धर्म आणि भाषा यावरील
जातपात, धर्म आणि भाषा यावरील राजकारण थांबवणे. >>> पुन्हा तेच!!! बरं, हे राजकारण कोण करतंय?????
१. घर-भाडेकरूंची, इमारतीत
१. घर-भाडेकरूंची, इमारतीत नवीन रहायला आलेल्या माणसांची व्यवस्थित चौकशी करणे व त्यांना पोलिस चौकीत जाऊन स्वतःची सर्व माहिती तेथील उपलब्ध फॉर्ममध्ये भरण्यास उद्युक्त करणे.
२. भ्रष्टाचारास कडकडून विरोध करणे व स्वतःही कायदे पाळणे. अगदी ट्रॅफिकचा सिग्नल न तोडण्यापासून, ते पोलिसमामाला चहापाणी न देण्यापर्यंत, रांगेत मधेच न घुसण्यापासून ते ब्लॅकने पिक्चरची तिकिटे विकत न घेण्यापर्यंत हजारो गोष्टी आहेत.
३. मतदानाचे वेळी सुयोग्य उमेदवारालाच मत देणे. त्यावेळी तुमच्या भागातून उभ्या असलेल्या एखाद्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास, दाखवलेल्या मालमत्तेपेक्षा अधिक बेनामी मालमत्ता असल्यास त्याबद्दल आवाज उठविणे.
४. सार्वजनिक ठिकाणी दक्षता घेणे. अफवा न पसरविणे. पोलिसांना सहकार्य करणे. काही संशयास्पद वाटल्यास आवश्यक ते दूरध्वनी क्रमांक सोबत बाळगून त्या ठिकाणी लगेच वर्दी देणे.
५. स्वयंसेवी संघटनांशी समन्वय करून आपत्कालीन मदतीसाठी आपले योगदान देणे. पोलिस-मित्र संघटना किंवा पोलिस-नागरिक संघटनांशी संपर्क ठेवून आपत्कालीन परिस्थितीत राबवायचे ड्रिल/ प्रात्यक्षिके लोकांपर्यंत कशी पोचतील हे पाहणे.
६. आपली चिडचिड, खंत, दु:ख, उद्वेग हे विध्वंसक मार्गाने व्यक्त होऊ नयेत व त्यातून जीव व मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी अगोदर स्वतःची काळजी घेणेही आवश्यक आहे.
वरील सर्व मुद्दे वारवांर
वरील सर्व मुद्दे वारवांर लक्षात ठेवून माझ्या देशासाठी मी सदैव सतर्क आणि अपडेटेड राहणे एवढेच मी करेन.
बेफिकीर यांचा 'एक नागरीक' मुद्दा जास्त प्रभावी वाटला आणि पटला सुद्धा.
बाकी १०० किंवा १००० पोस्टींना अनुमोदन, निषेध, आश्वासन देऊन हा बाफ आणि चर्चा बंद होईलच आणि तुमच्या आमच्यातील 'स्पिरीट'चे दिवेही विझतीलच आपोआप.
अकु १,४,५,६ या मुद्यांना
अकु
१,४,५,६ या मुद्यांना अनुमोदन
Pages