मुंबई मध्ये ३ ठिकाणी स्फोट

Submitted by prafullashimpi on 13 July, 2011 - 10:29

मुंबई मध्ये ३ ठिकाणी स्फोट झाल्याची बातमी येतेय.

१० died and around 100 wounded

क्षमस्व घाई घाईत पोस्ट करतोय , क्रुपया अधिक माहिती असल्यास शेअर करा

http://www.ndtv.com/video/live/channel/ndtv24x7

maharashtratimes.indiatimes.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हातावर पोटं आहेत त्यांना २-३ दिवस काम न करता राहून कसं चालेल?>>>
दक्षे सर सलामत तो पगडी पचास. अशीच परीस्थिती राहीली तर एक दिवस जीव जायचा. त्यापेक्षा २-३ दिवस उपाशी मेलेले परवडेल कधीही.

तो जीव कधीही जाऊ शकतो हे गृहित धरूनच बाहेर पडतो रे माणूस कामाला इथे.
बॉम्बस्फोट, अतिरेक्यांचे हल्ले यातून वाचला तर पावसाचं पाणी साठतं त्यात बुडू शकतो....
असं सगळंच.
काश्मिर खोर्‍यातलं स्पिरीट काय असेल ना मग!

ज्या क्षणी सरकार ताब्यात असलेल्या अतिरेक्यांना ताबडतोब फासावर लटकत नाही तोपर्यंत वचक रहाणार नाही. आणि ज्या वेळेला हे घडेल त्यावेळेला तमाम मुंबईकर हा सोहळा शिवजयंती तसेच गणपती उत्सव सारखाच साजरा करेल.

खालचे वाक्य अजून कितीदा लिहावे लागणार देव जाणे !

या स्फोटात मृत झालेल्या व्यक्तिंच्या आत्म्याला शांती लाभो. माझी विनम्र आदरांजली !!

अमोल केळकर

आणि ही मुक्ताफळं वाचा - Angry
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9217532.cms

बाबांनो, काय म्हणायचंय काय नक्की तुम्हाला??
भर गर्दीतले अतिरेकी कसे ओळखायचे अशी यांची अपेक्षा आहे?
चमकदार वाक्यांनी अजून किती काळ पोटं भरणार आहेत?

महागाई, बेकारी, लोक संखेचा भसमासुर, पर प्रन्तियांची घूसखोरी,
भ्रस्ताचारची नविन प्रकरणे, बाबा, आन्ना,
मुंबईतिल जागेच्या कीमती, मुसळधार पाउस, बॉम्बस्फोट....

काय होणार मुंबईचे !

श्रद्धांजली....

हे अतीरेकी पुनः पुनः आम्हाला झोपेतून जागे करायचा प्रयत्न करतात.. पण आम्ही देखिल तितकेच चिवट आहोत, दोन दिवस जागरण करून तिसर्‍या दिवशी पुनः डुलक्या सुरू होतात, चौथ्या दिवशी झोप आवरत नाही आणि मग पाचव्या दिवसा पासून पुनः गुपचूप पाय पसरून पांघरूणात निजायचे अजून एक दिवस जगायला/निजायला.. काय आयुष्य आहे, किडा मुंगी देखिल अधिल कार्यशील असतात!
ठेचायला गेलात तर मुंगी देखिल चावू पहाते.. नशीब तीला तरी गांधीझम चा आजार नसतो.

खरय मुंबई बंदच ठेवा सर्वांनी.. कामावर जाऊच नका.. द्याच लष्कराच्या ताब्यात.. एकदाच काय ती कल्हई करून साफ सूफ करून द्या म्हणावं. त्या सफाईतून सामान्य माणूस शिल्लक राहील, संसदेत मात्र सर्व खुर्च्या रिकाम्या असतील.

आज एका हितचिंतकाचा पार लंडनहून समस आला: Have Faith! मनात म्हटले नो फेथ माय फूट..अशा समस वर रागवयाचं का आभार मानायचे हेही कळत नाही. या खोट्या फेथ नेच घात केलाय..

मुंबईत सर्वात सेफ कोण आहे- कसाब!

श्रद्धांजली. मृत व्यक्तिंच्या परिवाराला देव हा आघात सहन करण्याची शक्ती देवो.

मुंबई स्पिरीटचे गोडवे पुन्हा एकदा गायले जातील. कसले स्पिरीट? दुसरा काही पर्याय आहे का कामाला जाण्याशिवाय? २००६ च्या बाँबस्फोट मालिकेनंतर १२/०७ चा दिवस आठवतो. ११/०७ ला बरीच तंगड्तोड करून घरी पोचावे लागले होते. पार्ले स्टेशनवर गर्दी अशी नव्हतीच त्यातून अंधेरी VT लाईनवर तर काहीच गर्दी नव्हती.. डब्यात बसताना असा काही गोळा आला होता पोटात. किती तरी वेळा जागा बदललेल्याचे आठवत आहे. ऑफीसला जाणे गरजेचे होते आणि बसने प्रवास म्हणजे किमान दिड दोन तासांची खोटी.

आता त्या मूर्ख आबांनी अकलेचे तारे तोडू नयेत ही ईश्वरचरणी प्रार्थना. ईतका निष्क्रीय गृहमंत्री हे राज्याचे दुर्दैव अन काय.. आबांना पाहिलेच की संताप येतो..

पोलिसांचं खबरी लोकांचं नेटवर्क अतिशय मजबूत केलं पाहिजे. मध्यंतरी या विषयाला वाचा फुटली होती. पूर्वीप्रमाणे हे खबरी तितकेसे सक्रीय नाहीयेत. त्यांच्याकरता पोलिसखात्याकडे पुरेसा पैसाही उपलब्ध नाहीये.

नशिबाने, एकदा होरपळून झाल्याने जातीय दंगली उसळत नाहीत.

>>>>नशिबाने, एकदा होरपळून झाल्याने जातीय दंगली उसळत नाहीत.
अनेक वेळा पोळून निघाल्यानंतर आलेलं हे शहाणपण आहे.

असो. देजावू काय म्हणतात ते.. जुलै २००६ मधे हे लिहिलं होते लोकल ट्रेन मधिल बॉंब स्फोटाच्या निमित्ताने.. ५ वर्षांनी चेहेरे बदललेत पण मसुदा तोच आहे: Sad
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/113037.html?1153891301

ह्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तथाकथित काँग्रेसी युवराजांनी मुक्ताफळे उधळली आहेत, काय तर म्हणे असे दहशतवादी हल्ले रोखणे शक्य नाहीये.

बरोबर आहे ना, ह्यांच्यावर कोणीच हल्ला करत नाहीये ना. असे बोलतांना लाज सुद्दा वाटत नाही.

दुसर्या देशांकडे बघा ऊदा. यु एस, यु.के, एकदा हल्ला झाल्यानंतर असा काही बंदोबस्त केलाय की पुन्हा हल्ले करण्याचे प्रयत्न होतच नाहीये, किंबहुना झाले तरी, आधीच हाणुन पाडले जाताहेत.

राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात जास्त प्राधान्य दिले जातेय, पक्षीय राजकारण अश्या वेळेस प्रकर्षाने बाजुला ठेवले जातेय.
त्यांच्याकडुन खरोखर हे तरी शिकले पाहिजे.

ह्यांच्यावर कोणीच हल्ला करत नाहीये ना. >>> याच युवराजाचे वडिल LTTEच्या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते. (टीप : मी काँग्रेसी नाही)

राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात जास्त प्राधान्य दिले जातेय, पक्षीय राजकारण अश्या वेळेस प्रकर्षाने बाजुला ठेवले जातेय. त्यांच्याकडुन खरोखर हे तरी शिकले पाहिजे.
>>> अनुमोदन

ह्यांच्यावर कोणीच हल्ला करत नाहीये ना. >>> याच युवराजाचे वडिल LTTEच्या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते. .....मान्य आहे,
आजी सुद्दा,

पण तरीही ह्यांना अश्या घटनांचे गांभीर्य नाहीये हे मला म्हणायचे होते. असले विधाने करायच्या आधी, आजी आणि वडीलांचे स्मरण तरी करायचे होते, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणलेच पाहिजे का?

>>१५ दिवसांपूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी तशी पूर्वसूचना दिली होती. <<
अहिरराव, या बातमीचा सोर्स काय? केंद्रिय गृहमंत्री म्हणतात या हल्ल्यांचे काहिहि इंटेल गृहखात्याकडे नव्हते...

http://www.mid-day.com/news/2011/jul/140711-no-intelligence-input-on-bla...

जर तेरा तारखेला आधी पण हल्ले झाले होते मग यावेळी जास्त सावाधानता नको का?

गेले चार दिवस पोलिस पब मधे धाडी का टाकत होते, का हे सगळ मुद्दाम करतात, आपल लक्श दुसरीकडे जावा म्हणुन.

वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेमध्ये दहशतवादी हल्ला झालेला नाही. भारतात मात्र सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. हे असे घडण्यामागे तीन प्रमुख कारणे असल्याचे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, बुद्धीजीवींची दहशतवाद्यांना असलेली सहानुभुती आणि शेजारीच असलेला शत्रू देश या तीन कारणांमुळे भारतात वांरवार दहशतवादी हल्ले होत असल्याचे दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त अजय शर्मा यांनी सांगितले.

अमेरिकेत सरकारी खजिन्यावर अतिरिक्त ताण पडला, एखाद्याचा अपमान झाला तरी देखील देशहिताला प्राधान्य दिले जाते. हे करताना काही वेळा सुरक्षा व्यवस्था अतिरेक करते. पण काही दुर्दैवी घटना घडल्या म्हणून सुरक्षा व्यवस्थेत बदल केला जात नाही. नेता असो वा सामान्य व्यक्ती सगळ्यांनाच सुरक्षा यंत्रणांच्या नियमांचे पालन करावे लागते. आपल्या देशाला घातक ठरेल अशा सर्व प्रकारच्या दहशतवादाचा नायनाट करण्याची अफाट इच्छाशक्ती अमेरिकेतील सर्वच राजकीय नेत्यांमध्ये दिसून येते.

याच्या उलट भारत दहशतवाद, भारत-पाक सीमा अशा मुद्द्यांवर सतत आपली भूमिका बदलत असतो. सुरक्षेच्या बाबतीत अनेकदा हयगय किंवा तडजोड केली जाते. स्वतःची प्रतिमा जपण्याच्या नादात भारतातील सत्ताधारी दहशतवाद्यांना त्रास होईल असे वागत नाहीत. केंद्र सरकार सर्व शेजारी देश आपल्याशी कायम मित्रत्वाने वागतील, या आशेने वारंवार मवाळ धोरण स्वीकारते. याचा फायदा दहशतवादी घेतात.

भारतामध्ये शेजारी देशांतून आपल्याकडे होणारे स्थलांतर आणि देशांतर्गत होत असलेले स्थलांतर याचे प्रमाण अफाट आहे. शिवाय देशाची लोकसंख्या आता १२१ कोटी झाली आहे. अशा परिस्थितीत कोण कोठे जाऊन काय करतो ? याकडे लक्ष ठेवणे खूप अवघड आहे.

सर्व सुरक्षा पथकांचे आधुनिकीकरण अतिशय सावकाश होत आहे. देशात सर्वत्र तंत्रज्ञानाचा वापर करणे व्यावहारिकदृष्ट्या परवडणारे नाही. या कारणांमुळे देखील दहशतवादी कारवाया रोखणे कठीण जात असल्याचे अजय शर्मा यांनी सांगितले.

ललितादेवी,

तुमची प्रतिक्रिया वाचली.

>आणि ही मुक्ताफळं वाचा - Angry
>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9217532.cms
...
...
>चमकदार वाक्यांनी अजून किती काळ पोटं भरणार आहेत?

या ठिकाणी मलातरी मुक्ताफळं दिसली नाहीत. आपलं रक्षण आपल्यालाच करावं लागणार. आजचे निधर्मी पोलीस कुचकामी आहेत. इतिहासाची साक्ष पाहता खानाचा दारोगा आणि ब्रिटीश सोजीर एकाच माळेच्या मण्यासारखे खुनी आहेत.

अतिरेकी दिसल्यावर सरळ संपवा म्हणजे काय हे मी सांगत बसत नाही. भेकडकसाब अजूनही आर्थररोड तुरुंगात ऐय्याशी करतोय, एव्हढं सांगितलेलं पुरेसं आहे. अतिरेकी म्हणजे काय ते तुम्हाला चांगलं माहीत आहे. मी सांगायला नको!

असो.

बेफिकीर,

तुमची इथली प्रतिक्रिया वाचली.

१.
>आपली माती मेंगळट आहे हे पुर्वीही सिद्ध झालेले आहे. ब्रिटिशांनी केलेले राज्य, चीनसमोर पत्कर्लेली हार >वगैरे!

१९११ साली बंगालची फाळणी रद्द झाली हे आपण कदाचित ऐकलं असेल. १०० वर्षं झाली त्याला! मेंगळट लोक जिंकले खरे!

चीनचं काय आहे की, जोवर हेंडरसन-ब्रूक्स अहवाल उघड होत नाही, तोवर १९६२ च्या युद्धाविषयी बोलण्यात काही अर्थ नाही.

२.
>आपल्यात क्रांतीकारक निर्माण झालेच तर ते स्थानिक पातळीवर होतात.

हे खरं असेल तर बंगालच्या फाळणीच्या रहितसमयी ब्रिटीश इंडियाची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यामागे काय कारण असेल? वंगभंग चळवळ अचानक देशव्यापी कशी झाली?

३.
>देश इतका अवाढव्य आहे की ज्योत पेटली तरी फोफावत नाही.

सुभाषबाबूंनी पेटवली होती. सिंगापूर ते इंफाळ ही नागरी नेतृत्वाखालची जगातली सर्वात दीर्घपल्ल्याची पायदळी मोहीम आहे. मात्र पेटवणारा खमक्या पाहिजे. सुभाषबाबूंसारखा!

४.
>काश्मीर दिले तरी हे होतच राहणार!

हे मात्र १००% खरंय. म्हणूनच देण्याची भाषा बंद करायला पाहिजे. अर्थात त्याआधी निधर्मी काँग्रेसी सरकारला मोडीत काढावे लागेलच.

सारांश : ज्याला तुम्ही मेंगळटपणा म्हणता तो आपला सार्थ ऐतिहासिक वारसा दडपून टाकल्याने उत्पन्न झाला आहे.

असो.

आता मला काय म्हणायचंय ते पाहूया.

हे स्फोट म्हणजे राज्यकर्ते माजल्याचं लक्षण आहे. याकरिता धर्माधिष्ठित नेतेच हवेत. इथे धर्म म्हणजे कर्तव्य आणि मर्यादा यांचा सुसंगत संगम अपेक्षित आहे. वैदिक परंपरेत (= हिंदू धर्मात) कर्तव्यांचा आणि नीतीचा परिपूर्ण विचार केला आहे.

उदा: कौटिलीय अर्थशास्त्र. म्हणूनच हिंदू धर्माधिष्ठित राज्यप्रणाली आणायला हवी. मात्र त्यासाठी निधर्मी बकवास बंद करायला पाहिजे.

राज्यकर्त्यांवर दबाव टाकायला धर्मपालन करणारी प्रजाच कामी येते. श्रीरामाच्या राज्यात तसे लोक होते. म्हणून ते प्रत्यक्ष श्रीरामावर दबाव टाकू शकले. याचमुळे त्याला सीतेचा त्याग करावा लागला.

हिंदू धर्म म्हणजे काय ते नीट समजावून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणं हे मी माझ्यापुरतं तरी ठरवलं आहे.

-गा.पै.

@गामा पैलवान, सहज केवळ तुम्ही हे लिहिले आहे,म्हणून प्रतीसाद देत आहे.कदाचित हा अस्थानी ठरू शकतो-त्याबद्दल क्षमस्व.

हिंदू धर्म म्हणजे काय ते नीट समजावून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणं हे मी माझ्यापुरतं तरी ठरवलं आहे.

प्रत्येकाने हे करायला हवे,असे माझे मत आहे.

म्हणून ते प्रत्यक्ष श्रीरामावर दबाव टाकू शकले. याचमुळे त्याला सीतेचा त्याग करावा लागला.

इथे मला वाटते की राम हा तत्कालीन समाजव्यवस्थेचा/मनुवादी संस्कृतीचा बळी होता.सीतेचा त्याग,शंबूकाची हत्या -का? तर तो शूद्र होता.आणि वेदपठण करीत होता.त्याकाळी शूद्रांना वेदपठणाचा अधिकार नव्हता.

तेव्हाचे लोक खरोखरच धर्मनिष्ठ असते,तर त्यांनी एका सीतेसारख्या रामाने 'अग्निपरीक्षा' घेऊन आणलेल्या पवित्र राजस्त्रीवर असे घृणास्पद आरोप केले नसते.असो,या विषयी पुन्हा केव्हातरी चर्चा करू.धन्यवाद.

हल्ल्याचा तिव्र निषेध :अरेरे:.

मास्तुरे तसेच बेफिकीर यांच्याशी सहमत.

प्रत्येक हल्ला रोखला जाईल हे शक्य नाही असं म्हटलं तर त्यात काय चुकलं?
खरं तर आहे ते.
--- प्रत्येक हल्ला रोखला जाईल हे शक्य नाही हे मान्य. पण किती हल्ले घडण्याच्या अगोदर रोखलेले आहेत? आजवर अनेक वेळा झालेल्या साखळी स्फोट हल्ल्यात किती अपराध्यांना काय शिक्षा झाली?

डॉक्टर सुनील,

मनुवादी व्यवस्था म्हणजे नक्की काय? मनुने कुठे म्हंटलेय की माझं ऐका म्हणून? रामाला सीतेचा त्याग राजकीय कारणासाठी करावा लागला. निव्वळ संशयावरून त्याने तिला सोडलेली नाही.

त्याचं असं झालं की, आज ना उद्या दशरथ किंवा रामाचं रावणाविरुद्ध युद्ध होणारंच होतं. रामलक्ष्मणांनी त्यांच्या विवाहाच्या अगोदरच विश्वामित्रांच्या यज्ञरक्षणार्थ रावणाच्या हस्तकांचा वध केला होता. रामाच्या वनवासाचं लफडं म्हणजे एक चाल आहे असं रावण समजून चालला होता.

वनवासाची आज्ञा केवळ रामालाच झालेली होती. सीता आपणहून त्याच्यासोबत गेली. ती गेली ते रामाचं रक्षण करायला म्हणूनंच. पंचवटीत येईस्तोवर रामलक्ष्मणांनी अनेक राक्षसांना यमसदनी धाडलं होतं. शिवाय शूर्पणखेचे नाक कान कापण्याची घटना घडली ती वेगळीच.

सीतेला ही राजकीय पार्श्वभूमी पूर्णपणे ठाऊक होती. अशा परिस्थितीत कांचनमृगाचा प्रकार उद्भवला. सीतेने प्रथम सुवर्णमृग पहिला आणि त्याच्या कातड्याच्या चोळीची अभिलाषा रामाकडे दर्शवली. राम म्हणला की सोन्याचं हरीण कोणीही पाहिलं नाही किंवा त्यासंबंधी काहीही ऐकलेलं नाही. हा मायावी प्रकार दिसतो, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं इष्ट. पण तरीही सीतेने रामाला त्याचा पाठलाग करायला उद्युक्त केलं. मग राम गेला. यथावकाश त्या मायावी हरणाने 'धाव लक्ष्मणा' म्हणून किंकाळी फोडली. आणि सीतेने लक्ष्मणाला रामाच्या आज्ञेच्या आणि लक्ष्मणाच्या इच्छेच्या विरुद्ध त्याला रामरक्षणार्थ पाठवलं.

मग रावणाने तिचं अपहरण केलं. उरलेली कथा आपल्याला माहीत असेलंच.

रावणवधानंतर सीतेने अग्निपरीक्षा दिली. तीतून सर्वांना तिच्या स्वच्छ चारित्र्याची खात्री पटली. मात्र वरील पार्श्वभूमी पाहता ती राज्यकर्त्या रामाची निकटवर्तीय म्हणून कितपत योग्य असा प्रश्न अयोध्यावासीयांच्या मनात उद्भवला.

केवळ या शंकेचं निराकरण करावं म्हणून रामाला सीतेचा त्याग करावा लागला. नियतीने सीतामाईंची क्रूरातिक्रूर थट्टा केली आहे. 'कशावरून सीतेने रावणाशी गुप्त संधान बांधलं नसेल?' हा प्रश्न आपल्यासाठी अप्रस्तुत आहे. कारण श्रीरामाशिवाय इतर कोणत्याही पुरुषाचा विचारही तिच्या मनात कधी आला नाही. स्वत: महर्षी वाल्मिकींनी सीताचारित्र्याची साक्ष दिली आहे. मात्र तत्कालीन अयोध्यावासीयांना हे मार्गदर्शन उपलब्ध नव्हतं.

सीतात्यागानंतरही राम दुसरं लग्न करून एकपत्नीव्रत पाळू शकला असता. मात्र त्याने तसं केलं नाही. त्याने तिला शरीराने दूर केलं असलं तरी मनाने कधीच केलं नव्हतं. ना त्याने कधी कोणती दासी ठेवली. त्याच्या या जितेंद्रिय पैलूचा विचार का बरं होत नाही?

असो.

आता शंबुकाकडे वळूया. जन्माने सगळेच शूद्र असतात. संस्काराने त्याचा द्विज होतो. हे संस्कार लहान वयात व्हावे लागतात. तसे झाले नाही तर जाणत्या वयाच्या माणसाला ते स्वत:वर करून घ्यावे लागतात. त्याकरिता अध्यात्मिक साधनेची आवश्यकता असते. तिच्याविना वेदपठण करणं सर्वथैव अनुचित आहे. एखाद्या स्थापत्यविशारदाने (=आर्किटेक्टने) मनमानी करून वास्तूचा आराखडा बनवला तर त्याला जबाबदार धरलं जातंच. मग हाच नियम वेदपठणाच्या बाबतीत का लावू नये? शिवाय वेदवाचन कुणीही करू शकतो. मात्र पठण करण्यासाठी विशिष्ट अभ्यासप्रक्रियेतून पात्रता सिद्ध करणं अत्यावश्यक आहे. आजही परीक्षा घेतल्याविना वेदपठणाचा अधिकार मिळत नाही.

वेद म्हणजे काही सिनेमाची गाणी नाहीत की कोणीही कशीही म्हणावीत!

असो.

आपला प्रतिसाद अजिबात अस्थानी नाही. किंबहुना असे आडवेतिडवे प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतलेलं चांगलं असतं.

आपला नम्र,
-गा.पै.

सर्वात आधी लोकशाही नावाची सध्याच्या मुर्ख लोकांची संस्था मोडित काढा............भारताचे कधी ही कोणत्याही गोष्टी वर एकमत नसते...खाणारे १० तर बोलणारे ११ हजार......... अमेरीका , चीन , फ्रांन्स इत्यादी देशात एकाच व्यक्ती ला अधिकार घेण्याची सुविधा आहे.....नंतर ती संसदे ने मान्य करुन घ्यायची असते......आपल्या कडे साधी सुई निर्माण करण्यासाठी विचार करण्यासाठी सुध्दा ५२६ जणांना विचारावे लागते. त्यावर अंमलबजावणी तर दुरच राहीली.............

नाही तर सरळ लष्कराच्या हातात द्या राज्याची सुरक्षा..

फार झाले ...........रोज रोज च्या गोष्टी........ स्फोट झाल्या वर दुसर्या दिवशी सेम बातमी " मुंबई चे स्पिरिट...उल्लेखनिय......." इत्यादी बातम्या वाचुन संताप होतो......मुंबइ कडे दुसरा पर्याय आहे का....? उद्या जर मुंबई ने काम करणे बंद केले तर या मुंबै वर जगणार्या देशाला परवडेल का........????

लोकांनी शांतता राखावी..अफवांवर विश्वास ठेउ नये...दंगल करण्याचा डाव आहे......असली मुर्खांसारखी समजुतीची वाक्य राजकारणी करतात........... स्फोट झाल्या वर कोणत्या कारणाने दंगल होइल?????????? लोक का म्हणुन करतील.....आणि कोणा विरुध्द करतील......स्फोटात सगळ्याच धर्माचे लोक मरण पावतात.......मग नेमके मुर्खशिरोमणि असलेले राजकारणी लोक मुद्दामुन बोलतात का....?

या देशाला हिटलरशाही , लष्कर शाही..........हे दोनच पर्याय वाचवु शकतात.........

स्वातंत्र्य नावाचे खेळने आता नाही राहीले............असले स्वातंत्र्य घेण्या पेक्षा मी निर्धास्त पणे मुंबई मधे देशा मधे फिरण्यास पसंती देइल..........

@ hitlershahi aani lashkarshane bhartacha pakistan vhayala kitisa vel lagnar? lokshahi ghatana atyant yogya aahe, matr te rabavnare lok chukiche aahet.

lokshahi ghatana atyant yogya aahe, matr te rabavnare lok chukiche aahet.>>>>>>>>>>>>. बरोबर लोक मिळतील अशा भोबड्या आशेवाद वर अजुन किती वर्षे जगणार आहोत.....???????

पुढील २५ वर्षात मुंबई चे काश्मीर होण्यास वेळ लागणार नाही............. आनी काश्मीर चे अफगानीस्तान.......

Pages