तत्वज्ञानाची शिबिरे आणि भाविकांची मानसिकता

Submitted by dr.sunil_ahirrao on 12 July, 2011 - 02:21

तत्वज्ञानाची शिबिरे आणि भाविकांची मानसिकता

सध्या भारतीय तत्वज्ञानाला ग्लामर आलेले आहे.अगदी विदेशातूनही भाविकांचा लोंढा भारतीय तत्वज्ञानाच्या ओढीने वेळ आणि पैसा खर्च करून भारतात येतात आणि इथे चार सहा महिने राहून तत्वज्ञानाचे,संस्कृतीचे,योगाचे वगैरे धडे घेतात.काही प्रसिध्द तत्वज्ञानी लोक विदेशात भारतीय तत्वज्ञानाची शिविरे घेतात.एका अर्थी ही फार चांगली गोष्ट आहे.अर्थात ज्यांना खरोखर तत्वज्ञान म्हणजे काय,हे मनापासून शिकायचं असेल,त्यांच्यासाठी! पाश्च्यात्य संस्कृतीला भारतीय तत्वज्ञानाची भुरळ तशी फार जुनी आहे.आणि ते लोक भारतीय लोकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करताना दिसतात.त्यांची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन ते त्यातून वैज्ञानिक सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात.त्याचा वापर स्वता:च्या आणि इतर लोकांच्या उपयोगासाठी करतात.किंवा स्वता:तील काही विशेष कौशल्यात भर घालतात.

केवळ एक उदाहरण म्हणून सांगतो- मागे डिस्कवरी च्यानेलवर 'डेविड ब्लेन' याचे कार्यक्रम आपण बघितले असतील. हा मनुष्य जादूगार आहे.नाना करामती करतो. तो कधी शेकडो मीटर उंच चबुतऱ्यावर फक्त पाय ठेवण्याइतक्या जागेत तासनतास उभा राहतो.तो बर्फाच्या लादीत स्वता:ला बंदिस्त करून घेतो.मागे एकदा त्याने १८ मिनिटे पाण्याखाली श्वास रोधून काढली.हे त्याला विशिष्ट योग पद्धतीच्या सततच्या अभ्यासामुळे शक्य झाले.कोणत्याही कारणामुळे सामान्यता: ५ ते ७ मिनिटे श्वास रोधला गेल्यास आणि असा रुग्ण वा मनुष्य त्वरित वैद्यकीय मदत मिळून यागायोगाने वाचल्यास तो पुढे जगला तरी त्यास मेंदूस कायमस्वरूपी हानी निर्माण झाल्यामुळे तो जिवंतपणी मरणयातना भोगतो.तो मुकबधीर,वा वेडा होतो.त्याला फिट्स येतात वगैरे पण डेव्हिड ब्लेनला असे काही होत नाही.त्याची तीव्र इच्छाशक्ती,आणि धाडसी वृत्ती त्याचं त्याच्या प्रत्येक साहसात रक्षण करतात.
आता आपण आपल्या भारतीय लोकांचं बघुयात.इथे अनेक चांगली शिविरे भरवली जातात आणि त्याची फी वगैरे अगदी नाममात्र असते उदा. आर्ट ऑफ लिव्हिंग,ह्याप्पी थॉटस्,स्वाध्याय,रामदेवबाबा वगैरे. मी स्वत: ही शिविरे अनुभवली आहेत.थोड्याफार फरकाने सगळीकडे तेच शिकवलं जातं कारण तत्वज्ञानाची मूळ तत्वे कधी बदलत नसतात.तरीही ज्यांना तत्वज्ञानात रुची असेल,त्यांनी जरूर जायला हवं असे मी म्हणेन.याशिवाय इतरही अनेक प्रकारची शिविरे असतात ज्यात बाबा ,बुवा आणि भोंदुगिरी चालते! त्या लोकांची नावे मी सांगत नाही कारण ती आपणास माहित असतीलच. तिथे ज्यांना जायचे त्यांनी अवश्य जावे (आपण जाऊ नका सांगीतले म्हणून कुणी ऐकेल असा माझा विश्वास नाही )तर ते असो.
तर बऱ्याच चांगल्या शिविरांत(इथेही मी आता कुणाचही नाव न घेता सर्वसामान्यपणे बोलत आहे) मी पाहिलं -खूप काही घेण्यासारखं निश्चितपणे असतं !पण इथे जमणारे सारेच लोक(काही सन्माननीय अपवाद वगळून) ते ज्ञान घेण्याच्या लायकीचे असतात का? असा माझा प्रश्न आहे!
माझ्या मते ९०% लोक काही वैयक्तीक हेतू साध्य करण्यासाठी इथे येतात.त्यात विमा एजंट असतात,कुणी खाजगी क्लासेस वाले असतात.कुणाचा काहीतरी व्यवसाय असतो,आणि त्यांना ओळखी निर्माण करून तो वाढवायचा असतो ! कुणी कॉलेजचे विद्यार्थी असतात ते या निमित्ताने आपल्या मित्र मैत्रिणींना भेटायला येतात.,कुणी निव्वळ टाईमपास करण्यासाठी येतात.कुणी नाहीच काही तर एखाद्या अश्या ग्रुपशी नाव जोडलं गेल्यामुळे थोडी प्रतिष्ठा लाभते म्हणून येतात.कुणी आपणास तत्वज्ञानात किती गती आहे हे दाखवण्यासाठी येतात.इथे खरे भाविक फारच थोडे असतात.बहुतांशी लोक आपले क्षुद्र स्वार्थ साधण्यासाठी येतात.हे बऱ्याच लोकांना समजते पण उघडपणे ( कदाचित स्वत:ही तसेच असल्यामुळे ) कुणी काही बोलत नाही.
वर्षानुवर्षे तत्वज्ञानाची शिविरे होत राहतात.बहरत जातात.भाविकांची आणि भुरट्या ,भामट्यांचीही संख्या वाढत जाते.आपले काम साधून झाले की हे लोक हळूच पळ काढतात कारण त्यांना आता अश्या शिबिरांसाठी वेळ नसतो. मात्र त्यांची जागा घेणारे दुसरे धूर्त लोक त्या जागी येतात आणि आधीच्यांची कमतरता भरून काढतात.आणि जगण्याचे हे आधुनिक तत्वज्ञान सर्वत्र झपाट्याने पसरत राहते.त्यात खरी तत्वे आणि भाविक मध्येच कुठेतरी हरवून जातात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वा! फारच छान !! याचा मी अगदी जवळून अनुभव घेतला आहे. धार्मिकता हे एक ढोंग आहे. आज मी किती धार्मिक आहे हे दाखविण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. देव दर्शनात नाही तर आचरणात असला पाहिजे. हा सगळा प्रकार मल्टी लेवेल मार्केटिंग चा वाटतो. सदस्य बनवत जायचे आणि धंदा करायचा.. जिथे जिथे " विना मूल्य" असा उल्लेख आढळतो तिथे विशेष मूल्य द्यावे लागते. यालाच कधी दान, दक्षिणा,
पुण्य कर्म, इत्यादी फसवी नावे ठेवली जातात. बहुसंख्य समाज आज कीर्तनात, भजनात, सत्संगात आहे तर उरलेला व्यसनात दंग आहे

@साहेबराव इंगोले,प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

हा सगळा प्रकार मल्टी लेवेल मार्केटिंग चा वाटतो. सदस्य बनवत जायचे आणि धंदा करायचा..

आपले निरिक्षण अत्यंत योग्य आहे.बरेच अध्यात्मिक बाबालोक आयुर्वेदिक औषधींचा/नैसर्गीक खतांचा नाहीच काही अध्यात्मिक सीडीजचा/पुस्तकांचा धंदा करू लागले आहेत.त्यांचे कार्यकर्ते /भक्त यांना यातून अर्थातच कमिशन मिळते.त्यामुळे गुरुही आणि शिष्यही 'धन्य' (की धनवान) झालेत .म्हणायला बाबांची "कृपा" हा शब्दप्रयोग आहेच.

अवांतर -
धार्मीक ढोंगीपणाचे एक उदाहरण -
आमच्या इथे एका साउथ इंडीयन मंदीरात सगळ्या सुचना, दिशादर्शक, देवांची नावे, कामकाजाची भाषा इत्यादी सर्व त्यांच्या साउथ इंडीयन भाषेत लिहिले आहे पण प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दानपेटीवरील 'दानपेटी' हा शब्द मात्र आवर्जुन देवनागरीत लिहीला आहे. मराठी/हिंदी लोकंनी आत देवळात आलच पाहीजे अस काही नाही पण जाता जाता दानपेटीत दान मात्र टाकल पाहिजे.

@अभिजीत, सर्व प्रकारची देवस्थाने ही नफा कमावणारी ,नोटा छापणारी यंत्रे बनली आहेत.एखाद्या किरकोळ मंदिरातील दानपेटीत सुद्धा त्या मंदिराच्या आणि पुजाऱ्याच्या मेंटेनन्सच्या अनेक पट पैसा जमा होतो. पद्मनाभ सारख्या मोठ्या देवस्थानांचा तर मग हिशेबच नाही.अशा जमा होणारी संपत्ती ही जेवढी कायदेशीर पद्धतीने होते,त्याच्या कैकपट ती गुप्तदानाच्या स्वरुपात येते.बरे,हे दानशूर कुणी राजा हरिश्चन्द्र नसतात.तर त्यांना (लोकांना लुबाडून) देवाच्या कृपेने मोठे घबाड मिळालेले असते;त्याचे कमिशन म्हणून ही रक्कम दान केली जाते.त्यामागे कदाचित ते पुण्य कमावल्याचे(खोटे) समाधान असते.म्हणजे मग पुन्हा लोकांना लुबाडायला मोकळे.

डॉक्टर चांगल्या विषयाबद्दल अभिनंदन..

तत्त्वज्ञान आणि धार्मिकता यांचा संबंध नसावा असं मला वाटतं. धार्मिकता हा शब्द इथं कर्मकांडं, चमत्कार या अर्थी घेतला असल्यास तत्वज्ञान त्यापासून कोसो दूर आहे. तत्वज्ञानाकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या दृष्टीमुळे धर्मांची स्थापना झालेली असावी असं माझं मत आहे. अर्थात हा विषय आणि त्याचा आवाका प्रचंड आहे आणि मी त्यावर लिहू शकत नाही...

जाणकारांच्या पोस्टसच्या प्रतिक्षेत !!

डॉक
असं प्रत्येक जण म्हणायला लागला तर धागा पुढे सरकणार नाही.
तुमचा रोख स्पष्ट करा. तत्त्वज्ञानाचा मुलामा देऊन चाललेली फसवणूक, धर्माच्या नावाखाली चाललेला बाजार असं अपेक्षित असेल तर त्याच दिशेने चर्चा होईल.

@ kiranyake, tatwdnyacha aawaka khup motha aahe. te adhatmapasun aniti paryant sarv gostinna lagu hote. mala ithe adhatm,dev,dharma, devasthane, adhyatmik guru, tyanchya tatwdnyanatil tathyansh aani vividh khudra pravrutinchya lokanchya mansikata ityadi aani tyala samantar aankhi jya kahi gosti asatil- tyavishyi charcha apekshit aahe.