बुलबुलचा शॉवरबाथ

Submitted by पुरंदरे शशांक on 11 July, 2011 - 06:39

बुलबुलचा शॉवरबाथ

मे महिन्याचे रणरणते उन. शेजार्‍यांनी गच्चीतील टाकीत पाणी भरण्याकरता मोटर चालू केली होती. बहुतेक आमरसपुरीचे जेवण झाल्यामुळे का कोण जाणे - सगळे निवांत वामकुक्षीसुख अनुभवत होते. टाकी भरुन वाहू लागली तरी कोणाला पत्ता नव्हता. एवढा पाण्याचा आवाज कुठुन येतोय म्हणून खिडकीतून डोकावलो तर समोर एक बुलबुल अंदाज घेत घेत त्या पाण्याखाली शॉवरबाथ घेत होता - मजेत. मनात म्हटले - बच्चमजींची ऐश आहे आज - एवढ्या उन्हाच्या कहारात छान शॉवरबाथचे सुख अनुभवायला मिळतंय याला - शेजार्‍यांना जागं करायच्या आधी कॅमेर्‍यात टिपले याला..... गंमत अशी की एकाचे पाहून दुसराही हजर झाला लगेच हे शॉवरबाथचे सुख अनुभवायला.......

Picture 059.jpgPicture 064.jpgया बुलबुलचा शॉवरबाथ इथे खालील लिंकवर पाहू शकाल....

http://www.youtube.com/watch?v=4XsDDOPZkxs

गुलमोहर: 

मस्तच आहेत फोटो. अगदी मनसोक्त शॉवर घेतोय. Happy
इथे ध्वनिमुद्रण टाकलेलं पाहीलं आहे पण चित्रफित पाहण्यात नाही आली.

मस्त ..

हे माझे राहिले होते बघायचे.
मला वाटतं काही माणसांना, पक्षी धर्जिणे असतात. मला मात्र नाहीत, कारण इतके पक्षी इथे असले तरी मला ते पटकन दिसत नाहीत. (पण फुलेच काय, फुलाची बारिकशी कळीपण लगेच दिसते !!)

सहीच!

chanach !!!