मज मलमली सुखाचा हलकेच वार झाला.

Submitted by कमलेश पाटील on 8 July, 2011 - 01:08

मोकाट आठवां तव अलवार वेचताना
मज मलमली सुखाचा हलकेच वार झाला.

वारा चहू दिशांनी गारुड घालताना
तो सुर्य तळपला पण का अंधकार झाला?

जेव्हा तुझ्यात माझे आयुष्य गुंतले हे
तेव्हा खुळ्या क्षणांचा नुकताच हार झाला

सोडून आज जाता तुज दूर लोटताना
सांडू नकोस आसू आपला करार झाला.

गुलमोहर: