आयुष्याचे बॅलन्सशीट

Submitted by वर्षा_म on 8 July, 2011 - 00:54

ठरवले एकदाचे आणि घेतले लिहायला
आयुष्याचे बॅलन्सशीट
म्हटले दाखवावेच त्याला
कसे नुसते दु:खच माझ्या पदरात
ओतलेस हे!

शंभर पानी वहीची १० पाने
नुसत्या दु:खांनी भरली पटापट
आणि त्या आठवणींने
डोळेही!

पण आनंदाचे क्षण आठवेनात
आवंढा गिळला आणि डोळे मिटले
म्हटले राहु देत वही वरच
आठवेल तसे लिहु!

अचानक एक क्षण आठवला
त्याबरोबर शृंखलाच सापडली
आनंदाच्या क्षणांनी ९० पाने भरली
मनही!

एक मिश्कील आवाज आला
फिगर्स मॅच करुन हव्यात का?

गुलमोहर: 

Tally software is good for the same.
म्याडम Happy लय भारी

धन्स Happy
Tally software is good for the same. >> हो हो.. पण आयुष्याच्या जमाखर्चासाठी अजुन सोफ्टवेअर नाही आले बाजारात Happy

"अचानक एक क्षण आठवला
त्याबरोबर शृंखलाच सापडली
आनंदाच्या क्षणांनी ९० पाने भरली
मनही!

एक मिश्कील आवाज आला
फिगर्स मॅच करुन हव्यात का?"

.............. छान...... कलाटणी आवडली.