निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी, सुंदर लिंक आहे सगळेच फोटो मस्त!! काटेसावर म्हणजेच पांगारा का? पळसा बरोबर पांगारा ही उन्हाळ्यात खूप फुलतो अलिबाग मुंबई मार्गावर बराच पाहिलाय. पळस केशरी तर पांगारा छान लालगुलाबी असा वेगळा ओळखूच येतो.

श्रीकांत,
काटेसावर म्हणजे पांगारा नाही. काटेसावरीची फुलं एकेकटी असतात. तर पांगार्‍याची एकेक पाकळी जपानी पंख्यासारखी पसरून गुच्छ तयार झालेला असतो.
पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ही सर्व मंडळी उन्हाळ्यात फुलतात.

श्रीकांत, ह्य पानाच्या खाली सर्च आहे तिथे पळस, पांगारा, काटेसावर असे एकेक नाव टाकुन सर्च करा. इथे सगळी झाडे अगदी फुला, पानासकट हजर आहेत. सगळ्या शंका मिटतील Happy

मला काटेसावरीला शाल्मली म्हणतात हे माहीत नव्हत. धन्स. आमच्याकडे रस्त्याला भरपुर काटेसावरी आहेत. पांगार्‍याला आम्ही पारिंगा म्हणतो. पारिंग्याची फुले अगदीच लालभडक असतात.
मी त्या वरच्या वेलीच्या फुलांचा की फळांचा फोटो टाकते.

छान आहे फोटो !
तुम्हा सर्वांना फुलाझाडांची एवढी माहीती आहे की माझ्यासारख्या नवख्याला येथे येऊन संकोचायला व्हावं.शाळेतल्या विद्यार्थ्याला एम्.ए. च्या वर्गात नेऊन बसवावे तसे आहे हे.चुपचाप मागच्या बाकावर बसुन चर्चा ऐकतो. Lol

कळस असे काही नाही. कारण निसर्गाच्या वर्गाला वर्गवारी नसते. तो सगळ्यांना सारखेच देत असतो.

शाल्मली म्हण्जेच सप्तपर्णी का ? शांतिनिकेतन मधे याची झाडे आहेत. रवींद्रनाथ टागोरांनी या सप्तपर्णीचा तिथल्या पदवीदान समारंभाशी संबंध जोडला असल्याचा उल्लेख पु. लं. च्या " वंगचित्रे " या पुस्तकात आहे. कुणाला काही अधिक माहिती ?

शाल्मली वरती माहीती जमा झाल्या प्रमाणे शाल्मली म्हणजे काटेसावर आणि सप्तपर्णि ची झाडे अशीच दिसतात पण त्याला सात पाने असतात आणि झाडाचे खोड हिरवे असते.

सप्त पर्णी वेगळी, काटे सावर वेगवेगळी , काटेसावरीला बॉम्बॅक्स शास्त्रीय नाव आहे, इंग्रजीत सिल्क कॉटन ट्री पण म्हणतात . सप्तपर्णी चं शास्त्रीय नाव अल्स्टोनिया स्कोलॅरिस .

इथे आहेत बरीच नावे अन फोटो http://en.wikipedia.org/wiki/Trees_of_India

जागू,
ती फळंच आहेत. कारण आम्ही एकदा मे महिन्यात ताम्हिणी घाटात गेलो होतो तेव्हा रानमोगर्‍या शेजारीच ही फळं असलेली वेल होती. मला तर वाटतंय की त्या (म्हणजे रानमोगरा आणि ती वेल) एकमेकांची भावंडं असावीत. इतके ते बर्‍याच ठिकाणी एकत्र पहायला मिळाले.
कळस,
निसर्गापुढे आपण कुणीच नाही. इथे कोणीच १ लीत किंवा एम्.ए. ला नाही. त्याच्याबद्द्ल प्रेम आहे ना मग बस. आपण सगळेच शिकतो आहोत. आपल्याला माहिती हवी असेल तर इथे विचारली ना तर ज्याला ती माहिती आहे तो ती सांगतो. मजा असते इथे. Happy

जागु,
अभिनंदन !
Happy

पळस,अश्विनी के >> मी देखील तुम्ही बसताय त्या बाकावरच आहे
कॉपरपोड या वनस्पतीला मराठीत काय नाव आहे ?

जागू, अभिनंदन. तुम्ही खरंच भाग्यवान आहात, म्हणूनच इतर सर्व जागांपेक्षा बुलबुलाला तुमच्या घरची ऊब अधिक भावली. अप्रतिम लिहिले आहे.

यानिमित्ताने एक सांगावेसे वाटते. माझ्याकडील गार्डनमधील आंब्याचे झाड जेमतेम ४-५ फूट उंच असेल. पण गेल्या २-३ आठवड्यापासून रोज संध्याकाळी एक इवलासा पक्षी त्याच्या फांदीवर येऊन बसतो. बरे, जमिनीपासून इतक्या जवळ असूनही तो बर्‍यापैकी बिनधास्त असतो. स्वारी साधारण सं. ७. ०० च्या सुमारास ठरलेल्या फांदीवर, ठरलेल्या जागीच येऊन बसते व साधारण ९ पर्यंत तो "गाढ" झोपी जातो. मी असा झोपलेला, डुलकी काढणारा पक्षी पहिल्यांदाच पाहिला आणि तोही माझ्याच घराच्या अंगणात! मान आकसून घेऊन, डोळे मिटून, चोच आतमध्ये छातीशी भिडवून, अंग चोरून, तो मस्त निर्धास्त झोपतो. खरोखर बघण्यासारखेच आहे ते, वर्णन करणे अवघड आहे. आमच्या कॉलनीत इतरही छोटी मोठी बरीच झाडे (आंबा इ. ) आहेत. तरी माहीत नाही का, पण याच झाडावर त्याला सुरक्षित वाटत असावे. काय म्हणावे याला?
मोबाईलवरून रात्रीच्या अंधारात अगदी जवळूनही फोटो स्पष्ट आला नाही. फ्लॅश असलेल्या कॅमेर्‍याने फोटो काढून मग अपलोड करीन. (अशावेळी चांगल्या कॅमेर्‍याची उणीव भासते) सध्या आलाय तसा फोटो, अंदाज यावा म्हणून अपलोड करीत आहे.
जागा ..
IMG158-1.jpg
आणि झोपलेला ..
IMG157-1.jpg
आताशा संध्याकाळ झाल्यानंतर, तो येऊन त्याच्या जागेवर बसलाय हे पाहण्याची, कंन्फर्म करण्याची आम्हाला सवयच जडलीय. इतके दिवस झाल्याने तो आता पाहुणा नाही तर जणू घरातलाच मेंबर झाला आहे आणि हो, माझ्या मुलाने तर त्याचे "पक्षीभावोजी" असे नामकरणही केले आहे !

अनिल,
कॉपर पॉड म्हणजे पेल्टोफोरम. त्यालाच कॉपर शील्ड बेअरर ट्री असंही म्हणतात. मराठीत याला तांबडशेंग असं नाव आहे. Peltophorum pterocarpum हे आहे याचं बोटॅनिकल नाव.:स्मित:

कळस,
तो अ‍ॅशी असावा. कारण अ‍ॅशी माणसाला जरा कमी घाबरतो, आणि जमिनी पासून अगदी कमी उंचीच्या फांदीवर तो झोपू शकतो. आमच्याकडे तर एके वर्षी चक्क ब्रह्मकमळाच्या फांदीवर तो झोपत असे; आणि चांगले १५/२० दिवस (रात्री) तो झोपायला येत असे.

साधना,

तुझ्याकडे ३ कलिंगडे लागली आहेत ना! पण त्या वेलीच्या पाना-फुलांची खबरबात काय काय आहे?

माझ्याकडे १ च लागलंय, पण पानं पिवळी पडायला लागली आहेत आणि फुलं येणं तर बंदच झालंय Sad

बहुधा त्या वेलीचं सगळं लक्ष 'त्या' नवागताकडे लागलं असावं असं मला वाटतंय. म्हणून तुझ्याकडच्या 'छोट्यांची' चौकशी करतिये.

शांकली,
धन्यवाद.
पिंपरी चिंचवड मनपाने या भागात या 'तांबडशेंग'' झाडाची लागवड खुप केलेली दिसते,त्याची पिवळी फुले छान दिसतात.
कलिंगड या पावसाळी वातावरणात बहुतेक चांगल वाढणार नाही,अस वाटतं.

जिप्सि लिंक टाकल्याबद्दल धन्स.

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद. तुम्हा सगळ्यांच्या आणि निसर्गाने दिलेल्या आशिर्वादाचे हे फळ मी मानते.

जागू अभिनंदन !

शनिवारी सकाळी तुला फोन करण्याची खुप ईच्छा झाली होती. साधनाला फोन करुन तुझा नंबर घेणार होते.

पण आळस आणि संकोच जिंकले :-(.. नाही केला मी फोन.

परत एकदा मनापासुन अभिनंदन

Pages