निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिजन असेल/नसेल माहित नाही. जे मिळेल ते पकडते Happy

अरे लेकीने मॉरिशसचा प्लॅन केलेला. तिला गोव्यावर भागवले Happy

साधना, गोव्यात निवांत राहणार असशील तरच जा. धावती भेट नको.
पणजीचे म्यूझियम पण बघ. कुणी जात नाही तिथे सहसा, पण छान आहे.

अरे व्वा साधना मज्जा करून ये. गोव्यात कुठल्याही हॉटेलात मला पाण्यालाही कसलासा वास यायचा!खाणं तर सोडाच! मनात शंका!

योगेश काय सह्हि आहे माश्यांच्या फोटोची आयडीया. खुप आवडले मला ग्रिटींग. फुले पण खुप सुंदर आहेत. कसली आहेत ? धन्स .

दिनेशदा, मानुषी, शोभा खुप सुंदर आहे फुल. धन्यवाद.

उजू , पुरंदरे फोटोसकट असलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.

मोनाली, निकिता, साधना, आस, शुभांगी

दिनेशदा बड्डे गर्लने वाढदिवसाचे निमित्त साधून चकल्या केल्या. सगळ्यांचे फोन चकली करता करताच अटेंड केले. घरची सकाळीच लाईट गेल्याने नेटवर बसता आले नाही. मग चकल्यांना सुरुवात. मस्त झाल्यात. खायला या दिवाळीत सगळ्यांनी. नि.ग. वरच्या सगळ्यांना मिस करत होते. त्यातच योगेशचा फोन आला आणी थोडक्यात त्याने गप्पांबद्दल सांगितले पण स्वतःही इतके सुंदर कॉमेंट्स त्याने टाकलेत हे नाही सांगितल. संध्याकाळी आता फॅमिलीसकट सेलिब्रेशन. श्रावणीने संध्याकाळच्या ट्युशनला दांडी मारली बड्डेच निमित्त साधून.

योगेश हा असा एक प्राणी आहे जो व्रत घेतल्यासारखे सगळ्यांना आठवणीने फोन करत असतो. Happy

कोणी मुद्दामहुन फोन केल्याने आपल्याला किती बरे वाटते सगळ्यांनाच माहित असते तरीही फोन करायचे मी टाळत राहते Sad

काय सांगता दिनेशदा ..............गोव्यात ३ वर्षं राहूनही................हा पराक्रमच म्हणायचा!

Pages