श्री पद्मनाभ मंदीर येथे सापडलेले खजीना

Submitted by Sanjeev.B on 6 July, 2011 - 23:48

त्रिवेंद्रम (केरळ) येथे श्री पद्मनाभ च्या मंदीरा मध्ये अंदाजे १ लक्ष कोटी चा खजीना आहे असे वृत्त गेले काही दिवस बातम्यांत आपण पाहत आहोत, त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी येथे हा धागा काढत आहे.

खालील गोष्टींवर चर्चा अपेक्षीत आहे :-

  1. खजीन्यावर हक्क कुणाचे ?
  2. भारताच्या अर्थव्यवस्था पेक्षा ही खजीना मोठा आहे ?
  3. भारतीय अर्थव्यवस्था वर त्याचे परीणाम.
  4. विकास कामे.
  5. खजीन्याचे विकेंद्रीकरण व्हावे का ?
  6. सापडलेल्या (?) खजीन्या मध्ये भ्रष्टाचार .

- संजीव बुलबुले / ०७ जुलै २०११ / ०९२०

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील सर्व प्रश्नांची कधीच उत्तरे मिळणार नाहीत. सर्व दारांना परत कुलुपे लावून ठेवावीत.

अमोल केळकर
---------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

असे अनेक खजिने भारतात आहेत. हरामखोर इंग्रजांनी आणि लुटारु अफगाण्यांनी लुटुनही असे अनेक खजिने भरलेले आहेत.

ही बातमी वाचुन विजापुरचा एक गरीब भाजी विकणारा सांगत होता की विजापुरला जुन घर पाडण्याआधी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते.

त्याने त्याच्या घराची पडलेली भिंत पुन्हा बांधण्यासाठी संपुर्ण पाडली तेव्हा त्यात दोन चांदिच्या वीटा मिळाल्या. पुढे त्या पोलीसांनी सरकार दरबारी जमा केल्या.

नितिन, जमिनीखाली मिळालेल्या संपत्तीबाबत कायदे आहेत.
या देवस्थानाच्या खजिन्याबाबत मी आधीही लिहिले होते कि निदान मी अभ्यास केल्या त्यावेळी तरी, अशी मिळकत व संपत्ती भारतीय कर कायद्यांच्या कक्षेत येते. त्यावर रितसर कर आकारणी आणि जर लागू असेल तर जप्तीची कार्यवाही पण झालीच पाहिजे.
माझा असा ठाम विश्वास आहे कि, देवासाठी असे अमाप दान करणारे लोक, स्वतःजवळ त्यापेक्षा जास्त संपत्ती बाळगून असतात. त्यामूळे देवस्थानाच्या देणगीदारांची पण चौकशी झाळिच पाहिजे.

रितसर कर आकारणी आणि जर लागू असेल तर जप्तीची कार्यवाही पण झालीच पाहिजे.>>> कर का ते तर जप्तच करणार ना. १दा सरकारच्या तिजोरीत गेले की ती डेड ईन्व्हेस्टमेंन्ट होत नाही का? आणि जप्त केलेले सर्व तिजोरीतच जाते का? पुढे सरकाय त्याचे काय करते हे सामान्यांना कळते का?
मला या बद्दल जास्त माहिती नाही. कृपया जा णकारांनी प्रकाश टाकावा.

असे अनेक खजिने भारतात आहेत.<<< अनुमोदन नितीन.

भारत सरकार ह्या खजीन्याचे विनीयोग विकास कामे साठी करु शकतं का, कारण त्या खजीन्याचे हक्क माझ्या माहिती प्रमाणे केरळ राज्य सरकारा कडे जाते.