वडापाव

Submitted by देवनिनाद on 6 July, 2011 - 06:13

भाऊ- वडापाव वडापाव ...गरम गरम ... स्पेशल लसणाची चटणी असलेला चविष्ट वडापाव

अण्णा - अय्योयो !! अय्यो बाबा काय करतो ...

भाऊ - काय राव, आता मी एवढं मोठ्याने ओरडतोय ... वडापाव वडापाव तरी कळत नाही का.

अण्णा - ते कळतयं कि रं. ........... मला बी नी पब्लीकला बी ... गप गुमान विक की ... माझ्यासारखं

भाऊ- माझी गाडी नवीन आहे ... धंदा चालला पाहीजे .. तूझी इडली बी जूनी आणि धंदा बी ... वडापाव, वडापाव ... गरम गरम ..

अण्णा - अरे ये, ते ओरडायचं सोडून दे की रं. ............ वडा चांगला आसलं तर वासानचं पब्लीक येईल की ..

भाऊ - लेका, वासाचे दिवस गेले. आता, वडा वासानं नाही नावानं कळतो ..

अण्णा - मग तुझ्या वड्याचं नाव काय आसतं

भाऊ - - महाराज वडापाव ...

अण्णा - भले शाब्बास ...आधी शिव, मग छ्त्रपती, आणि आता तुझा महाराज वडा आला ... आता `की जय' ह्या नावानं ... एक वडा पाव काढा म्हणावं कुणीतरी ... निदान त्यानिमित्ताने तरी अवघ्या महाराष्ट्राला शिवाजी महाराज लक्षात राहतील. ... अय्यो, आमचं इडलीवाल्याचं बरं, कीती बी धंद्यात माणसं आली तरी आमी इडली ला इडली म्हणूनच विकतो.

भाऊ - खरं बोललास बाबा. थोडक्यात काय, तुम्ही दहा इडलीवाले एकत्र आले की त्यांना आणखी २० जण सामील होतील ...पण मराठी माणसाचे दोन बटाटेवडे एकत्र येणं कठीण ... जेवढ्या गाड्या तेवढ्या नावाचे वडे ... आरोळी तीच मराठी पाऊल पडते पुढे ...

देवनिनाद

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नाही रे. मायबोलीसाठी भरपुर लिखाण करायचं, पण सध्या ऑफीसच्या टेक्नीकल आणी चॅनेलच्या लिखाणात खुप गुंतलोय. आता हेच बघ ना. तू वाचलेले लिखाण ७-८ पानी करायचं होतं, पण मा.बो. मित्रांसाठी खास ... हे झटपट लिखाण ...

तुझ्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद...

बरं वेळ मिळालाच तर
झी टॉ़कीजवर दर रविवारी ११ वाजता `सिनेमा सिनेमा' कार्यक्रम बघ. स्किप्ट लेखन मी केलयं. तुझा अभिप्राय कळव.

देवा अरे मला इथे बघणं फार कठीण आहे. जमल्यास त्याचं प्रसारण युट्युब वर रेकॉर्ड करून ठेव. तरीही मी प्रयत्न करतो. इथे कोणास लाईव्ह टिव्ही चॅनेलसच्या वेबसाईटची लिंक माहित असेल तर जरूर कळवा. वेळ मिळेल तसं हलकंफुलकं लिखाण लिहित जा. Happy

मी कार्यक्रम पाहिला तर जरूर अभिप्राय नोंदवेन. बाकी त्या भरपुर लिखाणाच्या प्रतिक्षेत.

Happy
छान आहे स्फुट.
वास चांगला येऊनसुद्धा 'लालू वडापाव' काही महाराष्ट्रात कोणी विकत घेणार नाही, गाडीची मोडतोडच व्हायची..

खरचं ... मनापासुन सर्वांचे आभार. यापुढे बिझी आहे ही सबब सांगणे आता ऑड वाटेल ... पण मित्रांनो ... थोडक्यात का होईना पण लिहीन ... आजचा दरबार हे सदर पुन्हा लिहीन म्हणतो ...

तुम्हा सर्वाना सस्नेह आणि पु.ले.शु.

देवनिनाद, गोष्ट आवडली. आता झी मराठी जरा लक्ष देऊन बघीन.

वास चांगला येऊनसुद्धा 'लालू वडापाव' काही महाराष्ट्रात कोणी विकत घेणार नाही
अहो लालू, महाराष्ट्रात जायचेच कशाला बोंबलायला!

तुमचा लालू वडा इथेच तुफान चालेल! कधी येताय् वडे घेऊन? भरपूर आणावे लागतील. तिकडच्या दोन तीन लोकांची मदत घेऊन भरपूर वडे करा. आणि त्या सगळ्यांना इकडे घेऊन या! मग त्याला लालू, राज, ओबामा, बुश काहिहि म्हंटलेत तरी आम्ही आपले मिटक्या मारत खाऊ.
Happy