जाहिरात

Submitted by मुरारी on 4 July, 2011 - 11:54

मायबोलीकरांची क्रियेटीव्हता आजमावण्यासाठी हा धागा... Happy

तर विषय हा आहे कि.. प्रत्येक प्रतिसाद कर्त्याने, एक प्रोडक्ट द्यायचं, आणि त्या खालच्या मेम्ब्राने त्याची जाहिरात करून दाखवायची
ति पण एकदम हटके.आणि नवीन प्रोडक्ट टाकायचं
प्रोडक्ट पण एकदम झकास द्यायचं गड्यांनो (आणि गडींनो Wink )

तर सुरुवात मी करतो..
माझ प्रोडक्ट -- "वास" डीओ - डी वास इफ्फेक्ट

असो डीओ जो सर्व पब्लिक ला करील.. बेहोष.. धुंद..
असा वास जो सर्व लोकांना ठेवेल दहा फुट लांब तुमच्यापासून .., गर्दीत ट्राफिक मध्ये तुमची स्वतःची स्पेस जपणारा ..
आणि ह्याचा परिणाम चालेल संपूर्ण १२ तास .....
आजच मारा

वास == दी वास इफ्फेक्ट

तर माझ प्रोडक्ट "हेल्मेट" Happy
करा सुरुवात

गुलमोहर: 

माझ प्रोडक्ट "हेल्मेट"

हा हेल्मेट टक्कलधारी लोक आपलं सिक्रेट लपवण्यास वापरतात.

तुमच्या बाईकवर मागे तुम्हाला घट्ट आवळून बसलेल्या प्रेयसीचं डोकं हेल्मेटने झाकून टाकायचं. याचे फायदे दोन होतात :
१) प्रेयसीच्या घरातले तिला ओळखू शकत नाहीत.
२) प्रेयसीच्या व्यर्थ बडबडीपासून सुटका होते.

या हेल्मेटचा प्रभावी वापर मुख्यत: घरात होतो. बायकोसमोर तिच्या जेवणाची खिल्ली उडवली तरी तिने फेकून मारलेल्या लाटण्यापासून डोक्याचं संरक्षण करण्यासाठी हा हेल्मेट कामास येतो. अर्थात हे अस्त्र वापरून आपण बायकोसमोर आपली तुंबलेली भडास काढू शकतो.

मग आजच घ्या आणि परिणाम पहा.

रसिला.........SSS
पाणीदार पाणी

प्रत्यक्श्य हिमालयातुन आणलेले, नदिच्या उगमापासुन मिळवलेले..
पाणीदार पाणी

यात आहे नॅचरल आयरन्स आणि मिनरल्स ची शक्ति..
पाणीदार पाणी

हे पाणि पिल्यामुळे सगले सगळे आजार होतात गायब..
पाणीदार पाणी

मग विसरू नका, आज पासुन फक्त
पाणीदार पाणी

घने सुहाने लम्बे बाल पायजेल...
तर आमचा लोह शाम्पू वापरा...

तुमचे केस होतील.. लोखंड सारख्या ताकदीचे ..

रात्री अपरात्री येताना.. कोणी छेडल .. घाबरू नका..
वापरा आमचा लोह शाम्पू .. आणि त्या तडाखा तुमच्या केसांचा ..
एका फटक्यात एका कुर्हाडीच्या घावाची क्षमता Lol
तर मुलींनो घाबरू नका...
वापरा "लोह शाम्पू"

माझ प्रोडक्ट : चीनी तेल महत्वाच्या क्षणांसाठी Lol

बेसन - टिक
वॉशिंग पावडर - टिक
अमूल तूप - टिक
ब्रिटानिया बिस्कीट - टिक
ओडोनील - टिक
बेडेकर उपवास भाजाणी - टिक
जॉन्सन बँड-एडस - टिक
सौंदर्य साबण निरमा - टिक
पॅरेशूट केश तेल - टिक
गार्निअर कंडिशनर - टिक

तुम्ही नेहमीच्या यादीत काही विसरलाय का?

तेलाच्या नंतर? आणि कंडिशनरच्या आधी?

सुंदर.. धूळरहीत केसांसाठी.. डॉकैगा शांपू, टिक करायला विसरू नका, डॉकैगा शांपू.

अमिताभने वापरले तुम्हीही वापरा.. मग तब्बूसारख्या सौंदर्यवतीबरोबर असताना महत्वाच्या क्षणी चिनी कम पडू नये म्हणून --- चीनी तेल

अमिताभने वापरले.. परेश रावललाही दिले.. चिनी तेल
ami.jpg

स्टायलिश पोनी टेलचे रहस्य.. चिनी तेल...
परेश रावलच्या तुरळक शेतीचे रहस्य.. चिनी तेल!

माझे प्रॉडक्ट - टॅटू रिमूव्हर!

तुम्ही नेहमीच्या यादीत काही विसरलाय का?

तेलाच्या नंतर? आणि कंडिशनरच्या आधी?

सुंदर.. धूळरहीत केसांसाठी.. डॉकैगा शांपू, टिक करायला विसरू नका, डॉकैगा शांपू.>>>>>>>>

Rofl

धागा तर झकास आहे. पण म्हणावे तसे प्रतिसाद नाहीत. असो, माझा प्रोडक्ट "गाजराची पुंगी" वाजली तर वाजली नाहीतर मोडुन खावा.

१. अय्या.. हे काय...???
कोणाच नाव लिहिलयस स्वत:च्या हातावर..??

काय करु हे नाव माझा पाठलाग च नाहि सोडत.. काय करू??

२. अबकः अरे यार काय करु.. मला नविन girlfriend च नाहि मिलत आहे..
क्षयझः का? काय झाले?
अबकः अरे जुन्या चे नाव टॅटु करुन घेतले होते ना दन्डावर. ते पाहुन नविन मला हो म्हनत नाहिये.

काय करु ? कस घालवु हे नाव?

३. इइइइइ.... अग अजुन हे जुनच डिझाइन का ठेवलयस खान्द्यावर..?

अग पण त्या साठी हे डिझाइन जायला हव ना.. ते कस जाणार??

सोप्प आहे... करिना टॅटु रिमुव्हर नी... वापरुन पहा.. करिना टॅटु रिमुव्हर

माझा प्रोडक्ट : शाकालाका बुम बुम पेन्सिल

तुम्हाला लिहिता लिहिता कान कोरायचेत ???

तुम्हाला लिहिता लिहिता पाठ खाजवायचीये ???

तुम्हाला लिहिता लिहिता मानही खाजवायचीये ???

हो... बाबा... हो........

मग फिकर नॉट...

वापरा आमची शाकालाका बुम बुम पेन्सिल !!! Proud

याची अनोखी डिजाइन लिहिण्याबरोबर तुमच्या मोक्याच्या जागी येणार्‍या खाजेपासूनही करेल मुक्तता!

त्यामुळे बि-टेक्स आणायचा विचार करा कॅन्सल !
आजच आणा... शाकालाका बुम बुम पेन्सल !!! (यमक बरं का!) Rofl

पुढचा प्रॉडक्ट 'हत्ती छाप साबुदाणा'

पुढचा प्रॉडक्ट 'हत्ती छाप साबुदाणा'

जो हत्तीके पैरोंसे नहीं दबेगा वो सिर्फ थोडेसे पाणी भिगेगा और, खाने के लिए तैयार

माझ प्रॉडक्ट - मंदीर उदबत्ती

(खास नेत्यांसाठी) मंदिर अगरबत्ती

पापांनी शंभरी गाठ्लीये...?
काळी कृत्य डोळ्यांसमोर पिंगा घाल्तायेत ?
रात्रीची झोप हरवून गेलीये ?
आयकर वाले जप्ती घालणार याची चिंता वाटतेय?
काळा पैसा कुठे लपवावा, हि विवंचना आहे ?

घाबरू नका, लावा मंदिर उदबत्ती, खास हिमालाय्तल्या झाडांपासून बनवलेली
यातील रुद्राक्षाच खोड तुमची सर्व पाप धुवून टाकेल Wink
बनवेल तुमच्या चारित्र्याला हिर्यासार्ख लखलखीत ...
याचा गंध नाश करेल सर्व वाईट प्रवृत्तींचा...

आजच आणा मंदिर अगरबत्ती

माझ प्रोडक्ट : चुन्नीचा पांडू बाम

डोकेदुखी मुळे मुन्नी सारखं व्हायचं नसेल बदनाम,
तर लावायला विसरू नका चुन्नीचा पाण्डू बाम!

डोकेदुखी, पाठ्दुखी वर मिळतो झटपट आराम
एकदा जरूर वापरून बघा चुन्नीचा पाण्डू बाम!

असर जोरदार पण कमी दाम
तर नक्की आणा चुन्नीचा पाण्डू बाम!

माझ प्रोडक्ट : सिन्ड्रेला बूट आणि चप्पल

अक्षरी मस्त Happy

मुलं छेडतात?
द्या त्यांना सणसणीत प्रसाद आमच्या पादत्राणांचा
सिंड्रेला बूट आणि चप्पल... Proud

वजनाला हलकी -ढोलोबा क्याप्सूल"
ढोलोबा ची घ्या साथ - ढोल होण्याला मारा लाथ

Pages