संदेश

Submitted by राम सन on 4 July, 2011 - 04:55

आजोबांना बरे नव्ह्तेच तसे, पण अगदि होस्पिटल मधे ठेवावे लागेल अस वाट्ले नव्हते. मामिने रिक्शा बोलविलि आणी त्याना घेवुन गेलि पन होस्पिट्ल मधे, खरेतर जाताना आजोबा जाताना डोकावत होते रिक्शा मधुन कि त्याना त्यान्चि मुलगि दिसते का म्हनुन पन मामि ने ते होवु दिले नाहि आनी गाडी तषिच पुढे गेलि. काय वाट्ले असेल त्यांना, किति परधिन असतो माणूस. साधे स्वतच्या मुलीला जाताना सांगता येवु नये.

त्यांना होस्पिटल मधे ठेवुन घेतले, संघ्याकालि मामाने आई ला सांगितले कि दादांना दवखान्यामधे ठेवले आहे म्हनुन. ताबडतोब आइ निघालि त्यांना बघायला. आई पोहोचलि पन खुप उशिर झाला होता, आजोबा कोमा मधे गेले होते, जाताना रिक्शात म्हनत होते म्हने कि मल एकदा चंपु शि बोलुदेत म्हनुन, तिने का बोलु दिले नाहि देवालाच महिति.

देव केंव्हाचा होस्पिटल मधेच होता, त्याने मला सन्गितले होते कि काहि कमि-जास्त असले तर फोन करिन, आत्ता घरिच थांबा तुम्हि दोघि, कारण सोनालि लहान आहे, इतर दोन म्हेवण्या बरोबर तो तिथेच थांबला होता. जेवण जाणे शक्यच नव्हते जिवच लगत नव्हता, काय टाईम्-पास करनार, सगळे उपाय करुन झाले होते, सोनालि केंव्हाच झोपुन गेलि होती, मी खिड्की मधे उभि होते, आमच्या खिडकिमधुन बाहेरच सोसायटि चे नारळाचे झाड आहे, त्याचि झावळि अगदि खिडकि मधे येते, खरेतर बाहेर अंधार होता, पण मी तिथेच उभि होते, तोच झाडावर काहितरी हाल चाल झाली, नीट निऱखुन बघितले तर वटवाघुळ होते, मनात विचार आला कि काहि अशुभ तर नाहि ना होनार, आता खरेतर रत्रिचे दोन वाजुन गेले होते, आणी तेव्हांच फोन वाजत होता, मी खुप घाबरुन गेले होते, देवचा फोन होता, हे बघ घाबरु नकोस, मी तिकडे आत्ता लगेच येवु शकत नाहि, पण मला माहिति आहे कि तु जागीच आहेस, काळजी करत बसलि असशिल, जे झाले ते चांगले झाले, आजोबा गेले. जास्त हाल न होता गेले हेच चांगले झाले, जर अंथरुणावर खिळुन राहिले असते तर कोण करनार होते त्यांचे, इथे आत्ता मी, विनय आणि विजु आहोत, मामा केंव्हाच घरी गेला, आता झाले २/३ तास उरले आहेत सकाळ व्हायला, आम्हि एकदम सकाळीच येवु बा~डी घेवुन. ५/६ तासातच जिवंत माणसाचे प्रेत झाले होते, ब रे झाले आजी तु आजोबाच्या आधीच गेलीस ते, नाही तर तुझे झालेले हाल आम्हाला बघविले नसते, आणी आम्ही तुझ्या साठी काही केले तर ते मामा ला चालले नसते. जे सुपात असतात त्यांना हे कळत नाही कि आपण पण जात्यात जाणार आहोत म्हणुन.

गुलमोहर: