राजमा - जून्या मायबोलीवरुन पण नव्या फोटोसहीत

Submitted by दिनेश. on 3 July, 2011 - 14:56
लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यम्मी!!!!!!!!!!!! Happy

मी राजमा करते त्याल थोडा रस ठेवते. आणि वरतुन तळहाताने भरडलेला ओवा घालते.
ओव्याचा वास छान लागतो आणि परत गॅसेस होण्याची शक्यता कमी Proud

आमच्याकडे पण थोडा रसदार असतो राजमा आणि भरपूर आलं घातलेलं असतं. थोडासा हिंग पण घालते, आणि बटाटा नाही घालत. छोले आणि राजम्यामध्ये बटाटे घालणे ही युपीकडची पद्धत.:)

सुरवातीला मला राजमा नीट जमायचा नाही, कांदा -टॉमॅटो नीट न परतल्याने. मग एकदा नवरा करत असताना पूर्णवेळ उभं राहून त्याची पद्धत बघितली.

राजम्यात मसाले पाहिजेतच. आणि कांदा नीट परतलाच पाहिजे.
तसा माझाहि ग्रेव्हीवालाच असतो, काल जरा जास्त आटवला.
पण हे बीन्स तसे पचायला हलके असतात.

दिनेश,
तोंपासु.. भरपूर ब्रेफा. करून सुद्धा हा फोटो पाहून तोंडाला पाणि सुटले. Happy

सेम पिंच अल्पना. मी पण बटाटा न घालता करते, आणि रसदार. आणि अजून थोडा ब्राउनिश दिसतो.
लाजो, ओव्याचं पहील्यांदा ऐकलं. शेवटी घालायचा का ?
दिनेशदा, मस्त राजमा अन नान.
पहील्या फोटोत जो राजमा आहे तो, अन अजून एक डार्क ब्राऊन रंगाचा जो असतो तो, त्या दोन्हीत काय फरक असतो ?

दिनेशदा सही रेसिपी आहे. मी कधी दुध नव्हते घातले. टोमॅटो प्युरीने करते. आता दुध घालून करुन बघेन.

मस्तच रेसिपी दिनेशदा... फोटो तर एकदम तो.पा.सु.
मी करते तो नेहमीप्रमाणे गोडा मसाला टाकून , कूकरमध्ये सगळे मसाले एकत्र करून थोडी ग्रेव्हिवाली.
मवा मला वाटत पहिल्या फोटोतला राजमा हा ओला म्हणजे शेंगांमधला आहे, आणि दुसरा सुकवलेला Happy

दोन प्रकारचा राजमा असतो एक राजमा चितरा /छिटे वाला, तो वरच्या सारखा दिसतो आणि दुसरा राजमा लाल. चवीला लाल राजमा जास्त छान असतो.

हेल्लो दिनेश्दा,

सिन्धि लोकांकडे राजमा मधे ग्रेवि लागते, सो छोले, राजमा, चौळि मधे टोमाटो बरोबर कान्दा, लसुन, आलं मिठ मिक्सि मधे काढुन मग ते कढई मधे फोडणि मधे टाकतात.

टिकरा म्हणुन एक नाश्ता असतो, तळलेलि पोळि, त्या बरोबर राजमा एकदम सहिइइइ लागतो.

हो अल्पना, मी तो लाल राजमाच म्हणत होते. मलाही तो जास्त आवडतो, पण तो शिजायला जरा जास्त वेळ लागतो असे मला वाटले. पण बाकी काय फरक असतो ते माहीत नव्हते.

dsj14 आम्हाला सगळ्यांना आवडेल ती ओरिजीनल सिंधी कृति. इथे लिहिणार का ?
मी हे बीन्स वापरले कारण आमच्याकडे सहज उपलब्ध असतात. काल बाजारात ओला राजमा पण होता. त्याचा पण रंग छानच होता. इकडे बहुतेक शेंगातले दाणे सोललेलेच विकायला असतात.

हो मवा, ओवा तळहातांनीच भरड चुरडायचा आणि शेवटी शेवटी घालायचा.
राजमा राईस मधे पण घालते मी ओवा. आणि थोडं क्रिम घालते.

दिनेश्दा,

राजमा कुकर मधे बोइल करुन घेणे, जसं तुम्हि लिहिल आहे रात्र भर पाण्यान घालुन नेक्स्ट दिवशी ७/८ शिट्ट्या काढणे. Sindhis usuaaly prefer Red Rajamas, not the other one.

एका कढई मधे जास्त तेल घेउन tomato, onion, garlic, ginger, sault, green chillis (as per taste) paste तेलात टाकुन चांगल परतुन घेणे. थोडा गरम मसाला टाकणे.

५/७ मिनिटांनि राजमा कढई मधे टाकुन चांगल बोइल् करायच. १० मिनिट बोइल् झाल्यावर राजमा तयार.

I am glad that the experienced person like you has shown interest in the receipe from a leymen...

आणि या क्षेत्रात शिकण्याला अंत नाही

हे सर्वच क्षेत्रात!

पण या क्षेत्रात असूच नये शिकण्याला अंत Happy
हम सिखते रहे तुम सिखाते रहो
मजा खानेका और भी आता है Happy

चैत्रा, या नानची कृति काही खास नाही, तरी पण देतो (इथे हल्लीच एक बटर नान ची कृति आली होती, ती चांगली होती.)

अर्धा कप कोमट अर्धा टिस्पून साखर विरघळून घ्यायची. त्यात एक टिस्पून ड्राय यीस्ट घालायची. दहा मिनिटानी ती फसफसली कि त्यात कपभर कणीक वा मैदा टाकायला (मी कणीक वापरलीय) मग त्यात मीठ व तेल घालून मैदा भिजवायचा (फार सैल नाही आणि फार घट्ट नाही) मग तेल लावलेल्या मोठ्या बोलमधे तो गोळा ठेवायचा. आणि लगेच उलटून (म्हणजे दोन्ही बाजूना तेल लागते) झाकून ठेवायचा. अर्ध्या पाऊण तासाने तो फुगून दुप्पट होतो. मग तो परत नीट मळून घ्यायचा.
एका तव्याला पाण्याचा हात लावून, लिंबाएवढा गोळा हाताने पसरून घ्यायचा. आणि गॅसवर ठेवायचा. त्याला वर फोड आले की, तवा पकडीने गॅसवर उलटा धरायचा. आणि सोनेरी रंगाचा झाला कि काढायचा.
यात हवे तर मळताना थोडे दही घालायचे. कलौंजी किंवा बडीशेप पूड पण चांगली लागते. मी वरुन पुदीन्याची पूड शिवरली आहे. वरुन बटरही लावता येते.

खरे तर हा नान करताना माझी फजिती झाली. तवा नॉन स्टीक असल्याने तो उलटा केल्यावर नान गॅसवर पडला. तो चिमट्याने उचलून तव्यातच भाजला. त्यामूळे फोड आलेले नाहीत आणि चिमट्याचा वळ पण उठलाय.

दिनेशदा मी मागच्या विकेंडला संजिव कपुरच्या गार्लीक नान रेसिपीने साधे ( गार्लीक वगळुन ) नान केले होते. यात दही, सोडा, बेपा, अंडे घातले होते. त्यासाठी मी हॅन्डल्वाला लोखंडी तवा आणालाय. खरच इतके सोपे आहे करायला. घरात ६ जणांना एकावेळि सर्व करु शकु असा स्पीड मिळतो Happy ( अर्थात मी चपाती सारखे लाटुन केले Wink )
आणि सगळ्यांना खुप आवडलेही. पण मला काही शंका आहेत
१] यीस्ट वापरुन आणी न वापरुन चवीत काय फरक पडतो Uhoh
२] मैदा आणि गव्हाचे पीठ यात कुठले चवीला चांगले ?

वर्षा, यीस्ट वापरुन नक्कीच चवीत फरक पडतो. बेकरीत पाव भाजत असताना वास येतो, तसा वास येतो. आणि भूक चाळवते. यीस्ट वापरायची नसेल तर मैदा, आदल्या रात्री भिजवावा लागेल. असे केल्याने त्यात नैसर्गिक रित्या यीस्ट तयार होते.

मैद्यापेक्षा कणीक कधीही चांगलीच. पण यीस्ट वापरुन पिठ फुगवायचे असेल, तर मात्र मैदा चांगला. कणीक तितकी फुगत नाही.

मी राजमा शिजवताना अख्खा गरम मसाला घालून शिजवते आणि मग MDHचा राजमा मसाला वापरते राजमा बनवताना. माझ्या एका मैत्रीणीमे दिलेली टीप म्हणजे कांद्यापेक्षा टोमॅटो थोडे जास्त घ्यायचे. थोडी आंबट चव आली राजम्याला की मस्त लागतो.

Pages