महाकचोरी

Submitted by सुलेखा on 3 July, 2011 - 10:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कचोरी साठी--
१ कप मैदा..
१/४ चमचा तेल-मोहन..
मीठ चिमुटभर..
सारण---
१/४ कप कोरडे भाजलेले बेसन..
१ चमचा तेल..
१/४ चमचा तिखट..
१ चमचा धनेपुड..
१ चमचा जिरेपुड..
मीठ..तळायला तेल..
[आधी नुसतीच मग तेलाचा हात फिरवुन ओवेन मधे भाजुन घेतली..त्याची चव ही आवडली]
वरुन सजावटीसाठी--
१ वाटी दही त्यात मीठ-चाट मसाला घालुन मिक्स करुन घ्यावा..
१/२ वाटी काळे व काबुली चणे भिजवुन मीठाच्या पाण्यात बोटचेपे उकडलेले ..
थोडेसे अंकुरीत मुग..
१ उकडलेल्या बटाट्याच्या फोडी..
गोड चटणी..
१/२ गाजर किसलेले..
शेव --बारीक-तिखट-फिक्की कोणतीही
मीठ-चाट मसाला-मिरेपुड-तिखट कोथिंबीर वरुन पेरायला

क्रमवार पाककृती: 

सारणाचे सर्व साहित्य एकत्र करुन छान मिक्स करुन ठेवा..
कचोरी साठी मैदा-मीठ-तेल-पाणी घालुन भिजवा..
१० मिनिटानी मळुन त्याची मोठी जाडसर पुरी लाटुन घ्या.
त्यात सारण भरुन काळजीपुर्वक बंद करुन लाटी थोड्याशा पिठीवर हळुवार लाटा..
कचोरीच्या दोन्ही बाजुला लागलेली पिठी हळुवार हात फिरवुन काढुन टाका..
गरम तेलात खरपुस रंगावर तळुन घ्या[.तळणी चे तेल फार गरम नको]..
कचोरी थंड झाली कि तिला मधुन फोडायची..
मोठया प्लेट मधे ठेवुन दही,चणे,बटाटे,मुग्,शेव,गाजर,चटणी,तिखट्,मीठ, वगेरे सगळे पेरा..

वाढणी/प्रमाण: 
एकाला एक च पुरते..
अधिक टिपा: 

संध्याकाळी जेवणाला पर्याय ..मी तळण्या ऐवजी ओव्हन बेक करुन केली..तेव्हा तयार कचोरी तळ्हातावर कापड ठेवुन त्यात कचोरी ठेवुन गरम असतानाच दाबुन /फोडुन घेतली ..दह्यात थोडी मुरल्यावर छान लागली..यात बदल म्हणुन मी बेसनाऐवजी फ्लॉ वर ,कोबी,थोडेसे गाजर्,मटार ची रितसर कोरडीभाजी [अगदी कमी तेलावर,भाज्या अगदी बारीक चिरुन] भरुन ही कचोरी चाट केली..थोडी वेगळी चव ..पण आवडली..

माहितीचा स्रोत: 
७-८ वर्षांपुर्वी अजमेर च्या गजमल गल्लीत खाल्ली होती..ही गजमल गली खाऊगल्ली नावाने प्रसिध्ध आहे..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची ही पण कृती छानच आहे.
ओव्हनमध्ये किती तापमानाला किती वेळ बेक केली कचोरी?

रुनी,ओव्हन म्हणजे ओटीजी मधे १८० ला केली..दर ५ मिनिटानी उलट-सुलट केली..दोन्हीकडुन भाजली गेली पाहिजे न जळता..मैदा लौकर भाजला जाईल कणकेपेक्षा असा त्यावेळी विचार केला होता.नुसत्या गहुपीठाची वरची पारी केली तर ती मऊ होईल हे [दाल-] बाटीमुळे माहीत होते.. .कणीक्+बारीक रवा घालुन केली तर पारीला थोडा कडक पणा असे वाटते..