देह पाऊस मन पाऊस

Submitted by उमेश वैद्य on 2 July, 2011 - 09:10

देह पाऊस मन पाऊस

देह झाला पाऊस, मन झाले पाऊस
या धारांचे शुभ्र वस्त्र विणतो पाऊस

ना राहीले कोरडे एकही तृण पान
मनाच्या गुहेत गडे झरतो पाऊस

तुझ्या स्मृतिंचे ओघळ मनातून येती
भरले ग डोळे आणि पडतो पाऊस

म्हणालास येतो,पण येशील रे कसा?
तुझ्या वाटेत कहर करतो पाऊस

दाटले आभाळ नाही व्हायचे मोकळे
तू भेटल्या शिवाय ना थांबतो पाऊस

एवढा पाऊस अन कोरडी मी सख्या
अशा वेळी ग परिक्षा बघतो पाऊस

चिंब झाला श्वास आत भिजलेत प्राण
सुरू होईल पडाया जिवाचा पाऊस

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 

आवडली !