सिनेमा सिनेमा

Submitted by देवनिनाद on 2 July, 2011 - 08:05

मायबोलीकर मित्रांनो,

मायबोलीच्या निमित्ताने आतापर्यंत कविता, विनोदी लिखाण केलं ... पण गेल्यावर्षभरात झी वाहीनी साठी लेखन करण्याची संधी मिळाली. आहे ती नोकरी सांभाळून झटपट लिखाण रसिकांना आवडलं ही खरचं रंगदेवतेची कृपा आणि आपल्यासारख्या मायबोलीकर मित्रांचे मिळालेले त्या त्या वेळचे फिडबॅक. असो.

फू बाई फू, जल्लोष गणरायाचा, बोल बाप्पा, व्वा काय सॉंग आहे, आलं आलं सिनेमावालं ह्या कार्यक्रमानंतर
मी झी टॉकीजसाठी एक नवा कार्यक्रम लिहीतोय. त्याची माहीती पुढीलप्रमाणे :

वाहीनी : झी टॉकीज
कार्यक्रम : सिनेमा सिनेमा
वेळ : दर रविवारी सकाळी ११ वाजता
लेखन : निनाद शेट्ये
दिग्दर्शक : समिर जोशी

वेळ मिळाला तर जरूर पाहा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा.

सस्नेह !!
देवनिनाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आग आग! Happy

कशा प्रकारचा कार्यक्रम आहे याबद्दल सांगु शकाल का?

बघुन प्रतिसाद देईनच परत.

`सिनेमा सिनेमा' मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील घडामोंडीवर माहीती देणारा ... कार्यक्रम आहे.

>>`सिनेमा सिनेमा' मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील घडामोंडीवर माहीती देणारा ... कार्यक्रम आहे. <<
अरे, याच नावाचा (आणि विषयावर) हिंदि सिनेमा (बच्चन साहेबांचं नॅरेशन) ८० च्या दशकात आला होता ना?