आमी लय बिजी.

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

आमी लय बीजी मानसं..

Happy Happy Happy

विषय: 

हा हा हा........
स्वतः बिजी र्‍हायचं आणि उभ्या घरादाराला बिजी ठेवायचं काम काय सोप्पं अस्तं होय?? Happy

काही पण, त्याने कुठे पसारा काढलाय? आईने केलेल्या पसार्‍याचं ओझं अंगावर वागवतो आहे बिचारा ! चेपला आहे त्याखाली तो, त्याला पसारा करायला उठता तरी येईल का? Happy

Happy

धन्यवाद. Happy

दिनेशदा, मी पसारा काढते आणि ती आवरून ठेवते. Happy

मनिमाऊ, त्या बास्केटमधे ती स्वतःच जाऊन बसलेय. Happy

एकंदरीत बाकीच्या खेळण्यापेक्षा तिला कपडे (तेही स्वतःचेच) खेळायला फार आवडतं. बहुतेक नीरजाला असिस्टंटगिरी चांगली करेल Proud

कित्ती गोडूली आहे ग.

माझ्या मुलीला पण पहिल्यापासुन सवय आहे. सुकलेले कपडे घरात घडी करण्यासाठी आणले की ते सगळे अंगावर घेउन लपुन बसते. मग कधीमनात आले की घड्या पण करुन ठेवते. मी साफसफाई करायला घेतली की ये ये करत आनंदाने उड्या मारते मग माझ्याबरोबर टेबल कपाटं पुसते, घड्या घालते.

नंदिनी - खरंच ! how very cute ! पण जपुन हां. एखाद्या दिवशी गाडी गडगडायची नाही तर. वजन नाही ना बास्केटला.
माझ्या पोर्‍याला पण वॉर्डरोब आवरायला काढला कि सगळे कपडे त्याच्या अंगावर फेकलेले आवडायचे. अगदी तो त्यात बुडुन गायब होवुन जाइपर्यंत. Happy

Pages