तुमचे आवडते सूत्रसंचालक कोण?

Submitted by गजानन on 29 June, 2011 - 04:51

मला हे सूत्रसंचालक आवडतात -

सोनू निगम
मंगला खाडीलकर
नीलेश साबळे
पल्लवी जोशी
रेणुका शहाणे

अमिताभ बच्चन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिरीराज तुम्हाला सिद्धार्थ विनायक पाटणकर म्हणायचंय का?
mbhure वनितामंडळात लीलावती भागवतांबरोबर नीलम प्रभू (करुणा देव) याही असायच्या.

मला वाटते की वनितामंडळात विमल जोशी असायची. जी प्रभाकर जोशी या रेडिओ अभिनेत्याची पत्नी. आणि कमलिनी विजयकर, प्रभू दिक्षीत हे "आपली आवड" सादर करायचे.... थोडे विषयांतर.

हल्ली सादरीकरणात अभ्यासाचा अभाव जाणवतो. पुर्वी सुहासिनी मुळगावकर, सुरेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत किंवा कार्यक्रनाच्या सादरीकरणात त्या आधी केलेला अभ्यास/ विचार दिसायचा. उथळ गॉसिपी न वाटता त्या माहिती पुर्ण असायच्या.

अन्नु कपुरने सादर केलेली अंताक्षरी पण मला आवडायची. प्रेमाने करायचा.

विमल जोशी प्रभाकर जोशींच्या पत्नी नाहीत. त्यांच्या पत्नीचे नाव इंदू जोशी.
विमल जोशी कामगार सभेत असायच्या.
प्रभू दीक्षित बातम्या द्यायचे ना?

दक्षिणा, भूषण, भरत, हो, रेडिओवरचे सूत्रसंचालक खास!

कामगार सभा वगैरे वाचल्यावर आकाशवाणीच्या आठवणींनी फारच नॉस्टॅल्जीक झालो.

विविध भारती, आपली आवड, सकाळी आठचाळीसची गाणी, रेडिओवरच्या जाहिराती, बाजारभाव, रविवारचे लहानग्यांचे कार्यक्रम (कार्यक्रमाचे नाव आठवत नाही), क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन आणि बरंच काही भराभर आठवलं. आणि रात्री नाटकाचं रोज थोडं थोडं प्रसारण असायचं. समोर रंगमंच नसायचा पण क्रांतीसिंह नाना पाटील वगैरे अगदी डोळ्यापुढे साकार व्हायचे!

सध्या स्टार प्रवाहच्या 'आनंदयात्रा' (रविवारी सकाळी असतं) मध्ये किती बोअर करतीये प्रिया बापट.

निलेश साबाळे, प्रिया बापट, शैलेश(तारक मेहता का उल्टा चश्मा मधला 'तारक मेहता')

आठवले कि सांगेन अजून नावं. Happy

अन्नु कपुर, पल्लवी जोशी, सुधीर गाडगीळ, मंगला खडिलकर, अमिताभ बच्चान, रेणुका शहाणे, सिद्दार्थ काक(सुरभी फेम), जितेंद्र जोशी, अवधुत गुप्ते, अमन वर्मा(एका हिंदी गेम शोचं सुत्रसंचालन करायचा), भाउ मराठे

Alex Trebek,Jeff Foxworthy,Tom Bergeron , Richard Karn and all time fav. Dick Clark Blush

सर्वात आवडता: अन्नु कपुर
रेणुका शहाणे
पल्लवी जोशी
सिद्दार्थ काक
सुनील बर्वे - रेडिओ सुरभी
प्राजक्ता दामले - खाद्यभ्रमन्ती
अमीन सयानी हे सगळे पण आवडतात

सकाळी fm rainbow rado वर गणेश आचवल काका (आडनाव नक्की माहीत नाही) खूप आवडतात

मधुरा.....प्रिया बापट?

http://www.maayboli.com/node/26724
या धाग्यावरच्या प्रतिक्रिया वाच.....फुल्टू तोंडसुख घेतलंय पब्लिक ने तिच्यावर Happy

शेवटी आवड आपली आपली.

आमिर खान ... (सत्यमेव जयते )
अवधूत गुप्ते ...(खुपते तेथे गुप्ते)

आणि
आदेश बांदेकर, मिलींद गुणाजी!!

डेरेक ओब्रायन, प्रभा जोशी, अमिताभ बच्चन, निखील वागळे (फक्त ग्रेट भेटसाठी), राजु परुळेकर, आमिर खान, अवधूत गुप्ते, अन्नु कपुर, मिलिंद गुणाजी, शर्वरी जमेनीस, भाऊ मराठे, कविता लाड, रेडिओ सखी ममता सिंग, आकाशवाणीचे सर्व पुरुष सूत्रसंचालक...
शिवाय आदित्य बाल, विकी रत्नानी, रॉकी आणि मयुर, अंबिका आनंद आणि भरत अरोरा (एनडीटीव्ही गूड टाईम्स आणि फॉक्स ट्रॅव्हलरवरचे बहुतेक सगळेच सूत्रसंचालक)

सुहासिनी मुळगांकर मला लख्ख आठवतात. बोलणं, दिसणं आणि हसणं सगळंच छान होतं त्यांचं! या सगळ्यात भारदस्त उंचीची भर. डोक्यातलं फुल आणि नेटकी साडी. मी खुपच लहान होते तेव्हा पण त्यांची जबरदस्त छाप पडली होती.

टिव्हीवरचे एकुण एक कार्यक्रम बघतात वाटत सगळे. वर सांगितलेल्या बर्‍याच जणांची नावच मी पहिल्यांदा वाचलीत इथे, काम तर लांबच

हे + चिन्ह असताना -४, -१० कसं दाखवत आहे ? - चही बटण आहे का? की मलाच दिसत नाही ? Happy
निखिल वागळे :- चर्चा भलतीकडे जाऊ देत नाही, भलेही समोरच्याचे बोलणे अर्धवट तोडतो. Happy

इथे रेडियो वरचे सूत्र संचालक चालतील का

मला रेडिओ मिर्ची वरचा पुरानी जीन्स सादर करणारा अनमोल
फार आवडतो
त्याच बोलण सुर्रेख असत

अन्नू कपूरला तोडच नाही. रेणुका शहाणे, पल्लवी जोशी मस्त.
जितेंद्र जोशी अभ्यासपूर्ण आणि रंगतदार सूत्रसंचालन करतो.
निलेश साबळेही मनोरंजन करतो. सचिन खेडेकरचा आवाज आणि शब्दफेक आवडते.
मराठी बातम्यांमध्ये एबीपी माझाचा मिलिंद भागवत उत्तम. आक्रस्ताळ्या पत्रकारितेमध्ये त्याच्या दहाच्या बातम्या खरोखरच ऐकणेबल आणि पाहणेबल असतात. अतिशय संयत आणि शांतपणे बातम्या देतो.

आताच ऐकलेला उच्च विनोद -
उदय निगुडकर - काल माझ रविंद्र ला जे भाषण होत..
निखील वागळे - मी ऐकले. फार छान झाल.
उदय निगुडकर - ते postpone झाल

सुदर्शन न्यूज वरचा एक गुबगुबीत सूत्रसंचालक आवडतो. इतर पेड न्यूज चॅनेलपेक्षा हे चॅनेल आपल्याला आवडते. त्यांनी निष्पक्ष असल्याचे दावे केलेले नाहीत हे फारच आवडले. सुब्रमण्यम स्वामींची मुलाखत या गुब्बूगुब्बूने घेतली तो एपिसोड माझा सर्वात आवडता आहे. दोघेही एकमेकांशी सहमत होते आणि सूत्रसंचालक गोष्टी कराव्या युक्तीच्या या पद्धतीने आवडते सिद्धांत सांगून स्वामींकडून कौतुक करून घेत होता हे दृश्य तर डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
अर्णव गोस्वामीची आदळआपट पाहण्यापेक्षा हा चॅनेल लावून बसण्याने मनोरंजन नक्की होते.

एक झलक
https://www.youtube.com/watch?v=M8PlU-DupHw

प्रशांत दामले - आम्ही सारे खवय्ये
रॉकी आणि मयूर - हायवे ऑन माय प्लेट , मस्त अँकरींग करतात हे दोघ

मनीष पॉल - सायन्स ऑफ़ स्टुपिड

सोनू निगम, फारूख शेख
शान,
महेश मांजरेकर :p

शाहरूख खान - हा माणूस काहीही विकू शकतो आणि काहीही सादर करू शकतो. सिरीअस टॉक असो वा सेन्स ऑफ ह्युमर पेरायचा असो, वा आपली एनर्जी त्या कार्यक्रमात ओतायची असो, आजच्या तारखेला खुद्द्द फिल्म ईंडस्ट्रीमधील सर्व मानाचे एवार्डस सादर करायला पहिली पसंती यालाच असते यातच सारे आले.

शाहरूखव्यतिरीक्त चांगले सादरीकरण करणारे आणि मला आवडणारे ...

अमिताभ बच्चन फक्त आणि फक्त केबीसी
सलमान खान दस का दम (बिग बॉस पाहिले नाही)
करण जोहर - कॉफी विथ द करन आणि फिल्मफेअर एवार्डस शो

मराठीत ...
निलेश साबळे - चला हवा येऊ द्या..
रितेश देशमुख - विकता का ऊतर एक बघायचो त्याचा..

फारूख शेख - जीना ईसीका नाम है - फार अदबशीर माणूस

साजिद खान - लहानपणी कुठल्याश्या फिल्मी गॉसिप कार्यक्रमात हा फार आवडायचा.

सायरस ब्रोचा - एम टीव्ही यो बकरा - ही सुद्धा लहानपणीची आवड

अजून एक लहानपणीची आवड म्हणजे बूगीवूगीचे जावेद नावेद रवी बहेल ईत्यादी..

निखील वागळे आणि रजत शर्मा (अदालतवाला) यांचेही सूत्रसंचालन बघायला आवडते.

क्रिकेटमध्ये - हर्षा भोगले - कमालीचे प्रसन साधेसुधे व्यक्तीमत्व

सोनू निगम, फराह खान आणि अनू मलिक हे त्रिकूट - ईंडियन आयडल जजच्या भुमिकेत

लास्ट बट नॉट लीस्ट - सचिन पिळगावकर - महागुरूंच्या भुमिकेत

वर अनू कपूरचे नाव काही लोकांनी घेतले आहे. अगदीच राहावत नाही म्हणून बोलतोय, त्याचे स्वत:बद्दल काही वेगळेच गैरसमज आहेत, आपण फार ग्रेट आहोत अश्या आविर्भावात वावर आणि बोलणे असते. त्यामुळे तो चांगले सूत्रसंचालन करत असूनही वा ती क्षमता असूनही ईरीटेट होते.

सूत्रसंचालनात अपवाद वगळता पुरुष कलाकारच आघाडीवर दिसतात हे एक सहज निरीक्षण.. माझी पोस्ट लिहून झाल्यावर जाणवलेले Happy

मनीष पॉल - Impromptu anchor आहे . म्हणून पहिला नंबर
आमिर खान , अन्नू कपूर , निलेश साबळे हे सगळे आलेच मागोमाग

त्याचे स्वत:बद्दल काही वेगळेच गैरसमज आहेत, आपण फार ग्रेट आहोत अश्या आविर्भावात वावर आणि बोलणे असते. त्यामुळे तो चांगले सूत्रसंचालन करत असूनही वा ती क्षमता असूनही ईरीटेट होते.
>>>
हे तू लिहावंस? Light 1

बाकी तुझ्या लिस्टीतल्या बर्‍याच नावांशी सहमत ( निलेश साबळे सोदून, बिग नो)

मला अवॉर्ड फंक्शन्स होस्ट करण्यात सैफ, शाहिद आणि कपिल शर्मा ही आवडतात (अर्थात शाहरुख टॉप वर)

मला पण मनिष पॉल फार आवडतो Happy खरंच उस्फूर्त फनी कमेन्ट्स आणि वन लायनर्स असतात त्याचे.
सोनू निगम, सैफ आणि शाहरुख बद्दल पण सहमत.

मोनिका लाल - ऐसा भी होता है
सिद्धार्थ काक, रेश - सुरभी
सतीश शहा - फिलिप्स टॉप टेन
बेंजामिन गिलानी - अंक अजुबे
हरीश भिमाणी - महाभारत (सूत्रधार - समय)
प्रणव रॉय - वर्ल्ड धिस वीक
जनवाणी - विनोद दुआ
पंडीत नेहरू (रोशन सेठ ) - भारत एक खोज
ओम पुरी (सूत्रधार) - मिस्टर योगी (मोहन गोखले) (मालिका अजिबातच आठवत नाही. नाव पण गुगल करावं लागलं. पण ओम पुरी आवडला होता तेव्हां)
जसपाल भट्टी - उल्टा पुल्टा, फ्लॉप शो
मॅथेमॅजिक शो - शेर्नाज पटेल (जी तलाश मधे आंटी झालीय) खूप लहान असताना पाहीलेली. मोठा होऊन हिच्याशीच लग्न करायचं असं घरी सांगितलं होतं.

रजत शर्मा खूप क्युट होस्ट आहे, आप की अदालत मध्ये त्याचं लबाड मिश्किल हास्य (मी आता अगदी साधा प्रश्न विचारतोय, पण हळूहळू तुम्हाला तुम्हीच खणलेल्या खड्ड्यात खेचून नेणार आहे अश्या भावात) मला आवडतं. आप की अदालत चे एपिसोड पण खूप मस्त असायचे.
तो एका चॅनल वर एक पंजाबी माणूस येतो (नमक नमक डाल देते है असं गाणं म्हणतो) तोही एकदम मस्त माणूस आहे.तो स्वत्:च्या रेसिपीज वर इतका खुश असतो की आपल्याला रेसिपी बघावीशी वाटतेच.
ऑस्ट्रेलियन मास्टरशेफ वरचा ऋषी देसाई पण. तो टी एल सी वर कोणतातरी शो करतो.व्यक्तीमत्व आणि संचालन दोन्ही चांगले आहे.
जुन्या बोर्नव्हिटा क्विझ कॉण्टेस्ट मधला दाढीवाला
अन्नू कपूर
(हल्लि टिव्ही बघायलाच मिळत नसल्याने यात मराठी होस्ट ची नावे नाहीत.)

जुन्या बोर्नव्हिटा क्विझ कॉण्टेस्ट मधला दाढीवाला - डेरेक ओब्रायन - सध्या तृणमूल काँग्रेसचे खासदार.
रेडियोवर अमीन सायानी आणि त्याआधी त्यांचे थोरले बंधू हमीद सायानी करायचे BQC.

पण क्विझ कॉन्टेस्ट म्हटलं की सिद्धार्थ बसू आणि त्याचं रॅपिड फायर आठवतं.

सुरभीवाले सिद्धार्थ काक. ते आणि रेणुका शहाणे मांडी घालून ताठ बसायचे आणि रेणुका दोन्ही हात जुळवून सुंदर नमस्कार करायची.

हे फारच जुनं आहे. बहुतेक डीडी मेट्रोच्या काळातलं. व्हॉट्स द गुड वर्ड - सबीरा मर्चंट.

अंताक्षरीत अनु कपूरच्या जोडीने रेणुका शहाणे आणि पल्लवी जोशी. दुर्गा जसराज फार अवघडलेली वाटायची. अन्नु कपूरच्या मागे ओढत जात असल्यासारखी.

दुर्गा जसराज ने त्याच वेळी झी हॉरर शो च्या एका एपिसोड मध्ये पण निळी कॉन्टॅक्ट लेन्स लावून काम केले होते.त्यातही अवघडलेली भूत दिसत होती.
सुरभी बेस्ट. रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ अत्यंत प्लिझंट होस्ट होते.

अमिताभ..केबीसी
अवॉर्ड शो..मनिष पॉल आणि कपिल शर्मा..
सायन्स ऑफ स्टुपिड..मनिष पॉल..

तो एका चॅनल वर एक पंजाबी माणूस येतो (नमक नमक डाल देते है असं गाणं म्हणतो) तोही एकदम मस्त माणूस आहे >>> हरपाल सिन्ग सोखी
ओहो ओहो हो हो.... Happy

Pages