गोला... टिंग..टिंग्... टिंग्...टिंग...टिंग्.. .टिंग्....टिंग.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 June, 2011 - 03:52

माबोकरांनो पावसाच्या गैरहजेरीने वातावरण तापलेल आहे. त्या वातावरणात हे गोळ्याच थंड नेत्रसुख.

१) ही आहे गोळा बनवण्याची मशीन (ती तर सगळ्यांनाच माहीत असते तरीही फोटो टाकतेय).

२) बघा बर्फ लावलाय. धिर धरा.

३) गोळ्याचा साचा म्हणजे आपले काचेचे ग्लास.

४) प्लेन गोळा तयार आहे लिंबु आणि मिठ लावुन.

५) कोणता रंग घ्यायचा ?

६) लाले लाल आम्ही उचलणार.

७) गोळ्यातूनही आमची देशभक्ती जागृत होताना दिसते. वाटल ना थंड ?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागू, जागू, जागू,......................
कित्त्त्त्ती दिवसात/ वर्षात खाल्ला नाहीये........... ए दे नागं मला पण ...............प्लिज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज Proud
दुष्टमेली Angry

छान! जुहू चौपाटीवरील गोळेवाल्या भैय्यांनी ह्या गोळ्यांना नावं पण ठेवली आहेत.
उदा.

हिरवा गोला: कच्ची कली
लाल गोला: लाल परी
अनेकरंगी: रंगबसंती

Happy

मस्त फोटो गं जागु नी आयडीयाही मस्त....

आम्ही ब-याच वर्षआंपुर्वी अलिबागला गेलो होतो तेव्हा गोळे खाल्लेले. आम्ही इतरजण एकेक खाऊन पुढे समुद्रकिना-यावर फिरायला गेलो, नव-याने मात्र तिथेच थांबुन गोळेवाल्याचा बर्फ संपवायला हात - सॉरी तोंडभार लावला Happy Happy

अहाहा मस्तच Happy
साधना आम्हीपण १२ वर्षापुर्वी अलिबागच्या किणार्‍यावर खाल्लेले Happy
रच्याकने परवाच एक मैत्रीण सांगत होती.. पुण्यात बाअजीराव रोडच्या जवळ कुठेतरी फेमस गोळा मिळतो.. आईसक्रीम + बर्फाचा गोळा Uhoh

जागु,
माझी प्रतिक्रिया ही सर्वात वेगळी असेल बहुतेक.
मला तु केलेलं वर्णन वाचायला आणि फोटो पहायला फार आवडले..
पण हा गोळा... Sad याच्याशी माझं सख्य कधीच झालं नाही.
माझ्या उभ्या आयुष्यात मी हा गोळा फार तर २ वेळा खाल्ला असेल.. Sad

ओये जागू धन्स!!! बर्‍याच दिवसांनी गोळ्याचे डोहाळे लागले... Wink
भर पावसात गोळा खायची जबरी इच्छा झालीय. मागे माथेरानला एको पॉईंटवर खाल्लेला मलाई हापूस गोळा आठवला.... काय गोडमिट्ट धम्माल गोळा होता तो!

आजोळी नालासोपाराला बोअरवेलचं पाणी! आम्हाला सवय नसायची. मग काय उन्हाळ्याच्या रखरखीत दुपारी पातेली घेऊन गोळेवाल्याच्या आवाजाची वाट बघायची... लाल्-पिवळे आंबट्-गोड ५-६ गोळे आणि एक्स्ट्रा रस घेऊन पातेली सावरत अंगणात मैफील भरायची. कामाने दमलेल्या जेवणांनी सुस्तावलेल्या माहेरवाशिणीपण झोप विसरून त्या गारेगार आंबटगोड चवीचा आस्वाद घ्यायच्या.... स्स्स्स्स्स्स्स्स्स्स त्या चविष्ट आंबटगोड आठवणी!!!

अगदी खरं दिनेशदा...
किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वर्गीय आनंद लपलेला असतो नै... आपण उगाच धावत असतो उर फुटेस्तोवर ...सुखाच्या शोधात!

किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वर्गीय आनंद लपलेला असतो नै... आपण उगाच धावत असतो उर फुटेस्तोवर ...सुखाच्या शोधात!>> खरय

अन फोटो लय झ्याक... Happy

निंबे अ‍ॅडीशनल काही पाहीजे ते आपण सोबत घेउन यायच.

वर्षू, अवल धन्स.

वित्तुबंगा (बापरे नाव तिनदा वर जाऊन पाहील टाईप करायला) पहीलांदाच नावे ऐकली. धन्स.

चातका बाळा इतक्या लहानपणी गोळा खाउ नये सर्दी होईल.

साधना, वर्षा हे गोळे पण मुरूड समुद्रकिनार्‍यावरचे आहेत.

मंदार, सांजसंध्या, पियापेटी धन्यवाद.

ड्रिमगर्ल तुमच वर्णन डोळ्यासमोर आल.

दक्षीणा का ग ? अग आम्ही मे महिन्यात वाट पाहात बसायचो ओटीवर घंटी वाजली की धावत रस्त्यावर जायच गोळा घ्यायला तेंव्हा २५ पैसे, ५० पैशांना मिळायचा आता ५ रु. १० रु. झाला आहे.

खर आहे दिनेशदा.
ह्या गोळ्याचा आनंद मॉलमधल्या आईस्क्रिमला येत नाही.

जागु,
गोळा मस्त असेल ना !
Happy

शाळा सोडल्यानंतर कित्येक वर्षात गोळा खाण्याचा योगच आला नाही, पण आता मात्र एकदा ठरवुन खाणार.

आई ग्ग्ग.... जागुटले... कसले सह्ही दिसतायत हे बर्फाचे गोळे .... तोंपासु.. Happy
त्यावर तो खास मसाला घालतात ना तो म्हणजे अगदी य्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.....
कधी खाणार हे?// Sad

जागु, सहीच! यावेळी आले होते तेव्हा ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये पेरु फ्लेवर गोळा खाल्ला होता. लेकीला तर चटकच लागली होती.

मस्तच! शिवाजी पार्कजवळ (जिप्सी हॅ।टेलजवळ) एक दुकान आहे, तिकडे मलई गोळा मस्त मिळतो... तिकडे गोळ्यांचे अगणित प्रकार आहेत...

Pages