" रिता "

Submitted by अवल on 26 June, 2011 - 01:14

माझी "रिती" ही कविता आठवत असेलच. त्याला हा वेगळा झब्बू Happy
"त्याच्या" सगळ्या प्रेयसींना एकत्रितपणे त्याची प्रेरणा कल्पून ही सुचली.........

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, भेटलीस तू मला
पण नाहीच देऊ शकलो, साथ मी तुला

बालपणीच्या निरागस प्रवासात, भेटलीस होऊन राधा
सोडून जाताना घेतला नाही, निरोप सुद्धा साधा

करून सारे समर्पण, बनलीस माझी रुक्मिणी
सुख्-दु:खांच्या तराजूत, झालो फक्त तुळशी

भेटलीस तारुण्याच्या मखमलीत, होऊन सत्यभामा
सोडताना फक्त लावून गेलो, प्राजक्ताच्या झाडा

आयुष्याच्या उतरणीवर, भेटली मज मीरा
दिला तिला प्यायला, एक विषाचा प्याला

आयुष्याची इतकी वळणे, चाललो अनेक वाटा
भोगले सारे सारे, शेवटी पण मी एकटा

देणे सार्‍या आयुष्याचे, पुरे फेडू जाता
तृप्त तुम्ही सार्‍या, मी मात्र रिता !

गुलमोहर: 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, भेटलीस तू मला
पण नाहीच देऊ शकलो, साथ मी तुला

आयुष्याची इतकी वळणे, चाललो अनेक वाटा
भोगले सारे सारे, शेवटी पण मी एकटा

देणे सार्‍या आयुष्याचे, पुरे फेडू जाता
तृप्त तुम्ही सार्‍या, मी मात्र रिता !
>>खास छान वाटले हे कडवे...! आरतीतै.

देणे सार्‍या आयुष्याचे, पुरे फेडू जाता
तृप्त तुम्ही सार्‍या, मी मात्र रिता !>>>> ही कल्पना मस्त आहे. आवडली. ही आहे खरी रिती वाल्या अवलची Happy

आयुष्याची इतकी वळणे, चाललो अनेक वाटा
भोगले सारे सारे, शेवटी पण मी एकटा

देणे सार्‍या आयुष्याचे, पुरे फेडू जाता
तृप्त तुम्ही सार्‍या, मी मात्र रिता !

खरंय !! आवडेश Happy

छान कविता...

देणे सार्‍या आयुष्याचे, पुरे फेडू जाता
तृप्त तुम्ही सार्‍या, मी मात्र रिता ! >> हे जास्त आवडलं... Happy

आयुष्याची इतकी वळणे, चाललो अनेक वाटा
भोगले सारे सारे, शेवटी पण मी एकटा

देणे सार्‍या आयुष्याचे, पुरे फेडू जाता
तृप्त तुम्ही सार्‍या, मी मात्र रिता !

अगदी सार्थ ओळी................सुन्दर

आयुष्याची इतकी वळणे, चाललो अनेक वाटा
भोगले सारे सारे, शेवटी पण मी एकटा >>> मस्तच लिहीलीस ग... एकदम आवडेश Happy