मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कैच्या कैच हां रॉबीन. अशी पाच एकसेएक मुलं असताना माईंनी रेशनचे त्रास, शाळेच्या अ‍ॅडमिशनच्या कटकटी, भाड्याच्या घरात राहतानाच्या विवंचना , व्याही-विहिणींच्या कुरबुरी, असं लिहायला हवं होतं का ? ते कोणी वाचलं असतं का ?

त्यात बाळ, लता, आशा, मीना, उषा याच्या पलिकडे काही नसेलच !>>>> अगदी बरोबर आणि त्यांचे "मालक" म्हणजे मा. दिनानाथ मंगेशकर यांच्याविषयीच्या आठवणी आहेत सगळ्या.

karadkar | 23 July, 2009 - 14:01
परवा मोनिका गजेंद्रगडकर यांचे 'भूप' हा कथासंग्रह वाचला. वाचताना सतत निगेटिव्ह फीलिंग येत होते एकही कथा पॉसितिव्ह नोट वर नव्हती. अगदी ५-६ कथा वाचुन इतकी मरगळ आली ना मनाला. याला उतारा म्हणुन मग आता मी परत किमया घेतलेय वाचायला. >>>>>>>>>

मिनोतीच्या या पोस्टच्या अनुषंगाने..
मोनिका बाईंचा दुसरा कथासंग्रह 'आर्त' वाचला. सगळ्या दिर्घ कथा आहेत. वाचून खरंच खूप नैराश्य आलं. मिनोती म्हणते तशी मनाला मरगळ येते. कथा संपता संपत नाहीत. भूप हा कथा संग्रह 'आर्त' पुढे बराच चांगला, सुसह्य वाटावा अशा सगळ्या कथा आहेत. मानवी सवभावांचे कांगोरे, वेगवेगळ्या नात्यांमधले सूक्ष्म पीळ अधोरेखित न होता कथेत घडणार्‍या घटनांचाच परिणाम जास्त होतो. त्यावर उतारा म्हणून थेट पी.जी. वुडहाउस किंवा बटाट्याची चाळ वा असा मी असामी. Happy
मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचं त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुलं आहेत' हे विसरले असावेत असं वाटण्याइतकं दु:ख केलं. त्यावेळी टिन एज मधल्या मोनिकावर त्या सगळ्याचा झालेला परिणाम त्यांच्या कथांमधून दिसतो का? 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, मोनिकाबाईंनी लिहीलेल्या लेखात त्या दिवसांबद्दल आणि या दुर्दैवी घटनेचा वडिल-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहीले आहे. तो लेख वाचल्यावर त्यांच्या कथा नैराश्यवादी का असतात ते थोडफार कळेलस वाटतं.
जाता जाता.. आर्त मधली शेवटची कथा - जन्म - पंडित रवीशंकर, त्यांची प्रथम पत्नी अन्नपूर्णादेवी आणि त्यांचा मुलगा शुभेंद्र शंकर यांच्यावर असावी असं वाटण्याइतपत दोन्हीत साम्य आहे.

Sakhidar असे पुस्तकाचे नाव आहे. लेखिका आठवत नाहि. कारण २/३ वषा पुर्वि वाचले होते. नायक आणि नायिकेचे फोन वरचे स.भाषण दिले आहे . "..........." असे .

मी नुकताच रत्नाकर मतकरींचा 'फाशी बखळ' हा कथासंग्रह वाचून संपवला. इतका काही खास नाही.
खेकडा, रंगाधळा आणि कबंध च्या तोडीचा नाही... किंवा मलाही वाचून वाचून सवय झाली असेल धक्क्यांची.. Proud

त्यानंतर कौझिया सईदचं टॅबू वाचायला घेतलं आहे.

जॅकपॉट म्हणून पुस्तक हाती आलं काल. लेखिक : सरिता वालावकर.
घोड्याच्या रेसवर पैसा लावणे हा त्यांच्या यजमानांचा शौक, त्यांच्यामुळे यापण त्याचा अभ्यास करून यात शिरल्या,
आणि भरपूर श्रीमंत झाल्या!
तर आता वय वर्षे ७० असलेल्या सरिताबाईंनी हे आत्मचरित्रात्मक पुस्तक काढलय.
मी पुर्ण वाचलं नाहीये अजून पण एक प्रकरण पुर्ण वाचल्यावर पुढची पन्नास साठ पाने वाचून काढली. ओघवती शैली आहे. बिनधास्त लेखन. आणि रेसमधल्या सारखेच वेगवान वाटले पुस्तक. Happy
मधे मधे अगदी खाजगी छायाचित्रे दिली आहेत (कुफरी येथे यजमान आणि बाई यांचा कश्मिरी पेहरावातला फोटो Uhoh )त्याचे प्रयोजन नक्की काय समजले नाही.
पण तरी आज रात्री हे पुस्तक पुर्ण वाचून काढणार!

Gone with the wind चा मराठी अनुवाद वाचला.. वर्षा गजेंद्रगडकर यांनी केलेला..
एकोणिसाव्या शतकातील अमेरिका, युद्धाच्या आणि त्यामुळे बदललेल्या "values" च्या पार्श्वभुमीवरील एका स्वार्थी पण वेगळा विचार करणार्‍या मुलीची प्रेमकहाणी!

Margaret Mitchell ने काय उभं केलय सारं! कादंबरी म्हणुन येणार्‍या काही त्रुटी वगळता (काही वेळा संथ वाटणारे लिखाण) बाकी मस्तच! ओरिजिनल वाचायचय आता.

प्रतिभा रानडेंचं १५ दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेलं 'फाळणी आणि फाळणी' हे पुस्तक वाचतोय. जीना फोकस धरून लिहिलेलं दिसतय पण सध्याच्या वादाचा संबंध नाही. कारण पाचेक वर्षापूर्वी तयरी सुरू केलेली होती...
पुस्तकाची सुरुवातच जुन १९४७ पासून होते....

मीना प्रभुंचं 'रोमराज्य' वाचलं. पुस्तक दोन भागांत आहे. मी पहिला भाग वाचला. त्यांच्या पूर्वीच्या पुस्तकांपेक्षा हे पुस्तक अजिबात वेगळं नाही. त्या एकट्या इटलीला गेल्याबद्दल असंख्य इटालियन नागरिक आश्चर्यचकित वगैरे होतात. लेखिकेच्या अतुलनीय धैर्याचं कौतुकही करतात. (हे असं कौतुक भारताही होत असेल का त्यांचं?) इटालियन लोकांना इंग्रजी अजिबातच येत नसल्यानं दर ३-४ पानांगणिक लेखिकेला आश्चर्यही वाटलं आहे. 'ही जगभाषा येत नाही, याबद्दल काहीच कसं वाटत नाही या लोकांना?' असंही एका ठिकाणी लिहून येतं. 'रोम ही इटलीची राजधानी हे तुला माहीत असेलच' अशी '.. हे तुला माहीत असेलच' याने संपणारी वाक्यं लेखिकेच्या प्रत्येक पुस्तकात असतात, तशी या पुस्तकातही आहेत. स्थळांची वर्णनं आणि त्यांचा इतिहास याशिवाय या पुस्तकात काहीही नाही.

पुस्तकातल्या ढोबळ चुका पाहून मात्र वाईट वाटलं. पुस्तक मौज प्रकाशनाचं आहे, आणि या चुका पाहून 'मौजेच्या पुस्तकात असं लिहिलं आहे म्हणजे ते बरोबरच आहे', असं कोणी म्हणून शकेल. इतके वाईट संपादकीय संस्कार मौजेच्या पुस्तकात बघायला मिळतील, असं वाटलं नव्हतं.

पुस्तकात बहुतांश ठिकाणी 'मध्ये' या प्रत्ययाऐवजी 'मधे' हा अशुद्ध प्रत्यय वापरला आहे.
'पक्ष्यांची'च्या ऐवजी 'पक्षांची' असाही वापर काही ठिकाणी झाला आहे.
फ्रेंच शब्दांचे उच्चार चुकीचे आहेत. 'रनेसाँ'च्या ऐवजी 'र्‍हनेसाँन्स' असा वापर सर्वत्र केला आहे. रेम्ब्रांट, मोनेट असे शब्द वाचले की डोकं उठतं.
आतंकवादी, प्रधानमंत्री असे हिंदी शब्द का वापरले, हेही कळलं नाही. 'पोटात हलचल मचली', 'त्या चौकात हलचल मचलेली दिसत होती' ही दोन वाक्यं वाचून मला गहिवरूनच आलं. तसंच 'कहार' हा हिंदी शब्द वापरण्याचं प्रयोजनही कळलं नाही.

इंग्रजी शब्दांचा वापर टाळून शक्यतो मराठी शब्द वापरले आहेत, असं प्रस्तावनेत लेखिकेने लिहिलं आहे. हे लिहावं लागलं कारण हल्ली मराठी लिहिताना मराठी शब्द वापरत नाहीत. पण लेखिकेनंही ते वापरलेले नाहीत. संग्रहालय हा साधा, सोपा शब्द असताना सर्वत्र म्यूझियम हा शब्द वापरला आहे. तसंच बासरी हा शब्द न वापरता फ्लूट. पोर्ट्रेट या शब्दाऐवजी राजा रविवर्म्यानं वापरलेला 'रूपचित्र' हा शब्द वापरल्याचं लेखिकेनं लिहिलं आहे. पण तरीही पुस्तकात असंख्य ठिकाणी पोर्ट्रेट, पोर्ट्रेट्स हे शब्द आढळतात.

अनेक चुकीचे मराठी शब्दही वापरले आहेत. 'वास्तुज्ञ' हा शब्द चुकीचा आहे. 'वास्तुतज्ज्ञ' असा वापर हवा. तसंच 'एक सुजन जोडपं आलं' असाही प्रयोग आहे. काही ठिकाणी काही शब्दांना 'वि' हा प्रत्यय लावला आहे. 'वि' या प्रत्ययाचा अर्थ विशेष, पुढे, अधिक असा होतो. पण म्हणून 'नटलेले' या विशेषणाला 'वि' लावून 'विनटलेले' असा शब्द तयार करायचा? 'हळू हळू' असा शब्द वेगळा का लिहायचा? बांगला देश, रसायन शास्त्र हे शब्द असे तुटक लिहिले आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचं नाव चुकवलं आहे. संस्थेचं ग्रंथालय अभ्यासकांना उघडं असतं, तिथेही लॅपटॉप वगैरे घेऊन अभ्यासक येतात, हे लेखिकेला ठाऊक नाही.

काही वाक्यं विनोदी आहेत. उदा. 'पंडित भीमसेनांची भैरवी ऐकली की मैफिलीत पुढे काही ऐकावंसं वाटत नाही.' तर काही वाक्यं आणि प्रसंग चीड आणतात. एखाद्या देशातल्या लोकांना इंग्रजी येत नाही, याचा किती बाऊ करायचा? तुम्हांला त्यांची भाषा येते का? मग त्यांनी तुमची भाषा बोलावी, हा अट्टहास का? तसंच, तुमची धार्मिक मतं इतरांनी मान्यच केली पाहिजेत हा दुराग्रह का? 'गाथा इराणी'मध्ये इस्लामवर हल्ला होता. हिजाब, बुरख्याबद्दलची सततची नाराजी होती. इथे तरुणी नन का होतात, धर्माचा समाजावर इतका पगडा का, हे प्रश्न लेखिकेला सतत पडतात. त्यात गैर काही नाही, पण लेखिकेला भेटलेल्या, मनापासून मदत करणार्‍या अ‍ॅनी नावाच्या ननवर चढवलेला शाब्दिक हल्ला वाचून अक्षरशः चीड येते. दोन दिवस लेखिकेला फिरवून आणणार्‍या अ‍ॅनीशी धर्माबद्दल होणार्‍या संभाषणाबद्दल लेखिका लिहिते ' 'एक नन आयतीच माझ्या तावडीत सापडली होती, आणि मी तिला चोपून काढत होते.' अ‍ॅनीला असणारं धार्मिक स्वातंत्र्य मान्य न करता लेखिका आपली बाजू मांडते. तरीही शेवटी अ‍ॅनी म्हणते - 'तुझं मत तुझ्यापाशी, माझं मत माझ्यापाशी. आपली मतं वेगळी असली तरी आपली मैत्री कायम राहू दे.'

आता दुसरा भाग उद्या वाचेन. Proud

.

आता दुसरा भाग उद्या वाचेन.>>>
घ्या अजुन हौस नाही फिटली का? Happy

पुस्तक दोन भागात म्हणजे दोन खंड आहेत?? च्यामारी पॉल थेरॉ इंग्लंड ते जपान रेल्वेतून किंवा कैरो ते केपटाउन रोडने जाउन एका खंडात लिहितो की Proud

>> 'पंडित भीमसेनांची भैरवी ऐकली की मैफिलीत पुढे काही ऐकावंसं वाटत नाही.' तर काही वाक्यं आणि प्रसंग चीड आणतात. >> Rofl

प्रभुणे बरोबर.

हो टण्या ६००-७०० पाने मिळून २ खंड आहेत.
अतिशय कंटाळवाणं आहे रोमराज्य (दुसरा भाग जरा बरा आहे.)
एखाद्याला शिक्षा म्हणून वाचायला द्यायला उपयुक्त.

चिनूक्स,अरे जरा जपून, त्या भावी मराठी साहित्यसंमेलनअध्यक्षा आहेत रे!! Proud
बघ हो त्यावेळी त्यांची मुलाखत घ्यायला तुलाच जावं लागेल,आणि तू ही सापडशील त्यांच्या तावडीत Wink

हं!!

वॉव, आता या करमणुकीसाठी तरी वाचावं रोमराज्य असं वाटतंय
हि:हि:हि:! मलाही असंच वाटतंय! याच करमणुकीसाठी मुद्दामून इराणवरचं प्रभूबाईंचं पुस्तक वाचलं होतं, आणि बाईंनी अज्याबात निराशा केली नव्हती. आता रोमराज्य. थ्यांक्स चिनूक्स.

<<'गाथा इराणी'मध्ये इस्लामवर हल्ला होता. हिजाब, बुरख्याबद्दलची सततची नाराजी होती. >> चिनुक्ष,
आपल्याला अनुमोदन. बुरखा हा इस्लामिक बायकाना अतिशय जवळचा विषय आहे. आपल्याला कुंकू मंसुत्राबद्दल वाट्ते तसेच. मलाही ते पुस्तक वाचताना त्यान्ची नाराजी पट्ली नव्ह्ती. ही पीडा घरी नको म्हणून घरचे त्याना तिकीटे काढून पाठवून देतात का? डायवर्सिटी अनुभवायला इतके जड का वाटावे. असो.

डॅन ब्राउन चे नवीन पुस्तक मी वाचून संपविले आहे. पत्ता विपूत दिल्यास भारतात कुठे ही प्रो. कू. ने पाठ्वेन.
एकदा वाचावे असे आहे. सर्व अमेरिकेतील्च स्टोरी आहे. मजेशीर आहे पण.

Pages