वड्यांचे सांबार -

Submitted by दिनेश. on 19 June, 2011 - 14:08
लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
मामींची आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खल्लास फोटो !

लग्नानंतर पहिल्यांदाच सासरी वडीचे सांबार करताना माझी सॉलिड तारांबळ उडाली होती. Happy

पुन्हा धन्यवाद. मामी, तुमच्या आईंचेही आभार.
काही लोक वड्यांवर खोबरं आणि खसखस लावतात.

अजून खासियत रेसिप्या लिस्ट दिली पाहिजे. तुम्हीच करुन फोटो आणि रेसिपी टाका. Lol

काय छान दिसताहेत वड्या आणि सांबार! प्रेझेंटेशन पण फार सुंदर आहे.पदार्थ उत्कृष्ट असणार यात शंकाच नाही, तो बघूनच तोंडाला पाणी सुटलंय्.

आहा, मस्त दिसतय एकदम. एकदम तोंपासु. आईला दाखवतेच. व्हेरीएशन्स सुध्दा छान वाटतायत. आणि मांडलय किती सुरेख. मला माहितच होतं तुम्हाला रेसिपी दिली की तिचं सोनं होणार. दिनेशदा तुम्हारा जवाब नही!

वड्यांकरता बेसन शिजवताना, भांड्यापेक्षा कुकरमध्ये शिटी काढणे सोपे जाते. सोर्सः डमीज गाईड फॉर वड्यांचं सांबार. Proud

अरे वा, सगळ्या दर्दी मंडळींची दाद मिळाली की !

लालू, नक्कीच पाठव. शाकाहारी करुन पोस्टेनच. मांसाहारीला प्रॉब्लेम इतकाच आहे कि सध्या खायला कुणी गिर्‍हाईक नाही.

मामी, आईची प्रतिक्रिया आणि सूचना नक्की कळव.

दिनेशदा ,रेसिपी आवडली .मी ही डीश अशी बनवते -
जाड तळाच्या पातेल्यात ,बर्‍यापैकी तेल घालून ते तापल्यावर त्यात जीर व ठेचलेली लसूण फोडणीला घालून त्यात अंदाजे पाणी घालून छान उकळ काढल्यावर त्यात तीखट ,हळद ,मीठ व धणापावडर घालून जाडसर दळलेल चण्याच पीठ या उकळत्या पाण्यात घालून एकजीव व्यवस्थीत गोळा होइपर्यंत घोटून घेते.मग हा गोळा एका ट्रेमध्ये लाटणीने लाटते .थोड्या वेळाने शंकरपाळ्यासारखे तुकडे करून त्यावर कोथिंबीर ,सुक खोब्र पसरवून छानशा पसरट बाउलमध्ये अँरेंज करते.
आता रस्सा-कढईत तेल गरम झाल्यावर त्यात धणे, लवंग ,मीरे,डाल्चिनी ,जायफळ परतवून आल लसूण परतवून वेगळ वाटून ते तेलावर लालसर मऊ झालेल्या कांद्यावर भाजलेल्या लालसर भाजलेल्या सुक्याखोबर्‍या बरोबर टॉमेटोसह बारीक वाटून हे मिश्रण तापलेल्या तेलात तेल सुटेपर्यंत परतून त्यात हव तितक थीक व्हायला पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून एक दोन उकळी काढते .
जेवताना बाउल मध्ये ग्रेवी घेवून प्लेट्मध्ये वड्या वेगळ्या घेवून चपाती बरोबर सर्व्ह करते .
यात तेल जास्त लागत असल्याने अगदी मुलाला ही डीश खावीशी वाटेल तेव्हाच बनवते सहसा नाही .

दिनेशदा ,आमच्या घरी फार वर्षापूर्वी स्वयंपाकाला एक बाई होत्या ,मुलांच्या आग्रहामुळे त्या ही डीश मोठ्या प्रेमाने बनवत असत ,त्यांच्याकडून मी शिकले .त्या मध्यप्रदेशातील इंदूरच्या .आमच्या घरी कोकणी पद्धतीने गोळ्याची आमटी सासरी ,माहेरी करीत असत ,ओल्या खोबर्‍याच्या रस गोळीची .ती झटपट करण्यासाठी कांदा, बेसन,तीखट्,हळद्,मीठ एकत्र कालवून मामी म्हणतात त्याप्रमाणे कुकरला लावून वड्या करून गोळ्याला पर्याय म्हणून चालत असे .पण मुलाना हा चटपटीत प्रकारच जास्त आवडत असे .

Pages