जीवनाची गती

Submitted by Manaskanya on 16 June, 2011 - 14:40

माझी प्रिय मैत्रीण नवीन नोकरी घेणार तेव्हा सुचलेली कविता.

तु आता दुर जाणार
मैत्री कायम असणार
पण सहवास दुरावणार

आपल्या रोजच्या गप्पा
तो मागचा रस्ता
आणि हा नवा टप्पा

खुप खुप आनन्द
थोड थोड दु:ख
हेच असत जीवन

जीवनाला गती असावी
तरच ते सुगन्धी होत
थाम्बला तो सम्पला
हेच आहे अन्तिम सत्य

तृप्ती

गुलमोहर: