श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?

Submitted by जागोमोहनप्यारे on 16 June, 2011 - 07:00

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला याबाबत फारसे कुठे स्पष्टपणे वाचायला मिळत नाही. इंग्रज, पोर्तुगीज आणि भारतीय अशा तीन्ही इतिहासकारानी वेगळीवेगळी कारणे दिली आहेत.

१. विषमज्वर- टायफाइड

२. आतड्याचा अ‍ॅन्थ्रॅक्स.. यात आतड्याला इन्फेक्शन होऊन रक्त्युक्त उलटी जुलाब होतात.

३. महाराजांवर त्यांच्याच एका पत्नीने विषप्रयोग केला.

महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विषम्ज्वर होता...............हे वाचन्यात आलेले आहे

१ किंवा २ पैकी काहीही असले तरी त्यात चर्चा करण्यासारखे काही आहे का?
खेरीज ३ टाकल्यामूळे "हेतू" बद्दल निश्चीतच शंका येते.

ता.कः अजून हुसैन चं श्राध्द नाही घातलय भाऊ, तुम्ही काहीतरी नविन "रचायच्या" फंदात दिसता? Happy

ता.कः अजून हुसैन चं श्राध्द नाही घातलय भाऊ, तुम्ही काहीतरी नविन "रचायच्या" फंदात दिसता?>> पण हुसैनचा TRP कमी झाला ना. आता नवे काही नको का?

तीन इतिहासकारानी जी तीन कारणे दिली आहेत, ती मी दिली आहेत. नेमकं कुणी काय कारण दिले आहे माझ्या लक्षात नाही.. नेटवर गुगलले तर तीन्ही कारणांची डिटेल्स मिळतील..

नको असेल डिस्कशन तर हा धागा बंद केलात तरी चालेल. इतिहासात सगळ्या महत्वाच्या व्यक्तींच्या मृत्युबाबत वाचायला मिळते. पण महाराज अवघ्या ५१/५२ व्या वर्षी गेले, हे मात्र सदैव गूढच राहिले आहे.

जामोप्या... महाराजांच्या मृत्यू ऐवजी त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, कार्याबद्दल चर्चा करणे उत्तम.

जामोप्या... महाराजांच्या मृत्यू ऐवजी त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, कार्याबद्दल चर्चा करणे उत्तम.>>>१००% अनुमोदन... चर्चा करण्यासारखे अजुन या जगात बरेच काही आहे....

गेलाबाजार आपण इ.कोली अन ऑर्गॅनिक खाद्य यावर चर्चा करु शकतो....:-)

अरे कमाल आहे नको नको म्हणण्यासारखे काय आहे त्यात ? महाराजांच्या कर्तुत्वाबद्दलचा आदर काही कमी होणार आहे का ? नाही ना ? माझ्याप्रमाणे अजुन बरेच लोक असतील की ज्यांना खरोखर उत्सुकता आहे की नक्की काय झाले असावे, एवढा लोकोत्तर पुरूष एवढ्या अल्पवयात जातो आणि त्याबद्दल इतिहासात फार माहिती नाही, चर्चा नाही (किंवा असल्यास ती आम्हा पामरांपर्यंत पोहोचली नाही).

३ नंबरचे कारण बहुतेक श्रीमान योगी मधे संदिग्ध स्वरूपात दिले आहे असे वाचल्याचे स्मरते.

सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेले काही....

Different sources have different reasons for death of this great human being.

Sabhasad, autobiographer of Shivaji, says – fever of type Navajwar.
British records says – Bloody Flux
Portuguess says – Abscess (Anthrax)
Mughals says – Vomiting of Blood.

The final conclusion drawn by historians was he died of Fever & Blood Dysentery.

चर्चा व्हायला काहीच हरकत नाही पण त्यातून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही.

ह्या कंपूबाजी आणि ब्रिगेडबाजीच्या काळात अजून एक वादग्रस्त विषय.....

अनुमोदन भटक्या. इथे चर्चा करुन काही नवीन मुद्दे/माहिती थोडीच कळणार आहे?

अरे कमाल आहे नको नको म्हणण्यासारखे काय आहे त्यात ? >>>>>> शिवाजी महाराज म्हणजे श्रद्दस्थान नाही का? आता ते आलं की परत आया बाहिणी, कलात्मक विचार ही येतीलच (कसे ते माहित नाही).

एकच विनंती...

जे कोणी इथे विधाने करतील किंवा माहिती मांडतील त्यांनी योग्य ते संदर्भ देऊनच माहिती मांडवी...

कृपया कादंबरीच्या आधारे वगैरे माहिती नको...

भावना दुखावल्याजाणं हा एक भाग झाला, ते सोडलं तरी त्यातून काही निष्पन्न काय होणार? समजा सिद्ध झालं की विषप्रयोग झाला होता, मग? पुढे काय? उपयोग आहे का काही त्याचा?

महाराज द्रष्टे होते.. त्यांना ३शे वर्षांनी महाराष्ट्रात काय काय होणारे हे जाणवले नि त्यांचा निराशेने अकाली मृत्यू झाला.

ह्या उत्सुकतेतून काही नक्की प्रस्थापित करता येईल का? ते गेले तेंव्हाचे कसलेही फोरेन्सिक पुरावे नाहीत. आपण कशाच्या बेसवर ठरवणार?

त्यापेक्षा भारतात लोकशाही कशामुळे हरली? असा बाफ काढा.. काही तरी सिद्ध होईल.. नि त्यातून झालच तर काही चांगल निष्पन्न होईल.

राजांचा जन्म कधी... मृत्यू कधी झाला ह्या पेक्षा आपण शिवचरित्र ह्यावर चर्चा - मते करायला हवी (त्यातही मतभेद होतीलच... :D)

शिवजयंती पेक्षा शिवचरित्र साजरे करायला काय हरकत आहे? ते जास्त महत्वाचे आहे नाही काय!!!

कधी कधी काही इतिहासातील गोष्टी माहीत नसणे, हेच चागंले, नाहीतर 'ध' चा 'म' होण्याचाही सभंव असतो.आणि चर्चा करायचीच असेल तर अफजलखानाच्या वधाची करा की , महाराजांनी नक्की कसा गेम प्लान केला? कशी व्युव्हरचना केली होती?...... त्यातून अजुनही काही रंजक गोष्टी बाहेर यायच्या बाकी आहेत.

"....मग? पुढे काय? उपयोग आहे का काही त्याचा?...."

@ मंदार जोशी ~ सर्व प्रतिसादातील अगदी उजवा प्रतिसाद. धन्यवाद. अगोदरच शासनाने आणि विरोधकांनी या लोकोत्तर पुरुषाच्या 'जन्मतारखे' विषयी आपापल्या परीने (निष्कारण) घोळ घालून लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने शिवजयंतीचे महत्व मराठी माणसाच्या मनी बिंबवले होते, त्याची पार वाट लावली. आज देशातील (किंबहुना जगातीलदेखील असेल) हे एकमेव उदाहरण असेल की, या राज्यात या महापुरुषाच्या दोन वेळा 'जयंत्या' साजर्‍या केला जातात आणि सत्ताधारी तसेच विरोधक या निमित्ताने महाराजांच्या नावाने आपली 'ताकद' दाखवितात. सर्वसामान्य नागरिक मात्र हतबलतेने दोन्ही वेळेला त्या मिरवणुकीतील प्रतिमेसमोर नतमस्तक होतो.

आता जयंतीचा "इश्यू" जुना झाला म्हणून यंदापासून महाराजांच्या "राज्याभिषेका"चा नवीन मुद्दा ऐरणीवर आणला गेला....आणि परवाच विरोधकांनी "शासन समजत असलेली राज्याभिषेकाची तारीख चुकीची आहे, म्हणुन मग आम्ही तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणात साजरा करणार...!" ~ करा...शासन तरी कशाला विरोध करेल ? आणि तसे या वर्षापासून नवीन तारखेचा राज्याभिषेकाचा नूतन जयघोष रस्त्यारस्त्यावर सुरू झालाही आणि वैताग आणणार्‍या ट्रॅफिकला न जुमानता कॉर्नर कॉर्नरवर मोठमोठे बॅनर्स आणि तितकेच ते 'स्पॉन्सर' करणारे गल्लीगल्लीतील शिवराळ शिवाजीही सफारीमधील फोटोसह तिथे झळकले.

दोन जयंत्या....दोन राज्याभिषेक....मग आता चला राहिले काय...तर मृत्युदिनांक... आज इथे 'त्या' कारणावर चर्चा होईल, तर उद्या त्याच्याही दोन तारखा उपटतील आणि मग 'मागील अंकावरून पुढे चालू..."

@ पक्का भटक्या ~ तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चर्चा करायचीच असेल तर राजांच्या चरित्राविषयी, त्यानी घालून दिलेली राज्यपद्धती, रयतेची काळजी, युद्धकौशल्य यावर नव्याने काही हाती लागेल का यावर चर्चा होणे उचित आहे. अनुमोदन.

या महाराष्ट्र देशी "शिवाजीराजे भोसले" नामक व्यक्ती जन्माला आली होती आणि तिने कधीही न पुसला जाणारा असा आपल्या पराक्रमाचा ठसा उमटविला आहे आणि ते कार्य चालू असतानाच निसर्गनियमानुसार त्याना एके दिवशी मृत्यु आला....या दोन घटना जर आपल्याला मान्य असतील, तर मग ते जन्माला केव्हा आले, आणि मृत्युमुखी केव्हा (वा कशाने) पडले, यात शक्ती घालवणे हे वृथा कार्य होईल.

(काहीसे अवांतर : कित्येकांचे...इथेच नव्हे तर अन्यत्रही...असे मत पडले आहे की, वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांचा मृत्यु झाला म्हणजे ते 'अकाली' गेले. पण त्या काळातील औषधविषयक सोयीसवलतींची उपलब्धता पाहता पन्नाशीनंतरचे आयुष्य हे 'वृध्दापकाळा'चे असणार. ज्ञानेश्वर राहू दे, पण तुकाराम तर चाळीशीतच परलोकवासी झाले...थोरले बाजीराव, माधवराव आदी इतिहास बदलून टाकण्याचा दर्जा आणि कर्तृत्व असणारे गुणी राज्यकर्त्यानीही तिशीपूर्वीच रामराम घेतला होता. कारण कोणतेही असो, पण आजच्या वयोमानाच्या साखळीत सोळाव्या, सतराव्या शतकातील लोकांचे मृत्यु जोखू नयेत....मेडिकल फॅसिलिटीजच्या दृष्टीकोनातून)

Pages