पुन्हा एक वटपौर्णिमा....

Submitted by सुनिल जोग on 15 June, 2011 - 02:19

वीस किंवा ५० वर्षानी आजच्या वटपौर्णिमेकडे ( व्.पो.) त्यावेळची पिढी पाहिल त्याचे व्हिज्युअल आज करून ठेवले - पाहू पचते का.
ती: काल संध्याकाळपासून सासुबाई आठवण करत होत्या उद्या व्.पो आहे लक्षात आहे ना?
काय सांगणार त्यांना? मोबा ला रिमांयडर लावला होता ना? पुन्हा तेच तेच शी: किती पिळतात.
पण ठोंब्याची आई सॉरी आइसाहेब आहे ना? परत त्याचा मूड जायचा.
सवयीने फेस पॅक केल्यासारखे म्हटले: हो ना विसरलेच होते. उद्या उपास करायचाय.
तुम्ही काय करणार? शाबूदाणा खिचडी ? की फ्रुट डीश?
सा.बा.: आता या वयात कशाला? थोडंसं दुध घेईन वाटलं तर एखादं फळ चालेल
ती: म्हातियं. आता नको म्हणेल आणि खमंग वास आला की येइल डोकवायला.म्हणजे डीशभर खिचडी फस्त.

नवरा उगाचंच मागे मागे करेल. उसना श्रूंगारिक होईल आणि लाडेलाडे बोलेल. मला माहित आहे आज तो गजरा पण आणेल. (मनात भिती असेल यावर्षी पण.. माझ ७ जन्माचं काँट्रॅ़क्ट मी रिन्युअलला टाकेल की नाही) नाहीतर या ठोंब्याला कोण ७ जन्म सांभाळणार ? सतत किरकीर... पैसा पैसा. कुठं जायला नको यायला नको. मागच्या वर्षी ती सँडी बँकॉकला जाउन आली काय मस्त शॉपींग केलं. आणि आमचा ठोंब्या साधं महाबळेश्वर ला चल म्हटलं तर म्हणतो कसा मग आई बाबांना कुठं पाठवायचं. चिनूला कोण सांभालणार ? मी अशीच म्हातारी होणार.
जाउ दे.आज मेडीकल डोमेन वर ट्रान्स्फर होणार आहे असं काल टी.मॅ बोलला होता. त्याला थोडा मस्का मारायला हवा. तेव्हढाच रिलिफ मिळेल. मी पण आता पकले आहे ३ वर्षे तेच तेच काम करुन.

साबा: मग आज साडी कुठली नेसणार आहेस? ती परवा सुमनच्या लग्नात घेतलीय ती नेस हवं तर.
ती: अग बाई आजच डोमेन चेंज होणार.. मग सारेजण सिलेब्रेट करणार आणि अशा प्रसंगी साडी ??? शी: कसं कळत नाही यांना ? मी काही काकूबाई नाही.खरंतर आज माझी पॉयझन जीन आणि वर सँडी ने आणलेला मस्त टॉप टाकणार होते.तर या बाईने लावला का नाट? शिवाय टू व्हीलरवर साडी म्हणजे अख्खा रस्ताभर बॅनर लटकल्यासारखं वाटतं.

जाउ दे. आयडीया... वाटेत सँडीच्या घरीच साडी चेंज करेन आणि जीन टाकेन. अ‍ॅडस्ट्मेंट दाय नेम इज आयडीया. क्या आयडीया आहे सरजी...!
शी: कोण हा पकवैया? कोणाची ही आयडीया - वटपौर्णिमेची?
साबा: अगं वटाची फांदी आणलीस का? काल मंडईत होती विकायला?
ती: पाहीजे होते ७ जन्मभर तुमच्या मुलाला तर सांगायचीच ना त्याला (हे सगळं मनातल्या मनात)
हो आई.काल येतानाच आणली. (खरंतर ऑफिसमधल्या सार्‍या जणीनी आधीच प्लॅन केला होता आणि शिपायला बुक करुन ठेवलं होते २५ फांद्या आणून द्यायला - याना कळलं तर नणदेसाठी पण मागतील म्हणुन मीच गप्प बसले होते).
सा.बा: तशी गुणाची आहे पोर पण नवीन पिढी. आठवण नको का करून द्यायला. आपली संस्क्रुती आहे ना आमच्याशिवाय कोण जपणार?
ती: हो ना संस्क्रुतीचा ठेका फक्त तुम्हालाच दिलाय (हे ही मनातच)
आई खरंच तुम्ही असलात की मला काही काळजी नसते.
सा.बा: हो गं बाळा.म्हणून तर इथे रहाते तुझ्या मुलांना सांभाळत
(नाहीतरी गुडघे दुखतात, याना दम्याचा त्रास तरी आम्ही करतो पण कौतुक नाही शब्दाचं)
ती: (उपकार करता? अहो १० तास कष्ट करते. दोघे राबतो म्हणुन हा फ्लॅट झाला नाहीतर त्या चाळीतच आयुष्य काढायला लागले असते. साधं टॉयलेट पण शेअर करायला लागायचं).

तो: आज व.पो. हिला उपवास. आपली मजा. घरी खिचडी चापायची. रात्री ऑफिसची पार्टी आहे. बटर चिकन आणी बिर्याणी. मजा. कालच गजरा आणलाय. वीकेंड ला एक डिनर आणि नाईट आउट पिकनिक करावे महाबळेश्वर नाहीतर माथेरान तरी. पण हिला म्.ब. का आवड्त नाही कुणास ठाउक?

ती: (ऑफीस - लंचब्रेक मधे) : सँडी आज लंचबॉक्स मधे काय आणलंस?
सॅ: बोनलेस चिकन आणि सॅमी
सीमा: आई ग्गं! तोंडाला पाणी सुट्लं
सॅ: मग घे ना यातलं
ती: अग सीमा आज व.पो. ना?
सीमा: ते काय खुळ आहे बाई.
ती: अगं असं काय करतेस आज उपास्,पुजा, ७ जन्म हाच नवरा हवा असं मागणं मागायचं असतं
सॅ: व्हॉट? ७ जन्म? शीट... यार
सीमा: अग हाच जन्म कसाबसा काढतेय आणी ७ जन्म ? सॉलीड गोची.
सॅ: नो व्हरायटी? ई किती बोअर प्रकार इट इज .. इजण्ट?
ती: अगं खरंतर मला पण पटत नाही पण संस्क्रुती आहे आपली.
सॅ: ए घाटीण बाई. पुरे ह.चल ही बिर्याणी घे तुझ्या साठी आणलीय खास.
ती: नको ग.. आज तरी.
सीमा: तुझा ठोंब्या आज तिकडे ऑफिसमधे लाईन मारत असेल आणि तू बस उपास करत.
सॅ: खावो पिओ मजा करो. कल किसने देखा है.
उद्या बी.पी,डायबेटीस लागलं तर याचे पण वांदे होतील. घे गं थोडं.घरी कशाला सांगत बसतेस सारे?
सीमा: घाटीणबाई घ्या थोडं. मी पण उपास करेन संध्याकाळपुरता तुझ्यासाठी. चल पुढच्या जन्मासाठी तुझं बुकींग करते. मी नवरा होईन तू आपली बायकोच रहा म्हणजे माझी जेवणाची सोय झाली.

ती संध्याकाळी घरी येते.. नवरोबांचा मोबाईल वर sms अर्जंट मीटींग आहे टार्गेट साठी. उशीर होईल. तु जेउन घे.तिने ओळखले.
साबा: सुनबाई चल जेवायला बसू.
ती: नको साबा. मला अ‍ॅसिडीटी झालीय.
साबा: अगं तो पण उशिरा येणार आहे.तू पण सणासुदीला जेवणार नाहिस कसं काय व्हायंचं गं?
ती: बघू. उद्या सकाळी खाईन
कोपर्‍यात वडाची फांदी हळूच हसत होती. देव्हार्‍यात सत्यवान सावित्रीचे चित्र केवीलवाणे दिसत होते.
दिवस जात होते....

गुलमोहर: 

वा! मस्त. मी २०११ मधेच आज, नवर्‍यासकट, सकाळि मस्त चहा- तुप लावलेला पराठा खावुन आले, वर त्याला Happy Vatpornimaम्हणुन आले.

आणि अशा प्रसंगी साडी ??? शी: कसं कळत नाही यांना ? मी काही काकूबाई नाही.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> Uhoh

मी तर आज मस्त silk ची साडी नेसून, नथ घालून office ला आलेय........
मला आवडतं आपले सण पारंपारिक पद्धतीनं साजरे करायला..........

वीस किंवा ५० वर्षानी ?????
वीस आणि ५० या मध्ये ३० वर्षांची म्हणजे जवळपास एका जनरेशनची गॅप आहे हो!

आमच्या पिढीतल्या स्त्रिया वीस एक वर्षांनंतर सासु च्या भुमिकेत शिरलेल्या असतील. आमचेच साडी नेसायचे वांदे आहेत तिथे आम्ही कुठे आमच्या सुनांना साडी वगैरे नेसा असे सांगणार!!!! आम्ही पंजाबी ड्रेस चा आग्रह करतोय आणि सुना रीव्हीलिंग कपडे घालायची बात करतायत असे चित्र तरी रंगवायचे. Wink

हे तर आत्ताचच चित्र आहे! २०-५० वर्षानंतर वेगळं असेल! त्यावेळेपर्यंत असे सण अस्तित्वात असतील का?

धन्यवाद सर्वाना!
निंबुडा अहो तुमची सजेशन मान्य आहे. मनात तसं आलं देखील होतं पण?..... पण संस्क्रुतीरक्षकांची भीती आणि काळजी वाटली. न जाणो एखादा मोर्चा यायचा म्हणून थोडंसं सौम्य केल इतकंच .

काय जोगबुवा? हे तर आताचेच चित्र!

साडी नेसून कुटय जायच आसल तर रिक्षा, कार किंवा येसी बसच लागती आम्हास्नी. सध्या पेट्रोल वाढलया, साडी परवडत न्हाई बर का?

Happy

निंबूला अनुमोदन! Proud निम्बे.. इचार कर की व्हिएत्नामी सुनेला तू इंटरनेटवरून वटसावित्री व्रताची कथा सांगतेयस नि ती इथे कॅनेडात कुठला वड? तुमचा मुलगा ऑस्ट्रेलियाला आहे नाही तर.. नेक्स्ट ख्रिस्मसला इंडियात आलो तर बघू.. अस काही तरी सांगत असेल. Wink