युसुफ मेहेर अली सेंटर (भाग ३ - सुतारकाम, साबण फॅक्टरी)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 June, 2011 - 06:45

भाग १ दर्शनी भाग आणि तेलाची फॅक्टरी - http://www.maayboli.com/node/26346
भाग २ कुंभारकाम - http://www.maayboli.com/node/26353

कुंभारकामाच्या समोरच सुतारकाम चालते. पण तिथेही त्यादिवशी कोणी नसल्याने तिथे मिळतील ते फोटो घेतले.

१) ही मशीन सुतारकामाची आणि विलायती लोकांनी काहीतरी बनवण्यासाठी केलेले शेप. तेथील माणसाने सांगितले की त्यांना घोडा बनवायचा होता.

२) तिथे सुतारकामासाठी लागणारे ओंडके.

३) तिथे तयार असलेली खुर्ची

४) टेबल

५) आता जाउया साबण फॅक्टरी मध्ये. इथे कपड्याचे, अंगाचे साबण आणि फिनेल तयार करतात. इथे प्रवेश केल्यावरच साबणाचा सुगंध स्वागत करतो.

६) साबणासाठी लावणारे काही साहित्य

७) साबणाच्याही नुडल्स असतात Lol

८) ह्याच त्या नुडल्स असाव्यात.

९) इथे लिक्विड सोप किंवा फिनेल बनत असेल.

१०) तिथे ह्या बाटल्या रचलेल्या होत्या लेबल लावण्यासाठी

११)

१२) साबण बनवण्याच्या मशिन

१३) इथे काम चालु असते तर पहायला खुप छान वाटल असत.

१४)

१५) ह्याच्यातुन साबणाची पट्टी निघतोय बहुतेक.

१६) इथे साइझमध्ये वड्या कापल्या जातायत.

१७) साबणाला कव्हर घालण्याचे काम फक्त चालु होते आम्ही गेलो तेंव्हा.

१८) हे सँडल फ्लेव्हरचे साबण. मी घेतले वरचे आणि हे सँडलचे खुप छान आहे वास दोघांचाही. आणि साबणाची कॉलीटीही चांगली आहे.

पुढील भागात बापु कुटी व शेती.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागू, साबणाची प्रोसेस तशी सोपी असते. अगदी पुर्वी प्राणिज चरबी आणि राख मिसळून साबण तयार करत असत (निसर्गात तो असाच तयार झाला, आणि त्याचा शोध मानवाला लागला )

आता कॉस्टीक सोडा आणि तेल मिसळून साबण तयार करतात. कॉस्टीक सोडा पाण्यात मिसळला कि त्या द्रावणाचे तपमान खुप वाढते. त्यात तेल मिसळले आणि बराच वेळ ढवळले कि थोड्या वेळाने साबण आणि ग्लिसरिन वेगळे होतात. ते वेगळे केले, को बाकीच्या साबणात हवा तो रंग आणि सुगंध मिसळला जातो.

अगदी पुर्वी आपल्याकडे मटन टॅलो वापरत असत. मग त्यावर कायद्याने बंदी आली व केवळ वनस्पतिजन्य तेलेच वापरण्यात येऊ लागली. पण खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने, इतर तेलांचा वापर होऊ लागला. राईस ब्रान ऑईल, सरकीचे तेल वगैरे वापरण्यात येऊ लागले. या तेलांचे गुणधर्म लक्षात आल्यावर, वनस्पति तूपात पण त्याचा वापर होऊ लागला.

जागू, टेबल म्हणून खुर्चीचाच फोटो दिसतोय.
जर तिथे कुणी असते तर साबणासाठी तेल कुठले वापरतात, त्याची पण माहिती मिळाली असती.

अरे वा हे सगळं काम हातानी होतं? अगदी साबणाला कव्हर घालणं सुध्धा ? मला वाटायचं की मशीन नी होत असेलं? बाजारात तयार प्रॉडक्टस बघताना, लक्षात ही येत नाही कि त्या मागे किती कष्टं असतील.

सायन्स चॅनलवर How it is made हा कार्यक्रम असतो. साध्या साध्या वाटणार्‍या वस्तू प्रत्यक्षात बनवायला किती किचकट असतात हे अगदी डिटेलवार बघायला मिळतं. कधी मिळाल्यास जरुर बघा.

निराली मलाही तसच वाटायच. म्हणून असे प्रोजेक्ट आपल्या मुलांना दाखवणे गरजेचे आहे. \

सायो नक्की बघेन.

जिप्सी धन्स.

मस्तच

फारच छान , मार्च महिन्यात कर्नाळा ट्रेकच्या वेळेला आम्ही या सेंटरला भेट दिली होती. वर्कींग डे मुळे प्रात्य़क्षिक ही बघायला मिळाले होते.व थोडी ख्ररेदी ही केली होती.तिथे मिळणार्‍या कोकमसरबताची चव इकदा तर घेऊन बघा खुपच छान आहे.या लेखामुळे पुन्हा जाऊन आल्यासारखे वाट्ले.