सुखाचे झरे

Submitted by सुनिल जोग on 12 June, 2011 - 01:12

तसं पाहिलं तर ते एक चवकोनी सुखी कुटूंब! रिटायर्ड आईवडील - दोघेही पेन्शनधारक्,सुशिक्षित्,मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर - सुस्थितित आणि ठिकठिकाणी पोस्टींग्ज, प्रमोशन्स, परदेश वार्‍या - सुसंस्क्रुत घरातून आलेली सून - ती पण उत्साही आंत्रेप्र्युनर- नुकताच एक नवा व्यवसाय सुरू करुन वार्षिक उलाढाल ६० लाखापर्यंत स्वतःच्या हिंमतीवर पोचलेली आणि ९ वर्षाचा अवखळ्,हुशार नातू.
सुखी कुटूंबाची व्याख्या या पेक्षा वेगळी काय असु शकेल ?
पण काही वेळा नियतीला किंवा दैवाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या वर्तन शैलीचा अभ्यास करुन योग्य ती सुधारणा न केल्यास काय गंमत होते ती पहायला मिळाली आणि एक सुखी झरा पहाता पहाता आटला आणि त्याचे वैराण वाळवंटात रुपांतर झाले त्याची ही कथा!
झाले असे की आईना व्रुद्दापकाळाच्या काही व्याधी सुरू झाल्या आणि बिचारे वडील शक्यतो सर्व उपाय करुन पहात होते. पण व्रुद्दत्वाकडे झुकतानाच आपल्या वैगुण्याचे कंगोरे त्यानी अधिकच तीक्ष्ण आणि धारदार केले आणि आजारपणाचे भांडवल करून ते स्वतःच्या नकळत किंवा unintentionally स्वत:च्या संसारावर आणि पर्यायाने मुलाच्या संसारवर त्याचे वार चालवू लागले. त्यामुळे ते दोघे स्वतः घायाळ्,एकुलता एक मुलगा जखमी आणि सुनबाई रक्तबंबाळ असं चित्र निर्माण झाले. आईवडीलांचे हे सारे दुर्गुण मुलाने दुर्लक्षित केले. स्वतः आणि कुटूंबीय घायाळ होते आहेत हे कळूनदेखिल त्याने हे सारे सोसले. पण हा माझा फ्लॅट्,माझ्या पैश्यानी घेतलाय हे नाणं गुळगुळीत झाले हे आईवडील विसरले.मुलाचा मित्रपरिवार आला की हेतुपूर्वक दिवाणखान्यात बसून टीव्हीच्या रडकथा पहाणे, ठराविक वेळेला सिरीयल पहायला मिळाली नाही की तिरकस टोमणे मारणे याचा परिमाण अप्रत्यक्षरित्या नातवावर होतोय हे देखिल त्याना समजेना. आयुष्यभर नोकरीत साहेबाशी जुळवून घेणार्‍या त्या पेन्शनराना मालकीहक्क गाजवायला एकच ठिकाण - मुलाचा संसार! त्यांना वाटायचे की मुलाचे संगोपन केलेय म्हणजे त्याच्यावर उपकार केलेय आणि म्हातारपणी मुलाने त्याची परत फेड करायला ती काही इन्व्हेस्ट्मेंट नव्हती. हा न्याय कुठली सुन मान्य करणार? हे त्यांनी तरी त्यांच्या तरूणपणी मान्य केले असते की नाही हे देवालाच ठाउक. पण इथे मात्र नाही.
शेवटी परिस्तिथी हाताबाहेर जातेय असे पाहुन मुलाने जवळच एक मोठ फ्लॅट घेतला आणि आपण सारेच तिकडे शिफ्ट होउ असा प्रस्ताव मांडला. साधा सरळ व्यवहार होता पण प्रत्येक पांढरपेशी मध्यमवर्गियांच्या मनात 'नटसम्राट' मधला अप्पा बेलवलकर हॅम्लेट सारखा मानगुटीवर बसलेला असतो.आणि आपली देखील बेलवलकरासारखी शोकांतिका होईल असा भयगंड त्यांच्याही मानगुटीवर बसला असावा आणि त्यानी हे प्रपोझल धुडकाउन लावले. ते दोघेच त्यांच्या फ्लॅट मधे राहू लागले. झाले काय तर 'संध्याछाया' मुले नैराश्य्,प्रक्रुतीची हेळसांड आणि आनंदाल विरजण....
आर्थिक् बाजुने विचार केला तर मुलाला थोडा रिलिफ मिळाला असता,त्याचीही आर्थिक प्रगती झाली असती. पण.... पण.... या एकाच 'पणा'ने घात केला.

'मी','माझे' या शब्दानी वैराण वाळवंट निर्माण झाले. खरंतर हा सुखाचा झरा त्यांनी स्वतःच निर्माण केला होता, तो कष्टानी शिंपला,फुलवला,आणि स्वतःच्या हातानी नष्ट केला आणि वर नशिबाला दोष दिला. काय म्हणावे या वागण्याला ?
तेव्हा मित्रहो आपले हट्ट काळानुसार्,वयानुसार सोडा,बदला,परिस्थितीशी मिळते जुळते घ्या,तडजोड करा आणि सुखाचा झरा झुळझुळ सुरु ठेवा एवढेच मागणे लई नाही.

गुलमोहर: 

छान आहे.. टाळी दोन्ही हातानेच वाजते.. फक्त सासु सासर्यां ची चुक नाहीये-नसते.
सगळ्यांनीच जुळवुन घेणे हा एक्च उपाय. शिवाय ह्या म्हातार्यांनी अयुश्य भर खरच खस्ता खाल्या असतात मुलांसठी.. म्हातार्पणी गरज असते कुणी तरी सवरुन घ्यायची.. हे आपण समजायला हवय..

सुनिल नेमकं मांडलयस. आपल्या आसपास ,असली परिस्थिती असलेली कुटुंबं हजारोंनी दिसून येतात. आजकाल सर्वांना अगदी टीनएजर्स पासून आजोबांपर्यन्त, 'स्पेस' लागत असते स्वतःची अशी. परिस्थितीशी मिळते जुळते घेणे, अ‍ॅडजस्ट करणे हे दोन्ही वर्गांना नेहमी जमेलच असं नाही.. पण थोडा समन्वय साधला तर 'बिग फॅमिली हॅपी फॅमिली' चं चित्रं साकार होऊ शकेल..