योगगुरु आणि दुसरा गांधी

Submitted by SHANKAR_DEO on 10 June, 2011 - 02:14

सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला आपल्या विरोधात बोललेले आवडत नाही. घड्याळवाल्यांचाही तोच मार्ग आहे. अण्णांच्या जंतरमंतरवरील उपोषणानंतर बाबा रामदेवांना उपोषण करण्याची लहर आली. बाबांनी ह्यासाठी अर्धाअधिक देश पिंजून काढला होता. आण्णांनी पहिले उपोषण मागे घेतल्यावर काही ठीकाणी जनजागृती सुरु केली. अण्णांचा मुद्दा लोकपाल विधेयक हा होता तर रामदेव बाबांनी भ्रष्ट्राचाराबरोबर परदेशातील काळा पैसा हा मुख्य मुद्दा बनविला. अण्णांच्या आणि बाबांच्या आंदोलनात फरकाचे मुद्दे बरेच आहेत. अण्णा हजारे स्वत:बद्दल बोलता बोलता आंदोलन कशासाठी आहे हे मोजक्या शब्दात सांगतात तर रामदेव बाबा सकाळ दुपार संध्याकाळ वार्ताहर परिषदा घेत बोलू लागतात. आपल्या मिडीयातील पत्रकार तर बाबांना वाटेल ते प्रश्न विचारत होते. जणू काही सत्ताधारी कॉंग्रेसची सुपारी घेऊनच ते आले होते. बाबाही भाबडेपणाने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते आणि मिडीयावाल्यांनी यातूनच तर्कट निष्कर्ष काढले होते. काळा पैसा आणि भ्रष्टाचार याबद्दल जबाबदार मंत्र्यांची किंवा सत्ताधारी कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांची मते काय आहेत याची खातरजमा करण्याची गरज मिडीयावाल्यांना वाटली नाही. अण्णांशी जपून बोलणे आणि रामदेव बाबांची खिल्ली उडवणे हाच कार्यक्रम मिडीयावाल्यांनी हाती घेतलेला असून तो अजूनही सुरुच राहणार आहे. अण्णांचे नेतृत्व हे परिपक्व आहे. त्यांच्या मागे त्यांचे कार्य आहे. पण योगगुरुंच्या मागे फक्त त्यांचा शिष्यवर्ग आहे. योगकार्याशिवाय व डोळ्यात येईल अशा अमाप संपत्ती शिवाय त्यांच्याकडे काहीच नाही. बाबा अनेकदा नको ते बोलून जातात आणि त्यातच अडकतात. अकरा हजार सशस्त्र सेवकांची सेना उभारण्याच्या घोषणेने ते म्हणूनच अडचणीत आले. याउलट अण्णांचा विश्वास पुर्णपणे अहिंसेवर व गांधीवादावर आहे. याकरीताच रामलीला मैदानावर सरकारने जी अमानूष कारवाई करुन रामदेवांचे आंदोलन सरकारने मोडून काढले. त्यामुळेच अण्णा हजारे व्यथीत झाले. राजघाटावरचे त्यांचे एक दिवसाचे उपोषण हा सरकारच्या दडपशाहीचाच निषेध होता. उपोषण हे प्रभावी शस्त्र असले तरी ते तारतम्याने वापरावे लागते. याची जाण अण्णांना अनुभवाने आलेली आहे. पण रामदेव बाबा या बाबतीतच जरासे कच्चे आहेत. अण्णा आत्यंतिक भावनेच्या आहारी जात नाहीत. बाबांनी गर्दी पाहिली आणि त्यामुळेच त्यांचा विविके सुटून नको ती वाक्ये त्यांच्या तोंडून बाहेर पडली. चला एका लढ्याची सुरुवात तर चांगली झालेली आहे. सदोदीत कॉंग्रेसची तळी उचलण्यात धन्यता मानणारा मिडीया काय भुमिका घेतो हे पाहिले पाहिजे आणि भलतीच मते मांडणा-या मिडीयाला खडसावलेही पाहिजे.

गुलमोहर: 

"दुसरे" च्या ऐवजी "दुसरा" हा शब्द वापल्याचे प्रचंड आवडले !!

बाकी लेख वाचला नाही ....सगळीकडे तेच ते चाललय पार वैताग आलाय :(...कधी एकदा आय्पीएल वगैरे काही सुरु होतय असं झालय Biggrin