काल अन् आज....

Submitted by बागेश्री on 9 June, 2011 - 04:21

आपलं नातं हिरवंगार बहरावं,
म्हणून आपण दोघ्घेही झटत असू...

लहान-सहान गोष्टी
मनमूराद साजर्‍या होत..

तुझं इवलूसं यश
माझ बारकसं प्रमोशन,
काहीही मग ते,
पण;
आनंद भरभरुन टिकवायचो...

वाढदिवस तर पर्वणीच जणू!

सार काय तर,
एक-एक निमित्त शोधून
"तू माझ्यासाठी किती खास" ते जाणवून देत असू...

दिवस सरत गेलेत....
व्यापही वाढलेत,

"टेकन फॉर ग्रँटेड" नावाची वाळवी
नकळत शिरली,
रुजली,
कुरतडतच राहिली... दोघांनाही!

नि आज,

दिवसभरात वेळ मिळालाच अन्
लक्षात आलच तर
वाढदिवसाचा एक शुभेच्छेचा मेसेज...
गिफ्ट कधी घेऊ विकत?
वेळ कुठे इथे.....

ह्म्म..बरं चल बाहेर जेऊयात!

बाहेर 'वेगळं' काय जायचय?
माझ्या ऑफिसच्या व्यापात बरेचदा
आपण बाहेरच जेवतो
आताशा गप्पा तरी कुठे रंगतात?

असेच काहीसे वाद, अन् घर शांत शांत....!

वाईट वाटतं फार....
जे मनापासुन जपलं तेच नातं आता पडून आहे

मनाच्या एका सुनसान कोपर्‍यात...

धुळ खात!!

गुलमोहर: 

"टेकन फॉर ग्रँटेड" नावाची वाळवी
नकळत शिरली,
रुजली,
कुरतडतच राहिली... दोघांनाही!>>>>>>>>>>>> अगदी अगदी.... एकंदरीत कविता खूप आवडली...

अरे मंदार
असं नात्यातलं transformation मी आजुबाजूला बरेच पाहिलेत,
आणि कित्तीही नाही म्हण, पण नातं खूप जुनं होत गेलं ना की "टेकन फॉर ग्रँटेड" की होतच

अतिपरिचयात् अवज्ञा!! Happy

U always have to put "extra Efforts" to keep a relationship Evergreen, that is all it mean!!

किती खरी आहे ही कविता. सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं तर. कविता तर खुप छान लिहिली आहेस, पण ये बातभी सौ पतेकी है - <<<कित्तीही नाही म्हण, पण नातं खूप जुनं होत गेलं ना की "टेकन फॉर ग्रँटेड" की होतच
अतिपरिचयात् अवज्ञा!!
U always have to put "extra Efforts" to keep a relationship Evergreen, that is all it mean!!>>>>
अगदी पटलं.

कविता मस्तच. पण..

U always have to put "extra Efforts" to keep a relationship Evergreen, that is all it mean!!
>> कळत नकळतच नाती टिकायला हवी. effort घेऊन नाती टिकवणं म्हणजे त्यात कितपत खरेपणा आला? बर्‍याचदा नाती टिकवण्यासाठी खोटेपणानेच साथ दिलेली पाहीलय. अर्थात टिकवण्याच्या सोसापेक्षा जपण्याचा मार्ग नक्कीच चांगला. जे घडतय ते बिघडवणारं असेल तर ते टाळलंच पाहीजे.

थोडक्यात काय..

सारवा सारव करण्यापेक्षा सावरणे महत्वाचे.

यात असंबद्ध काय आहे? मला तर खुपच sensible वाटली ही comment. सगळ्यांनी वरवर दिलेल्या प्रतिसादांपेक्षा खरा नात्याचा अर्थ समजुन दिलेला प्रतिसाद जास्त पटला मला.

वा नादखुळा, अगदी बरोबर.

>> कळत नकळतच नाती टिकायला हवी. effort घेऊन नाती टिकवणं म्हणजे त्यात कितपत खरेपणा आला? बर्‍याचदा नाती टिकवण्यासाठी खोटेपणानेच साथ दिलेली पाहीलय. अर्थात टिकवण्याच्या सोसापेक्षा जपण्याचा मार्ग नक्कीच चांगला. जे घडतय ते बिघडवणारं असेल तर ते टाळलंच पाहीजे.

थोडक्यात काय..

सारवा सारव करण्यापेक्षा सावरणे महत्वाचे.>>>>

होतं असं. पण असं होण्यातही काही गैर वाटुन नाही घ्यायचं. पुन्हा नव्याने पाटी लिहायला घ्यायची. ही वाळवी जास्त पसरु द्यायची नाही.