हतबल-५

Submitted by अनामिका पन्वेल्कर on 9 June, 2011 - 01:15

''श्या!!! काय रे सौरभ एवढा कसा तू मन्द? मी म्हटलेल ना तुला आधी चौकशी कर म्हणून?''

''ए तायडे आता जास्त भनकस नको करु. चल लवकर बस निघुन जाईल.''

'' जाऊ देत. चल आपण आधी खाऊ काहीतरी. मला खूप भूक लागलीये. ''

''हो का?? मग तुझ्या त्या मित्राला सान्गायचस ना खाऊ घाल म्हणून.'' सौरभ च्या या रिअ‍ॅक्शन वर सौम्या थोडी दचकलीच. पण लगेच त्याला डिवचल्यासारख करून म्हणाली, '' ए मी काही तूला नाही सान्गणारे बिल भरायला. मी देइन हं ते. चल आता ऊशीर होतोय ना!''

हुश्श्श! कसतरी टाळल तिने सौरभ ला. सौम्याच पोटभर खाऊन झाल्यावर ते दोघे बस स्टॉप कडे निघाले. चालता चालता सौम्या च्या लक्षात आल. श्री च्या मघाच्या मेसेज ला आपण रिप्लाय केलाच नाही. बिचारा अजून तिथे वाट बघत असेल. लगेच सेल काढून तिने मेसेज टाईप केला. '' आम्ही घरी जातोय. मूव्ही कॅन्सल.''

'' भारी आहात. इतक्या लवकर रिप्लाय केल्यबद्द्ल मन्डळ आभारी आहे.''

'' सॉरी यार. राहून गेल.'' त्यान्च मेसेजिन्ग चालू झाल होत पून्हा. .............बस मध्येही अखन्ड चालू होत. सौम्या श्रीशी गप्पा मारण्यात हरवली होती. त्याचा चेहरा सारखा डोळ्यापुढे येत होता. त्याची स्माईल आठवली तेव्हा ह्रदय खूप जोरात धडधडतय अस उगीच वाटून गेल...........नेहमीचाच रस्ता आज नवीन झाला होता........त्यालगतच्या हिरवळीचा रन्ग आज डोळ्याना अधिकच प्रसन्न अन सुखावह भासत होता. जणू काहीतरी सुचवायच होत त्याला.........पण काय????????? सौम्याच्या पहिल्या प्रेमाची ती सुरुवात होती. .........सौरभ बाजुला बसलेला असला तरी सौम्या बिनधास्त होती................. कारण त्याच्या लेखी ती श्रीया सोबत चॅट करत होती........................ अर्थात अस फक्त तिला वाटत होत. सौरभ काय समजायच ते समजून गेला. पण तो काहीच बोलला नाही.

घरी गेल्यावर ही सौम्याला अस झालेल कधी एकदा ती आजीसोबत झोपायला वरच्या खोलीत जाते. कारण घरात तिच्या सेल ला अजिबात नेटवर्क येत नसे......आज रात्री तीला श्री शी खूप गप्पा मारायच्या होत्या........काय वाटल असेल श्री ला आपल्याला पहिल्यान्दा भेट्ल्यावर??......आपल्याला जसा तो आवड्ला तसे आपण ही त्याला आवडले असू???........की फक्त एक मैत्रीण म्हणून भेट्ला तो आपल्याला?.........तसही त्याच्या अनेक मैत्रीणी आहेत. त्यातली एखादी गर्लफ्रेन्डसुद्धा असू शकते.........ते कुठे ठाऊके आपल्याला?........एक ना शम्भर प्रश्न होते आता तिच्या डोक्यात! आणि रात्री श्री शी बोलली की तिला यातल्या पन्नास टक्के प्रश्नान्ची उत्तरे मिळणार होती. पण आज साली सन्ध्याकाळ पण हळूहळू सरकत होती.........तिच्या वाईटावर ऊठ्ल्यासारखी !

गुलमोहर: 

वाह वाह !!

तिला यातल्या पन्नास टक्के प्रश्नान्ची उत्तरे मिळणार होती.

ही टक्केवारी कशी काढली??

बादवे

सौम्याचा नवरा कुठे गेलाय ??अजुन कशी येन्ट्री नाय मारली त्याने ??

आभार!

व्वा!! छान चं की!! कथेत खूपचं interest येतोय..
मी नवीनच असल्याने आधी आधीचे ४ ही भाग वाचले.. वेग चांगला आहे.. कथे ला असं शीर्षक का बर असेल हा प्रश्न पडलाय मला?

छानच आहे

भाग फारच छोटे आहे, ईंटरेस्ट निर्माण होताहोताच संपून जातो. थोडे मोठे भाग पोस्टाल का?
पु.ले.शु.

@जाई: ते कसे काय?...........@प्रफुल्लः नक्कीच प्रयत्न करते.........@अवखळःआभार

भाग फारच छोटे आहे >> खरच .. लेखाचे परिच्छेदच नविन भाग टाकल्यासारखे वाटत.
आपले प्रतिसाद एकत्र केले तर ते पण लेखाहुन मोठे होतील. Light 1