पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

अबोला नेहमीच होता साथीला
जेव्हा शब्द माझ्यावर रुसत होते
आज मात्र शब्द साथ देताहेत मला
जेव्हा तु बोलावलास अबोला तुझ्या साथीला

वा!!! सुर्यकिरण, चिमुरी.... मस्तं मैफिल जमवली आहे तुम्ही...

माझं मनही तुझ्यासारखच
नेहमी शॉर्ट्कट शोधतं
मिठीतला रस्ता न पकडता
काळजातल्या मुक्कामी पोहचतं >>>>>..

चिमुरी ....मस्तं लिहिलंय..

आजकाल आपल्यातल्या अंतराच
प्रमाण व्यस्त होवु लागलयं
लांब असताना अंतर कमी तर
जवळ असताना संपवता न येणारं होतय

वा!

कितीही दूर असला चंद्र तरी
पृथ्वीला तो जवळच भासतो
कारण त्यांच्यामधल्या आठवणींची
तो नेहमी भरती-ओहोटी आणतो...

खरं वागणं खूप आवडेल, पण
तुला मनातलं ओळखता येत नाही
तुला मन वाचण्याचे सुर सापडावेत
म्हणुन मग लटके राग आळवावे लागतात

शब्दांनाही प्रश्न पडत असतील
तु निशःब्द असताना,
उगाच वाराही थांबत नाही वहायचा
तु स्तब्ध असताना.

शब्दांनाही प्रश्न पडत असतील
तु निशःब्द असताना,
उगाच वाराही थांबत नाही वहायचा
तु स्तब्ध असताना. >>>>>>>>>

मस्तं जमली आहे चारोळी...

चांदरातीची सुखद स्वप्ने
पहाटेपर्यंत पुरली
सुर्योदयानंतर ती
फक्त आठवणीतच उरली..

रुप...

Pages