फेरफटका वेगुर्ल्याचा

Submitted by मया on 4 June, 2011 - 00:07

भरपुर दिवस कार्यालयात सुट्टी नाही घेतलेली आणि कंटाळा पण भरपूर आलेला. मग ठरवलं कि ३ ते ४ दिवसांसाठी गोव्यात जाऊन येऊया म्हणून आपली तेज जनशताब्दीच तिकीट काढाल आणि मंगळवारी सकाळी बसलो गाडीत प्रवास सुरु झाला वैभववाडी आली मनात येत होत कि जाऊया कि नको गोव्याला कारण कि मी या आदी सुद्धा बरेच वेळा जाऊन आलो होतो गोव्याला म्हणून काय मनात आल कुडाळ स्थानक यायच्या अगोदर पाठीमागच्या बाकावर बसलेल्या बाईला विचारलं इथून मालवण किंवा वेंगुर्ल्याला जाता येईल ती हो बोलली. थोड्याच वेळानी कुडाळ स्थानक आल मी सामान घेतलं आणि खाली उतरलो. वेगुर्ला खूप सुंदर आहे आणि तिथे पाहायला काही तरी भेटेल अस एकल होत. मग गेलो कुडाळ बस स्थानकावर आणि वेंगुर्ल्यात जाणारी बस बघितली माझी तिथे मावशी राहते. पण मी काही तिच्याकडे राहणार न्हवतो.

आता बघूया आपण वेंगुर्ल्यातील काही नेसार्ग्रिक दृश्य

प्रती १ - भाजीचा फणस याला पाच फणस सुद्धा म्हणतात.
DSC00395.JPG

प्रती २ : लाल पेरू (बाहेरून नाही हा आतून असतो )
DSC00396.JPG

प्रति ३: फुल कुठल ते माहित नाही पण याची भरपूर झाड होती तिथे.
DSC00398.JPG

प्रती ४ : सदाफुली (नावाप्रमाणे फुलालेलीच होती)
DSC00404.JPGDSC00405.JPG

प्रती ५ : करवंद
DSC00407.JPG

प्रती ६ : जांभळ
DSC00410.JPG

प्रती ७: आजूबाजूचा परिसर
DSC00412.JPGDSC00414.JPGDSC00441.JPGDSC00425.JPGDSC00418.JPGDSC00447.JPG

प्रती 8: तेथील स्थायिक रहिवाशी तेथे पागत होते, गरव्त होते
DSC00413.JPG

प्रती 9: संध्याकाळी हा परिसर मासेवल्या बायका भरून काढतात त्यावेळीच काढलेला हा फोटो.
१ ताटली होती १५० रुपयांची आणि १ होती २०० रुपयांची मी खाली तिथे चिंगुल पण हॉटेल मध्ये बनवलेली.

DSC00419.JPG

प्रती १० : सागरेश्वर दर्शन
DSC00442.JPG

प्रती ११ : राहावल नाही म्हणून त्या समुद्राच्या खारट पाण्यात उडी मारून आलो.
DSC00451.JPGDSC00459.JPG

प्रती १२ : कोळणी गेल्या कि कस सामसूम असत इथे आणि सांगायची गोष्ट म्हणजे अजिबात घाण नाही या बंदरावर नाही तर जिथे जिथे गेलो तिथे घाण होतीच................खूपच सुंदर होत हे वेंगुर्ला................
DSC00462.JPGDSC00470.JPGDSC00471.JPG

प्रती १२: वेंगुर्ला कस्टम कार्यालय

DSC00463.JPG

प्रती १३: पावसाळ्यासाठी सुकायला टाकलेली मच्ची मग हीच येणार तुमच्या भेटीला थोड्या दिवसांनी बाजारात मला माहित असलेल यातील मासे कापी आणि बळे

DSC00468.JPG

प्रती १४ : गावातली लोक टाकाऊ वस्तूंचा कसा फायदा करून घेतात ते नायतर आपण आणि दुसरीकडे एकाने DVD/CD चा वापर केलेला.

DSC00483.JPG

प्रती १५ : भरपुर फिरलात ना आता जाऊया आपण कुडाळात पुन्हा कुडाळ बस स्थानकाच्या बाहेर राधा -कृष्ण कोल्ड्रिंक हाउस आहे तेथील हे आंबा फालुदा. आवडल नाय तर लिंबू सोडा सरबत तरी पिऊन याच मस्त मस्त मस्त एकदम मस्त..................

DSC00484.JPG

गुलमोहर: 

राधा कृष्ण मधला कोल्ड्रींक.. यम्मी यम्मी!! त्याच्या समोरच एक भजीवाला आहे. तिथली भजी ट्राय करा.
शेजारीच आपल्या एका मायबोलीकराचे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे 'लक्ष्मीकांत एंटरप्रायजेस'

बाकी वेंगुर्ल्याला गेला होतात तर चिंत्र्यंचा सुप्रसिद्ध कोंडुरा पण पाहुन यायचं होतत. Happy

मस्त Happy

वा: ! आमच्या होम पीचवर बॅटींग करून इलात तर !
मी प्र.चि. १०तल्या बंदरावरील विश्रामगृहात पूर्वी बरेच वेळा राहिलो आहे. बोटीच्या डेकवर बसल्यासारखं तिथल्या प्रशस्त व्हरांड्यात रात्री गप्पा मारत बसणं खासच ! तिथला खानसामा अस्सल मालवणी मासे पदार्थ बनवायचा. आत्ताचं मात्र माहित नाही. वाचून, बघून बरां वाटलां. धन्यवाद .

मस्त.. Happy

तां बंदरावरला विश्रामगृह माझ्या सासर्‍यांनी बांधलांहा >> भ्रमाका नाम लेके चलो वेंगुर्ला !

नीर फणस = Bread Fruit करेबियन मधे सगळीकडे दिसतात. यालाच विलायती फणस असेही म्हणतात..
भ्रमर त्या विश्रांतीगृहात रहायचे असले तर काय करायचे याची माहीती कुठे मिळेल..?
की ते फक्त सरकारी लोक आणि त्यांच्या खानदानासाठी आहे?
की तुजो वशिलो चलात? Proud

छान.

झकास...

मे महिन्यात शरद पवार साठी सागर बंगला renovate केला होता. आता बाहेरील व्हरांडा काचेने बंदिस्त केला आहे. दिपगृहाचे फोटो कुठे आहेत.. ? आणि सागरतिर्थ .. Happy

आजून प्रती टाकणार होतो पण जास्त टाकले तर बघणारे कंटाळतील म्हणून टाकले नाहीत. मालवणला पण गेलेलो तिथले पण नी टाकलेत कारण सारखाच होत.

<< मे महिन्यात शरद पवार साठी सागर बंगला renovate केला होता >> म्हणजे आय.पी.एलची पुढची फेरी " येंगुर्ल्यात" कीं काय !!! Wink

जागू हा फणस गावात बहुतेकांकडे असतो असा काही दुर्मिळ नाही. आणि याची भाजी सुद्धा खूपच चांगली होते. ती कशी करायची ते मी तुला सांगतो आईला विचारून म्हणजे तू करून पण बघ...................कदाचित तुला माहित असेल पण तुम्ही त्याला वेगळ्या नावाने ओळखत असाल.

नाय ओ भाऊ, येंगुर्ल्यात काजु वाईनच्या फॅक्टरीचा उदघाटन आसतलां >> तेच्यासाठी पण शरद पवार लवकरच आमच्या गावात येतलो. महाराष्ट्रातलो पहीलो सहकारी तत्वावर चालनारो काजु मध्यार्क निर्मितीचो कारखानो गावात चालु होउचो असा.. Happy

सुप्रभात. येऊंचा गजालीक ?
चला, कोकणाचो काजुफॉर्निया होतलो तर ! स्थानिकांक ५०% सवलतीत गावतली मां ?" येवा,येवा,वांईच वाईन पन घ्येवा" ह्यां पर्यटकांसाठी घोषवाक्य कसां आसा ? Wink

सगळ्यांनी त्या काजू फेणी साठी भांडू नका मी पणजी गेलेलो त्यावेळी आणल्या आहेत त्या हव्या असतील तर घेऊन जा कोणाला कोणाला हवी त्याने सांगा.

आमकां आमच्याच गांवची होई; आणि, "फेणी" न्हंय... "वाईन" !!!!!!
[ मालंडकरानुं, तरी पन तुमचो पत्तो आपलो जरा द्येऊन ठेवाच ! ] Wink

वेंगुर्ल्याला एकदोनदा जाणं झालं तेव्हा (खूप प्रसिद्ध पर्यटनस्थळ नसलं तरी) इथलं वातावरण जादूई असल्याचा अनुभव मलाही आला होता. Happy