मार्गदर्शक

Submitted by bnlele on 3 June, 2011 - 02:11

स्वप्नात चालताना साधू दिसला,
योग्या सारखा अधांतरी,
पण अरेच्चा! थबकला अन्‌ जवळ आला,
मान हलता अस्पष्ट हसला, म्हणाला -
डोळ्यात माझ्या एका आहे अश्रु,
अन्‌ -कां दुसर्‍या भिवईत प्रश्न ?
असेच उमटतात जीवनातले भाव-तरंग !
जयात तू ही असतो नित्यच दंग,
कोठून येतात सांग ?
मी तर शब्दाविना निरुत्तर
हसून वदला- मेघ कधी बघतोस ?
सुके-ओले, निळे-काळे म्हणतोस-
शुभ्रपांढरे कधि समजतोस.
रहस्य त्यांचे काय? --
इंद्रधनुचे रंग विखरता-
आस-निराश किरण-शलाका-
छेदिती त्या मेघांना,
तिथे पलिकडेच तर आहे
खरी पाउल वाट !
चल - त्या रोखानेच पाय टाक.

गुलमोहर: 
शब्दखुणा: