संधि-मंदी

Submitted by bnlele on 1 June, 2011 - 08:37

जरी आर्थिक मंदी, आहे सुवर्ण संधी

हाच अमुचा बाणा, काहीही आणा,

जुनं काय तुटकं काय, सगळं घेऊ,

नवीन चकचकीत मोल-फरकात देऊ !

आणलत काय? मिक्सर, पॅन, भांड-तवा ?

काहीच नाही यातलं, जुन ते सोन

मग आहे काय मोड ? गाठोड तर सोड

जमेल ताळ-मेळ, दवडू नको वेळ.

गाठोडंच तर सुटत नाही, गाठ एकदम पक्की,

चालत असेल तर तोंडीच सांगतो, नक्की.

तर कंबरडं मोडलय, डोळे झालेत अधू,

झोप नाही क्षणाला, चव नाही जिभेला.

ठळक दिसतात स्वप्न, टिकत नाहित मनांत,

अनुभवांच सगळं मोल, फरकात कर वसूल.

जगण्याच सर्व साधन दे, आहेस कबूल ?

परतल गिर्‍हाईक शोभणार कसं बाण्याला !

मन आहे खंबीर, पुन्हा व्हायचय तरूण,

सुवास पाना-फुलांचा आकाशात लाली,

बघ बुआ लवकर बोल, मिटता डोळे दिसतो अरुण.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

घरात अनावश्यक वस्तू दिसल्या आणि "काहीहि आणा अन काहीहि घ्या" अशा अनेक दुकानांतून दिसणार्या पाट्या आकर्शित करतात आणि हिरमोड पण !