Submitted by सायो on 11 July, 2008 - 14:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
टोमॅटो- मोठे ४, नारळाचं दुध -१ छोटा कॅन, आलं-लसूण पेस्ट १ छोटा चमचा प्रत्येकी, हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे, कढिपत्ता ५,६ पानं, चिरलेली कोथिंबीर, फोडणीचं साहित्य, मीठ, साखर चवीप्रमाणे.
क्रमवार पाककृती:
प्रथम टोमॅटो मायक्रोवेव्हला शिजवून घ्यावेत. गार झाले की सालं काढून घ्यावीत. जाड बुडाच्या पातेलीत तेल गरम करून त्यात जिरं टाकावं. जिरं तडतडल्यावर त्यावर कढिपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून परतावे. त्यावर शिजलेले टोमॅटो टाकून थोडे ठेचावेत व पाच एक मिनीटं शिजू द्यावेत. त्यावर आलं लसणीची पेस्ट घालून परत थोडे शिजू द्यावे. मग सगळं मिश्रण मिक्सरमधून काढावं. पुन्हा गॅसवर ठेवून त्यात नारळाचं दूध घालून चांगली उकळी काढावी. चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी व वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
वाढणी/प्रमाण:
साधारण चार जणांसाठी.
माहितीचा स्रोत:
शेजारणीची रेसिपी
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप दिवसपसुन शोधत होते... मेस
खुप दिवसपसुन शोधत होते... मेस मधे नेह्मि असायचि ...
टोमॅटो शिजवून घेतले हे छान.
टोमॅटो शिजवून घेतले हे छान. मी एका घरी, कच्चे टोमॅटो ब्लेंड करुन केलेले सार चाखले होते. अजिबात आवडले नव्हते !
(ग्रुप सार्वजनिक करणार का ?)
ऑटाफे मी टॉमेटोबरोबर एक
ऑटाफे
मी टॉमेटोबरोबर एक कांदाही शिजवते.
मस्त! मला खुप आवडते असे सार
मस्त! मला खुप आवडते असे सार
गरम गरम भात आणि सार.... यम्मी यम्मी
मस्त लागणार. करून बघते.
मस्त लागणार. करून बघते.
वॉव मस्तय सार! ह्या बरोबर गरम
वॉव मस्तय सार! ह्या बरोबर गरम गरम मसाला खिचडी
ते म्हणतात ना- खिचडी के चार यार- पापड, सार, धी, आचार
लाजो, हे सार आणि पुलाव कर.
लाजो, हे सार आणि पुलाव कर. एकदम रॉकिंग कॉम्बिनेशन आहे.
मस्त! या शनिवारी खिचडी आणि
मस्त! या शनिवारी खिचडी आणि सार!
फार मस्त लागते हे सार!
फार मस्त लागते हे सार!
आडो, मी पुलाव बरोबर आपलं
आडो, मी पुलाव बरोबर आपलं नेहमीचं टॉम सार करते... त्याला लवंग + दालचिनीची फोडणी आणि वरतुन थोडं फ्रेश क्रिम.... अफाट लागतं
आता हे सार करुन बघेन नेक्स्ट टाईम
दिनेश, केलं सार्वजनिक. ह्या
दिनेश, केलं सार्वजनिक.
ह्या साराबरोबर मसालेभातही छान लागतो.
ताक घालुन पण टोमॅटो चे सार
ताक घालुन पण टोमॅटो चे सार करतात ना? त्याची हि रेसिपी द्या ना कुणीतरी.
सायो, अगदी हेच लिहायला आले
सायो, अगदी हेच लिहायला आले होते! लग्नी (पुर्वी लग्नासमारंभात असायचा तसा) मसालेभात.
ताक घालून सार मी ऐकलेलं किंवा
ताक घालून सार मी ऐकलेलं किंवा प्यायलेले नाही अन्जलि.
खूपच छान सायो! मिस्कर मधून
खूपच छान सायो! मिस्कर मधून काढावेच लागते का? नुसते रवीने ढवळले तर ?
ते म्हणतात ना- खिचडी के चार यार- पापड, सार, घी, आचार - ते खरे आहे
नारळाचं दूध कॅन्ड वापरायचं
नारळाचं दूध कॅन्ड वापरायचं नसेल तर अर्धा किलो टोमॅटोंसाठी एका मध्यम आकाराच्या नारळाच्या एका वाटीच्या खोबर्याचं दूध घ्यायचं.
मी हल्ली नारळाचं दूध काढायचे कष्ट न घेता टोमॅटो शिजवतानाच त्यात ओलं खोबरं घालते आणि नंतर सगळं एकत्र ब्लेंड करून गाळून फोडणी देऊन उकळायला ठेवते.
बी, नुसते रवीने घुसळून एकजीव
बी, नुसते रवीने घुसळून एकजीव होणार नाही. चोथा पाणी वाटेल.मिक्सरमधून काढल्यावर छान दाटपणा येईल.
धन्यवाद सायो.
धन्यवाद सायो.
अरे वा! काय मस्त रेसिपी आहे!
अरे वा! काय मस्त रेसिपी आहे! नारळाचं दुध नसल्यास त्या ऐवजी क्रिम घालून कसं लागेल?
सानी, वर लाजोने लिहिलंय तसं
सानी, वर लाजोने लिहिलंय तसं करुन बघा किंवा मंजूडीने सांगितलेली आयडियाही चांगली आहे फ्रोजन/ ताजा नारळ मिळत असल्यास.
अरे धन्स सायो! मी प्रतिसाद
अरे धन्स सायो! मी प्रतिसाद नव्हते वाचले. लाजोने ऑलरेडी सुचवलंय की क्रिम
आम्ही घरी सिमिलर सार करतो, पण तूप घालून आणि त्यात नारळाचे दूध नसते.
पण हे सार लय भारी लागणार हे नक्की!
फेव्ह!
फेव्ह!
छान रेसिपी. मी फोडणीत
छान रेसिपी. मी फोडणीत आलं-लसूण न घालता थोडी रस्सम पावडर घालते.
छान! गुरगुट्या भाताबरोबर
छान! गुरगुट्या भाताबरोबर सह्ही लागेल!
मला आत्ताच लक्षात आलं की मी
मला आत्ताच लक्षात आलं की मी हल्ली फोडणीत लसूण न घालता नुसताच आल्याचा तुकडा घालते. कोथिंबीरही ब्लेंड करताना घालते. त्याने मस्त लालसर हिरवा रंग येतो साराला.
मस्त. आमच्याकडेपण खिचडीबरोबर
मस्त. आमच्याकडेपण खिचडीबरोबर सार कंपल्सरी लागतं. नारळाचं दुध न घालता मी मंजूनी लिहिल्याप्रमाणे ओल्या नारळाचा चव घालून करते नेहेमी. आता एखाद्या वेळी नारळाचं दुध घालून करेन.
मी वर सांगितलेल्या
मी वर सांगितलेल्या व्हेरिएशनमध्ये आम्ही पण लसूण नाही घालत फोडणीत. मी (ही रेसिपी ट्राय करतांना) यातही नव्हते घालणार. त्याने उग्र चव येते, असं मला वाटतं आणि सारासाठी सुटेबल नाही ती चव.
ही रेसिपी ज्या मैत्रिणीने
ही रेसिपी ज्या मैत्रिणीने दिली तिने सांगताना लसूण सांगितला असावा. पण मला स्वतःला तुम्ही (सानी) म्हणताय तसंच वाटतंं म्हणून नुसतं आलंच घालते.
सायो, अहो जाहो नको करुस मला.
सायो, अहो जाहो नको करुस मला.
सायो, तुझ्या रेसिपीज करायला
सायो, तुझ्या रेसिपीज करायला सोप्या पण एकदम चविष्ट असतात ( my type
)
नारळाचं दूध घालून सार मला माहिती आहे पण केलंच नाहीये जास्त वेळा. आता करेन.
तू सांगितलेले मिक्स व्हेजी पराठे पण बरेचदा केले हल्लीच.
Pages