माझ्या चिंगीस...

Submitted by Godeya on 11 July, 2008 - 11:46

इवल्याशा मुठीत झाकले
कोवळे स्वप्न उद्याचे...

झोक्या झोक्यात असे
खेळ कल्पनांचे...

हुंकार तुझे जागवी
पुन्हा पुन्हा उभारी...

आलीस काय घेवूनी
छोट्या पावलातुनी...

कोन तुझे हसरे गालांचे
लावी ओढ मला...

या नव्या नात्यामधले
काय देवू तुला...

गोदेय...

गुलमोहर: