रित्या ओंजळीची गाथा !

Submitted by नादखुळा on 26 May, 2011 - 23:16

हजार द्वंद्वांची व्यथा,
संकटांची मांदियाळी,
झिजलेल्या वाश्यांचे,
मोडकळीस आलेले घर,
अन मनाच्या अंगणात लावलेल्या
त्या सुरुंगाने उधळून विखुरलेल्या
आशेच्या चांदण्यांची अवस्था...
हे सगळं विसरण केवळ अशक्य होतं..

डोळ्यात ठासून भरलेला अंधार,
अगदी जिंवतपणे जाळू लागला होता..
विसाव्याच्या जागेने सुद्धा वाळीत टाकले होते..

पण तरीही..
आज इथे उभा आहे,
मान उचांवून अन घट्ट पाय रोवून..
कारण तुझ्या रिकाम्या ओंजळीचे ते दान,
आणि तू कितीही शपथा घातल्यास तरीही,
ह्या खडतर प्रवासाच्या गाथेचा,
सुवर्णांकित सोहळा,
आता साजरा करायलाच हवा ना?

-- नादखुळा

गुलमोहर: 

अरे वा..
आणि तू कितीही शपथा घातल्यास तरीही,
ह्या खडतर प्रवासाच्या गाथेचा,
सुवर्णांकित सोहळा,
आता साजरा करायलाच हवा ना?---------- हे एकदम भन्नाट Happy !