.

Submitted by क्ष... on 26 May, 2011 - 13:16

.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाटणकर खाऊवाल्यांकडे तयार लाट्या मिळतात>>> हो. मी नेहमी आणते त्यांच्याकडून. पापडाचं तयार पीठही मिळतं. पाणी घालून भिजवायचं आणि वरून कच्चं तेल घालून खायचं. तसंच आता गव्हाचा चीक पावडर फॉर्ममधे मिळतो. पाणी घालून शिजवून खायचा.

मस्त लेख!!!मलाही माझं लहानपण आठवलं!!!आता पापड करेन की नाही ते माहित नाही पण तुझ्या १ कप रेसिपीने लाट्या मात्र नक्की करेन!!!! Happy (तोंडाला कल्पनेनेच पाणी सुटलं!!!)

सही! गोजिरवाण्या आठवणी.
आमच्याकडे पण असायचा हा धिंगाणा. आत्या, काकू, आजी, आई, आम्ही तिघी, आत्याच्या दोन मुली. घरच्याच इतक्या बायका. मग वाड्यातून पोळपाट लाटणी मागून आणणे हे काम आमचं. शेंडेफळ असल्यानं माझ्या वाट्याला भांडीकुंडीतलं पोळपाट लाटणं, किंवा मग स्टीलचा पालथा थाळा. दहाच मिनिटात त्या चिकट्याचा कंटाळा येणार हे सर्वांना ठाऊकच असायचं. आत्या पुडीचा दोरा पायाच्या अंगठ्याला विशिष्ट पद्धतीने बांधून भराभर लाट्या तोडायची. मशीनसारखंच अगदी. आई, काकू ऑफिसला गेल्या की आम्हाला हाताशी घेऊन आजी बटाट्याचा कीस, साबुदाण्याच्या पापड्या टाकायची. त्या अर्ध्या ओल्या खार्‍या नक्षीदार पापड्या तशाच संपून जायच्या. मग उपासाला ठेवायच्या म्हणून दुसर्‍यांदा कराव्या लागत. गव्हाचा चीकही असा दोनदा व्हायचा. एक खारा एक गोडा. त्यादिवशी जेवण नसले तरी चालायचे. मग कुरडया घालून झाल्या की उरलेल्या चोथ्याच्या भुसवड्या. तांदळाच्या पापड्यांसाठी आख्ख्या वाड्यात एकच स्टँड फिरायचा. मग पुन्हा हाच शो आत्याच्या घरी. असंच हळद, तिखट, मसाला, भाजण्या, मेतकूट इकडच्या घरी आणि तळेगावला आजोळी. तिथे मावश्या, मावसबहिणी. फर्माईशीनुसार चकल्याही व्हायच्या. आख्खा एप्रिल मे असली आवडती कामं, आंबे, बर्फाचे खडे आणि सरबतांत विरघळून जायचा. Happy दोन्ही आज्या गेल्या तेव्हा एवढा पसारा आपोआपच आवरता झाला. पण आई अजूनी हळद, तिखट, मसाला, भाजण्या, मेतकूट घरी करते. आणि यंदा तिच्या नातींसाठी दोन किलोचे पापडही घातलेत. तेव्हा लाट्या खाताना आजीची खूप आठवण आली. Happy

मस्त लिहिलंय. आजी, आईची सगळी उन्हाळकामं डोळ्यासमोर आली Happy

आणि अगदी बारीक धार सोडत पीठ घट्ट मळून घ्यायचे>> मिनोती, हे पीठ तेलात भिजवतात की पाण्यात?

वा मस्त आठवण. मी पण लाट्यांची दिवाणी. लहान चाक्या करून द्यायचे तेवढी! बाकी नुसताच टिपी Wink
कुणाकडे शेवया करायचेत का? त्यचाही मोठ्ठा घाट असायचा, लांबच लांब ताग्यासारख्या शेवया!!!

आईग. त्या लाट्यांची चव जीभेवर आली. उडदाच्या आणी बाकीही सगळ्या पापडांच्या लाट्या. ते तांदळाचे उकळ्त्या पाण्याच्या वाफेवरचे पापड पण ओले, तुटलेले मस्त लागायचे. त्याचे प्रमाण आहे का कोणाकडे?

मग कुरडया घालून झाल्या की उरलेल्या चोथ्याच्या भुसवड्या. >>>> या कशा करतात? Uhoh
मी तो भुसा गोठ्यात नेउन देते.

छान लिहिलय. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. बोट्या (खाताना टाळूला चिकटत), लिंबाचे सरबत, तळलेला ओला पापड, वाड्यातली ती ओसरी...मस्त एकदम नॉस्टॅल्जिक..

मंजू, अग नाही ग पाणी घालूनच भिजवायचे. किंवा केळ तोडली की त्याचे पाणी, कोहाळ्याचा रस असे काय काय पण वापरतात.

मोनाली, त्या वाफेवरच्या पापडाना सालपापडी म्हणतात ... स्वर्गिय सुख असते ओलि/अर्धवट ओली सालपापडी खाणे!

तुमच्या सगळ्यांच्या आठवणी वाचुन पण मजा आली. अजुनही लिहा!

मोनाली, त्याचं प्रमाण असं काही नसतं. तांदूळ ३ दिवस (रोज पाणी बदलत) भिजवायचे. मग अंगासरशी पाणी ठेवून वाटून घ्यायचे. मग त्यात मीठ आणि आवडीनुसार जिरं, हिरवी मिरची, तीळ यांपैकी घालून पीठ ताटल्यांवर पसरून वाफेवर पापड्या शिजवायच्या. साधारण ८ ते १० मिनिटांत एक घाणा शिजतो.

मिनोती,
मी ऊडिद मुगाचे पापड करते. प्रमाण मुग २.५: ऊडिद १.५. आणि तेलाच्या ऐवजी तुप वापरते. मी अजुनही येथे करते, फर नाही थोडे. सकाळ पासुन लाटुन लाटुन रात्री पर्यन्त तळहात अगदी ट्म्म सुजतात. दुसर्‍यादिवशी पुन्हा लाटायला आ उ करुन सुरवात होते. पण तयार पापड बघितले कि सार्थकी वाटते. पापडाचे गटग - मस्त कल्पना. Happy

मस्तच मिनोती.. आम्ही सगळी वळवणं अर्धवट ओली कोरडी स्टेज मधे असतानाच सम्पवायचो, हळु हळु आईने बंद केलं वाळवणं करणं Proud
मी पण आणते पाटणकरांच्या लाट्या भारतात गेले कि... अतिशय चविष्ट !

पाटणकरांच्या लाट्या मस्तच. आई हल्ली मला रामबंधू पापड मसाला आणि थोडं पीठ पाठवते , पापड करण्यासाठी नाही, नुस्त्या लाट्या खाण्यासाठी Happy पाटणकरांचं पोह्याचं डांगर पण अल्टिमेट असतं.
अनेक वर्षांपूर्वी एकदा अ‍ॅटलांटाला गेले असताना तिथल्या एका इंग्रो मध्ये पण मस्त उडदाच्या पापडाच्या लाट्या मिळाल्या होत्या.

एका वर्षी आईने केलेले पापड लाटताना थोडे चिकट वाटत होते, रंग थोडा जास्तच गडद वाटत होता, लवकर सुकले नाहीत . आई , मावशी , आत्या , शेजारच्या काकू सगळ्या मिरची जास्त भाजलेली असेल, उडदाच्या पीठात काही तरी मिक्स असेल, पापडखार चांगला नसेल वगैरे म्हणत होत्या.
चवीला पण जरासे वेगळे लागत होते . पण नेमकं काय बिघडलंय ते कोणालाही नक्की कळलं नाही. दोन तीन दिवसांनी त्यातले पापड जेवणात भाजले होते. वडिलांनी पहिला घास घेतला अन म्हणाले ' अरे , प्रॉटिन्यूल्सचे पापड ? नवाच प्रयोग दिसतोय पापडाला हेल्थी बनवायचा! ' तेंव्हा भावाने सांगितलं की पीठ, मिरची वगैरे कालवलेलं होतं अन आई एखाद मिनिट इकडे तिकडे गेली असेल तर त्याने त्या मिश्रणात प्रोटिन्यूल्स घातलेलं कपभर दूध ओतून दिलं होतं.

त्याच्या पुढच्या वर्षी त्याची रवानगी दुसर्‍या आत्याकडे करून मगच आईने सगळा घाट घातला होता.

मिनोती, स्वाती धन्स. ते उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर ताटली उपडी टाकायची तेच ना? अग पण पीठ पातळ झाले तर ते पाण्यातच पडते ना. Sad म्हणुन प्रमाण विचारले. आईने १दा केलेले तर बरेचसे पीठ पाण्यात पडुन वाया गेलेले. परत ८ दिवसांनी प्रयोग केलेला व तो जमला होता. पण आता नीट आठवत नाहीये.

Pages