.

Submitted by क्ष... on 26 May, 2011 - 13:16

.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्ती सुरेख लिहिलं आहेस गं. खुप आवडल.

आमच्या घरचे पापड मात्र मी साधारण ५-६ वीत असल्यापासून मी आणि मम्मी दोघीच करत आलो आहे. रोज १/२ किलोचे पीठ भिजवून असे २ किंवा तीन दिवस हे पापड करायचे >>>>
आमच्याकडे पण. आणि आतातर आई एकटी करते. पप्पा तिला बरीच मदत करतात खरं. Happy

मस्त Happy

माझ्याही अशाच आठवणी. आमच्याकडे पाट्यावर पिठ कुट्त असत. पण लाल मिरचीचे, हिरव्या मिरचीचे, मिरीचे, लसणाचे असे वेगवेगळे प्रकार. मग शेवटच्या पापडाच्या मिरच्या करणे, शंकरपाळ्या करणे वगैरे व्हायचे. शिवाय ओला पापड तळून खाण्यातली मजा ओरच. तो पुरीसारखा फुगायचा.
आता मुंबईत पापडाच्या लाट्याच मिळतात. पहिल्यांदा आणून खाल्याही. पण आता त्यात ती मजा वाटत नाही.

एकदम नॉस्टेलेजिया! कारण सेम स्टोरी, माझी आई शिवणाचे क्लासेस घेत असल्याने तिच्या क्लासच्या बॅच संपल्या की ऊडदाचे पापड चालत शक्यतो आई आणि मीच करत असे, मी लाट्या फोडायला आणि आई पापड करायला.
बाकी किस्,चकल्या,साल-पापड्या,कुरड्या वैगरे मात्र आई फार लवकर ऊठुन करायची त्यात दोन उद्देश असायचे एकतर सकाळच्या स्वयंपाकाच्या आत ते उरकायच असायच दुसर म्हणजे संबध दिवसाच उन वाळवणाला मिळाव हाही उद्देश असायचा.
शेवटी लाटुन कंटाळा आला की जरा जाड पापड लाटायचा त्यावर बोटभर तेल लावायचे लसणाची नाहितर असेल ती कोरडि चटणी पसरायची गुंडाळि करुन गट्टम! बाकी लाटताना पोटात जाणार्‍या लाट्या वेगळ्याच..

वा! मस्त आठवण .. Happy

उन्हाळाच्या सुट्टीतला फार फार आवडता प्रकार होता वाळवण-साठवण ..

पापड वाळवण्यासाठी काहींकडे चटया (किंवा तत्सम प्रकार) वापरत .. आणि मग त्यावर मऊ सुती साडी .. तर त्या खालच्या चटईचं क्रिस-क्रॉस डिझाईन उमटे पापडावर त्याची मला फार मजा वाटायची ..

(मला अशा आठवणींचा झब्बू द्यावासा वटतोय .. बघू जमतंय का ..)

माझा झब्बू- सशलच्या आधी.
आमच्याकडे आम्ही लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत एकत्र जमून पापड करायचा उद्योग चालायचा. आम्ही त्यावेळी बांद्र्याला रहात होतो. जागाही खूप लहान होती. पण अगदी १७, १८ जणं जमायची घरात. मालाड, पार्ला, गोरेगाव, डोंबिवली इथून आत्या, काकू वगैरे यायच्या. सगळी भावंडंही जमायची. मस्त कल्ला चालायचा. ह्यातली बरीच जणं आदल्या दिवशीच यायची रहायला. अगदी लग्न घर वाटायचं. मग सकाळपासून पापड लाटून तो वाळवायचा, मध्येच लाट्या हाणायचा उद्योग चालायचा. मोठे मजेचे दिवस होते ते.

किस्,चकल्या,साल-पापड्या,कुरड्या वैगरे मात्र आई फार लवकर ऊठुन करायची >> अगदी माझी आई हेच करायची. आणि त्यानंतर सगळ्यांचा स्वैपाक करायला कंटाळा कसा येत नसेल कोण जाणे?
मी डब्बा आणला असता नाहीतर बाहेर गेले असते जेवायला Proud

मस्त आठवण! Happy
उन्हाळी वाळवणं शेजारपाजारच्या बायकांनी जमून करणं, ती निरनिराळ्या स्टेजेसमधे खाणं (नुसता चीक/लाट्या/ओल्या पापड्या, अर्धवट वाळलेले पापड, पापड्या, कीस, चिकवड्या वगैरे), मुख्य म्हणजे दुसर्‍यांना खाऊ न देणं - फार मजा होती!

छान आठवण! आमच्या कडे आमचे आणि शेजारचे असे दोन घरांची मिळून उन्हाळ्याची कामे चालायची. दर वर्षी सुट्टीत येणारे पाहुणेही त्यात सामिल व्हायचे. पीठ कुटुन द्यायच काम आमच्या बाई करायच्या. ८-१० दिवस धमाल चालायची. Happy

मस्त लिहीलंय मिनोती.
आमच्याकडे पण विविध प्रकारचे पापड, विविध प्रकारच्या पापड्या, सांडगे हे वाळवण - साठवण प्रकार चालायचे.
त्यात सांडगे वगैरे गच्चीत पसरलेल्या प्लॅस्टिकवर डायरेक्ट घालायचे असायचे. सूर्य तापायला लागल्यावर डोक्यावर ओला टॉवेल घेऊन सांडगे घालायचो.
ती लाट्या आणि नुसतं सांडग्यांचं पीठ खाण्याची मजा काही औरच होती.

मिनोती मस्त आठवण. आई कडे झाली ह्या वर्षीची वाळवण. आम्हाला पण त्या लाट्या आणि सालपापडी,शाबुदाण्याचे वरुन वाळलेले पण आतुन ओलसर असलेले सांडगे खायला खुप आवडायच Happy

सुंदर लेख..खूप आठवणी आल्या.आपल्या आया धन्य आहेत खरोखर..
तुझं backyard पाहून मला नेहेमी लगोलग पापड्,कुरड्या ,पापड्या करायची सुरुसुरी येते.यंदा करू या का? "पापड गटग" Happy
तुझी "लहान प्रमाणात करून पहायचे असेल"च्या कृतीनी गेलाबाजार लाट्या तरी करून खाऊ.
काय म्हणता बेकरीकर्?सशल तू असणे आवश्यक आहे,म्हणजे लाट्यांच्या पीठाचा रंग,पोत,चव वगैरे वगैरेंच्या quality बद्दल शंका नको :),दिवे घे..

मस्त आठवण करुन दिलीस Happy छान लिहीलयस Happy

मेमहिन्याच्या सुट्टीत घरी आई, आत्या हे सगळे उन्हाळीउद्योग करायच्या. आम्ही पोरं इकडची तिकडची कामं आणि दंगा करायचो.

मला स्वत:ला उडदाचे पापड फारसे आवडत नाहित पण मी पोहे आणि बटाट्याच्या पापडांच्या लाट्या गट्टम करायचे. पोह्याच्या पपडाचं डांगर... यम्मी.. तोंपासु Happy

मस्त आठवणी लिहिल्यात. आमच्याकडे उडीद, पोहे, बटाटे यांचे पापड व्हायचे. पण उडदाच्या पापडांचा खटाटोप जास्त. सर्व वाळवणाची कामं करायला मावशी रहायला यायची. सुटीत मामेभावंड असायचीच. त्यांचीही मदत व्हायची. बेडरूमला लागूनच टेरेस असल्याने वाळत घालणे आणि कावळ्यावर नजर ठेवणे या दोन्ही गोष्टी सोप्या असायच्या. दरवाज्यात जो कोणी लाटायला बसला/ली असेल त्याच्या हातात धुणं वाळत घालायची काठी दिली की मधून मधून आपटून कावळेबुवांना हाकलवता यायचे.

Happy मिनोती.. मस्त..एकदम नॉस्टेलजिक..
आमच्याही लहानपणी बटाट्याचा कीस्,वाफेच्या पापड्या,चिप्स ,कुरड्या इ.उन्हाळ्याच्या सुट्टीत आई आणी आजी करायच्या. अश्यावेळी आम्ही उत्साहाने वाळवणाची ,पक्ष्यांपासून राखण करायचे काम स्वतःकडे घ्यायचो. वाळवणाची ,आमच्यापासून राखण करण्यासाठी आजोबा काठी घेऊन व्हरांड्यात आरामखुर्चीवर बसून असायचे Wink त्यांची नजर चुकवून अर्धवट वाळलेल्या या वस्तू खाण्यात फार गंमत यायची.
लग्नानंतर 'हमने भी पापड बेले हैं' असं म्हणता येण्याइतपत उडीद,मूग इ. चे पापड लाटलेत Lol

पुरानी यादे ताजा कर दी! Happy
एकदा आई आणि ताई निम्मे पापड झाल्यावर बाहेर गेल्या.. तोपर्यंत बाबांना आणी मला लिंबूटिंबू कामं दिलेली.. मग त्या बाहेर गेल्यावर मी आणि बाबांनी सगळे पापड 'करून' ठेवले.. बोटभर जाडीचे पापड Proud उन्हाळ्याच्या दिवसात पटपट वाळलेही..
आई आल्यावर मज्जा आली.. आमच्या हेतू स्तुत्य असल्यानं जोडे बसले नाहीत मात्र! Happy

आमच्या घरी देखिल असाच प्रोग्राम असायचा. एका गुजु काकुन कडे तर भारि धमाल यायची. कितिहि तान्दुळ पापडाचे पिठ खाले तरिहि त्या काहि नाहि म्हणायच्या. सर्वान्ना डब्बा भरुन पिठ द्यायच्या.

आजहि पापड सिझन सुरु झाला कि घरि एक दिवस तरि नुसत्या पापडाच्या पिठाचा कार्यक्रम ठरतोच.

सर्वांना धन्यवाद!!
बहुतेक सगळीकडेच कुरवड्या, सालपापड्या, वगैरे प्रकार पहाटे उठुन केले जात असत कारण सकाळचे उन तापायच्या आधी सगळे झाले पाहिजे म्हणुन. मग दिवसभर पोरांना हे कच्चे प्रकार फार खाऊ न देणे वगैरे मेजर गोष्टी असायच्या!

सशल, खरच झब्बू दे! मस्त वाटते वाचायला.

वृषाली, अगदी नक्की करुयात गटग! निदान लाट्या खायला तरी भेटूच.

पुण्यात रहाणारी मंडळी, पाटणकर खाऊवाल्यांकडे तयार लाट्या मिळतात. गेल्या देशवारीत खायला घातल्या एका मैत्रिणीने.

Pages