समोसे

Submitted by वर्षू. on 23 May, 2011 - 03:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

चार मोठे बटाटे
हिरवे मटर- दीड ते दोन वाट्या
जिरे
हळद
मीठ
आलं-लसूण पेस्ट- दोन टीस्पून
अमचूर,भाजलेल्या जिर्‍याची पूड,धने पावडर,तिखट,चाट मसाला,गरम मसाला-स्वादानुसार
कसूरी मेथी- १/४ वाटी
कोथिंबीर,कढीपत्ता,हिरव्या मिरच्या.
तूप / बटर(अमूल) = २ टेबल स्पून
तेल= २ टेबल स्पून
तेल- तळण्याकरता.
मैदा- ३ कप्स भरून
ओवा- दीड टी स्पून

क्रमवार पाककृती: 

समोश्यात भरण्यासाठी बटाट्याची भाजी
बटाटे उकडून, सालं काढून बारीक चिरून घ्यावे.
बटाट्याच्या तुकड्यांना मीठ लावून,हाताने एकसारखे करून घ्यावे.
हिरवे मटर उकडून घेऊन, सर्व पाणी निथळून घ्यावे.
तोन,तीन टी स्पून तेल ,कढईत गरम करून, जिरे अ‍ॅड करावे.
जिरे तडतडल्यावर हळद, आलं लसूण पेस्ट,भाजलेल्या जिर्‍याची पूड,अमचूर,धन्याची पूड,तिखट घालून ,थोडं परतून उकडलेले मटर आणी बटाट्याचे तुकडे टाकावे.
चांगलं परतावे.परतताना बटाटे किंचीत कुस्करावेत.
आता बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने ,बारीक चिरलेल्या हिरव्या मिर्च्या,भाजीत मिक्स कराव्या
कसूरी मेथी ,हाताने क्रश करून ती ही अ‍ॅड करावी.
सर्व नीट मिक्स होईस्तो छान परतावे. बटाटे फार मोडू देऊ नका.
गॅस बन्द करून वरून चाट मसाला आणी गरम मसाला भुरभुरावा. तो ही नीट मिक्स करावा.

ही झाली भाजी तयार

समोश्याच्या कव्हरिंग करता
२ टेबलस्पून तेल व दोन टेबलस्पून तूप्/बटर (अमूल) ,एकत्र गरम करून घ्या.
परातीत ,३ कप मैदा चाळून घ्या.
यात तेल् आणी तुपाचे वार्म मिश्रण ओता,पुरेसे मीठ आणी थोडा ओवा घालून मऊसर भिजवा. फार घट्ट आणी दगडी नको. पण पोळीच्या कणकेपेक्षा थोडा घट्ट हवा.

मैदा नीट मळून घ्या. लगेचच लहान गोळे करून ,ओब्लाँग शेप मधे लाटा. सुरीने एका पोळीचे दोन आडवे तुकडे करा

नेहमीप्रमाणे त्रिकोणी वाटी करून आत सारण भरा. कोरडा मैदा भुरभुरलेल्या ताटात तयार झालेले समोसे ठेवा.

डीप फ्रीज मधे स्टोअर करण्याकरता
गरम तेलात एकदाच तळून ,पांढर्‍या रंगावर बाहेर काढा.

दोन्हीकडून आलटून पालटून, पांढरा,फिकट गुलाबीसर रंगावर बाहेर काढून चाळणीत ठेवा

मग बाहेर काढून ,एकेक समोसा फ्रिजमधे स्टोअर करण्याच्या झिप लॉक बॅगेत स्टोअर करून ,आत हवा न राहील या बेताने बॅग सील करून डीप फ्रिझ मधे ठेवून द्यावी.
नंतर लागतील तितके समोसे तळायपूर्वी दोन तास बाहेर काढून ठेवावे. लगेच तळायचे असल्यास मायक्रो मधे दोन्,तीन मिनिटे डीफ्रॉस्ट करून ,तेल गरम करून ,अगदी मंद आचेवर कुरकुरीत होईस्तोवर खरपूस तळावे.

वाढणी/प्रमाण: 
३ कप मैदा आणी ४ मोठे बटाटे या प्रमाणाने अंदाजे ३०,३५ समोसे होतात.
अधिक टिपा: 

अश्या रीतीने स्टोअर केलेले समोसे तीन महीने टिकतात. लगेच करून खायचे असतील तर ,गरम तेल थोडंस थंड करून ,अतिशय मन्द गॅस वर , सुंदर लाल/ब्राऊन रंगावर क्रिस्पी होईस्तोवर तळावे.पुदिन्याच्या चटणीबरोबर छान लागतात.

माहितीचा स्रोत: 
राजस्थानी मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

सारणाची भाजी सही दिसतेय.

आईची एक मैत्रिण समोश्यांसाठी म्हणून खास रजवाडी गरम मसाला वापरते.

>>कढीपत्त्याची पान>><<
समोस्यात कढीपत्ता कधीच नाही खल्ला.

वर्षु,
बाकी रेसिपी मस्त... नेक्स्ट टाईम भारतवारीत करून आण माझ्यासाठी... Proud
असो हे >>नेहमीप्रमाणे त्रिकोणी वाटी करून आत सारण भरा. >> म्हणजे नक्की काय करायचं? Uhoh ते पण जरा विस्कटून सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. Happy

मीरा Happy मलाही आधी असच वाटलेलं. कढीपत्ता टाकला कि प्रत्येक वस्तूला (मराठी भाज्या सोडून हां) काहीतरी दाक्षीणात्य चव येईल..
मला स्वतःला चिकन,फिश मधे कढीपत्ता अजिबात आवडत नाही..
पण या भाजीत घातलेला कढीपत्ता ,भाजीची चव अप्रतिमपणे वाढवून देतो..
इसके लिये तेरेको ,'खुद हीखाओ,खुद ही जान जाओ ' आजमावायला लागेल..

रोचीन.. आत्ता सक्काळीच केलेत..ताजे ताजे Happy

दिनेश दा- एकदा करून बघाच
दक्षे.. जेंव्हा केंव्हा..भारतवारी घडेल तेंव्हा नक्की करूयात.. अगं ,अर्धी पोळी हातात घेऊन दोन्ही कडून दुमडून आईसक्रीम च्या कोन सारखा शेप द्यायचा.. आणी आतपर्यंत सारण भरायचे.. कधी ही केले नसशील तर मात्र प्रात्यक्षिकच दाखवावं लागेल.. करत असताना फोटू काढायला जमलं न्हाय ..

चिन्नु Lol करून बघ ना तू ही ...
मामी.. या पूर्वी माझी भाजी म्हंजे नुस्ता गरम मसाला,अमचूर्,मीठ ,धन्याची पावडर असे.. पण ही रेसिपी माहित पडल्यापासून समोसे एकदाम चमचमीत स्वादिष्ट बनू लागलेत्..म्हटलं आपल्या ई मैत्रमत्रीणींबरोबर शेअर करू या..
पाऊस+ यूपी,एम्पीआईट पद्धतीने आलं, दूध्, पाणी ,चहा एकत्र करून उकळलेला चहा + समोसे.........आह्हाआ!! मस्त काँबिनेशन

पोहे घालून केलेले समोसे?? वाचले होते बहुतेक इकडेच..

वर्षूतै, कसली यम्मी दिसत्येय ती भाजी Happy

नक्की करुन बघणार. घरीच केलेले समोसे फ्रिझ केले आणि नंतर खल्ले तर एव्ह्ढं गिल्टी नाही वाटायचं Proud

वर्षू सह्हीच! गंमत म्हणजे कालच नवर्‍याच्या एका बॉन्ग मित्राकडे समोसे खाल्ले. तेव्हापासून जीभ नुसती चाळवली होती.
पण ती पारंपारिक बॉन्ग पद्धत होती.
मैद्यात मीठ आणि दूध घालून मैदा भिजवायचा.
बटाटे उकडायचे. मटारही क्रंची ठेऊन उकडायचे. फोडणी मात्र तुपात अर्धे बोबडे मिरे आणि हळदीची. हिरवी मिरची बारीक कापून. भरपूर कोथिंबीर. नो कांदा,आलं, लसूण.
बाकी नेहेमीप्रमाणे.
एकदम मस्त चव लागते त्या तुपातल्या मिर्‍यांची.
आता तुझ्या पद्धतीनेही करून बघीन.

लाजो.. इकडे ही आयत्या वेळी स्नॅक्स म्हणून बरे पडतात.. समोसे कोण देणारे होम डिलिवरी.. म्हणून ऋजुता दिवेकर चे (काही) नियम ताकवर (लिटरली Wink ) बसवून थोडी आगाऊ तयारी करून ठेवावीच लागते..
मानुषी.. जरूर कळव कसे झाले ते Happy

सुप्रसिद्ध लेखिका, मंगला अच्युत बर्वे, यांच्या कन्येने दिलेली टिप,
कव्हरच्या पिठात थोडासा लिंबूरस टाकायचा. त्याने कव्हर क्रिस्पी होते. त्यांच्याच हातचे असे सामोसे मी खाल्ले आहेत.

वर्षू, तूझ्या हातचे खाईन तेव्हा खाईन, पण मलाही आज फारच आठवण आली, आणि इथल्या दुकानातून घेऊन आलो.

सुंदर झालेत वर्षूतै,
कणकेचे कव्हर पण चांगले लागते. मैद्या एवढे कुरकुरीत नाही होत पण माझी आजी करायची छान लागायचे (अर्थात आजीच्या हातची चव म्हणुन पण असेल.)

मस्त. धन्यवाद.
आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या पद्धतीने सामोसे केलेत अप्रतिम झालेत.
हे तळण्यापूर्वी.
kachche samose.JPG

हे तळल्यानंतर. दिनेशदांच्या सल्ल्याप्रमाणे मैदा मळताना लिंबू पिळले. थोडी हळदही टाकली. छान क्रिस्पी आणि लेयरी झालेत. एक्स्ट्रा लेयरसाठी आधी चौघडीच्या पोळीसारखं करून मग पट्ट्या कापल्या. जास्त तळलेले लगेच खायचेत. कमी तळलेले एका तळणीचे फ्रीज करून नंतर खायला. Happy
talalele samose.JPG

हे समोसे वर्षू आणि दिनेशदांना गुरुदक्षिणा.
gurudakshina.JPG

वर्षूतै, सुप्परहिट्ट समोसे झालेत!
दिनेशदा, साती, कव्हरसाठीच्या पीठात लिंबू पिळण्याची आयडीया सहीच Happy

होय, फोटो दिसेनात वर्षूताई.

लय टग्या पदार्थ आहे समोसा. एक तुकडा, अर्धा वगैरे म्हणेस्तोवर सगळा कधी गट्टम हुतोय कळत नाही आणि हात दुसर्‍या समोशाकडे आपसूक जातोय.
घरी नीट झालेले नाहीत आजवर, आता या रेसिपीने करून बघतो.

Pages