नवाज शरीफ सही बोलले!

Submitted by sudhirkale42 on 22 May, 2011 - 11:13

नवाज शरीफ सही बोलले!
(माझ्या नेहमीच्या लेखांतील विचारांपेक्षा एक वेगळाच विचार मांडणारा लेख)
गेल्याच आठवड्यात नवाज शरीफ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्काच दिला! कराचीत त्यांच्या "पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज" या पक्षाच्या वतीने बोलावलेल्या पत्रकारसंमेलनात त्यांनी "पाकिस्तानने आता भारताला त्याचा सर्वात मोठा शत्रू समजणे सोडून दिले पाहिजे" असे उद्गार काडले आणि "पाकिस्तानला जर प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकायचे असेल तर त्याने भारताबरोबरच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन (Re-appraisal) केले पहिजे" असेही ते पुढे म्हणाले. दुवा आहे (http://tinyurl.com/3lhesqp)*
हे उद्गार आहेत पकिस्तानच्या भूतपूर्व पंतप्रधानांचे! भारतीयांना आठवत असेल कीं या नवाज शरीफ यांनीच वाजपेयींसह भारत-पाक मैत्रीचे पहिले पाऊल म्हणून "लाहोर-दिल्ली बस सेवा" सुरू केली होती.(*१) वाजपेयींचे स्वागत करायला ते लाहोरला आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांचे हे उद्गार फारच मोलाचे असून वार्‍याच्या एकाद्या सुखद झुळुकेसारखे आहेत. पाकिस्तानी जनतेला त्यांचे हे म्हणणे पटवून देण्यात आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी मनोवृत्तीत बदल करण्यात शरीफना ज्यादिवशी यश येईल तो दिवस सोन्याच्या अक्षरात लिहिला जाईल यात शंका नाहीं. भारतच आपला खराखुरा आणि सर्वोत्तम मित्र आहे हे पाकिस्तानी लोकांना ते पटवून देऊ शकतील अशी आशा सर्व भारतीयांच्या मनात आहे.
अशा धीट आणि लोकमताच्या सद्यप्रवाहाच्या विरुद्ध भासणार्‍या नवाज शरीफ यांच्या वक्तव्याचे आणि मुत्सद्दीपणाचे (Statesmanshipचे) मला खरेच कौतुक वाटले. कारण या भावनेने जर मूळ धरले तर ही एक परस्परसहकार्याची मुहूर्तमेढच ठरेल. भारताने जरी मैत्रीचा हात नेहमीच पुढे केलेला असला तरी दोन्ही देशात कांहीं अंशी एक अविश्वासाची भावना आहे. (हल्ली त्यासाठी Trust deficit हा फॅशनेबल शब्द वापरण्यात येतो!) त्या भावनेला ओलांडून पाकिस्तान आपलाही मैत्रीच हात पुढे करेल काय? मला सध्या सर्व बाजूंनी घेरला गेलेला पाकिस्तान भारताच्या सद्यपरिस्थितीवरून योग्य तो बोध घेऊन असे पाऊल उचलेल अशी आशा मला वाटते.
पण भारताबरोबर मैत्री करायची असेल तर पाकिस्तानला फुकटेपणाची संवय सोडावी लागेल! आजपर्यंत पाकिस्तानला करावा लागणारा खर्च कधीच कमवावा लागलेला नाहीं. मग तो खर्च लष्करी सामुग्रीवरचा खर्च असो, आपल्या देशातील मूलभूत सोयी (infrastructure) असोत भूकंप, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती असोत, पण यापुढे फुकट मदत बंद! पाकिस्तानने कर्ज जरूर काढावे, ते दोन्ही पक्षांनी केलेल्या करारानुसार परत करावे पण फुकटची मदत घेऊ नये! कारण फुकटच्या मदतीबरोबर देशाच्या स्वातंत्र्यावर अनेक मर्यादा येतात व एक तर्‍हेचा मिंधेपणाही येतो. तो कुठल्याही परिस्थितीत टाळला पाहिजे.
पाकिस्तानी लोक भारतीयांसारखेच कल्पक, मेहनती आणि कुशल आहेत. शिवाय आपण कित्येक बाबतीत सारखे आहोत. चेहरेपट्टी, पोषाख, विचार करण्याची पद्धत आणि (गोमांस सोडल्यास) खाण्या-पिण्याच्या आवडी अशा अनेक बाबतीत आपण सारखे आहोत. ज्या दिवशी देश या नात्याने पकिस्तान (आणि पाकिस्तानी जनता) कुठल्याही परिस्थितीत स्वत:च्या पायांवर उभे रहाण्याचा निर्णय घेईल त्या दिवसापासून तेही आपल्यासारखेच यशस्वी होऊ लागतील.
भारताने टाकलेल्या एका अनुकरणीय पावलाचे उदाहरण मला इथे द्यावेसे वाटते. १९९१साली भारतालाही एका दारुण प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. भारताकडे असलेली विदेशी चलनाची गंगाजळी संपली होती व रोजच्या गरजा भागविण्याचीही भ्रांत पडली होती. अशा परिस्थितीत भारताला आपल्याजवळचे तारण म्हणून राखलेले सोने हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे गहाण म्हणून पाठवायची नामुष्की सहन करावी लागली होती. तरीही भारताने मदतीचा स्वीकार न करता, मिंधेपणा न पत्करता ते पाऊल उचलले व पाठोपाठ नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आर्थिक धोरणात अमूलाग्र व क्रांतिकारक बदल घडवून आणला व भारताला प्रगतीपथावर आणून उभे केले. अशा तर्‍हेच्या निर्णयामुळे भारत आज एक कणखर, काटक आणि निग्रही देश बनला आहे.
पाकिस्तानही भारताच्या अशा धोरणांचे अनुकरण करून स्वत:ला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतो. "डॉन" व "एक्सप्रेस ट्रिब्यून" सारख्या वृत्तपत्रातील वाचकांच्या प्रतिसादांचा मागोवा घेतल्यास आज पाकिस्तानची जनता अमेरिकेची मदत नाकारून तिच्याबरोबरचे गुलामीसदृष संबंध तोडून पाकिस्तानने स्वत:च्या पायावर उभे रहावे अशा मताचे आहेत असेच आढळून येईल.
जो मुलूख खरोखर पाकिस्तानचा आहे त्या मुलुखाची अभिलाषा भारताने कधीच धरली नाहीं. याबाबतचा जो गैरसमज पाकिस्तानी जनतेच्या मनात आहे तो त्यांनी काढून टाकला पाहिजे. सध्या चालू असलेल्या पंचायतीच्या निवडणुकीत गिलानीसारख्या फुटीरवाद्यांच्या चिथावणीला धिक्कारून ७०-८० टक्क्याच्या प्रचंड प्रमाणात मतदान करून जम्मू-काश्मीरच्या जनतेने आपल्या मनाचा कौलही दाखवून दिला आहे. दोनेक वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही असेच भरघोस मतदान झाले होते. ही सत्य परिस्थिती समजावून सांगून पाकिस्तानला सद्यपरिस्थितीची जाणीव करून द्यायची हीच योग्य वेळ आहे व पोलाद गरम असतानाच ते घडविले पाहिजे.
पाकिस्तानात काय पद्धतीची ’हवा’ चालू आहे, तेथील विचारवंत कसा विचार करत आहेत हे वाचणे मनोरंजक आहे. डॉन व एक्सप्रेस ट्रिब्यून नेहमी वाचत असल्यामुळे मला त्याची बरीच कल्पना आहे. माझ्या आधीच्या लेखात मी असे अनेक दुवेही दिले होते. खाली दिलेला दुवा वापरून वाचकांना डॉ. तारीक रहमान यांनी एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्रात लिहिलेला लेख वाचता येईल. माझ्या मते प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाने हा लेख वाचला पाहिजे.
आता पाकिस्तान-चीन मैत्रीकडे वळूया. युसुफ राजा गिलानी या मैत्रीला ’सदाबहार’ मैत्री म्हणतात, तसेच चीनहून निघता-निघता गिलानींनी तिचा ’निरंतर मैत्री’ असाही उल्लेख केला. चिनी लोक निमंत्रणाला मान देऊन एकाद्या देशात आले कीं ते त्या देशाला ’निरंतरपणे’ व्यापून टाकतात. खरे तर त्यांना यासाठी निमंत्रणही लागत नाहीं हा अनुभव आपल्याला अक्साईचिनबाबतीत आलेलाच आहे.
माझ्या मते "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" या कालबाह्य प्रणालीवर आधारलेले चिनचे हे धोरण कधीच यशस्वी होणार नाहीं. पाकिस्तानने आपण बांगलादेश युद्धानंतर त्या देशातून आपले सैन्य बाहेर काढून सत्ता मुजीबुर रहमान यांना बहाल केली हे विसरू नये. या उलट चीनने तिबेटवरची आपली मगरमिठी आणखीच घट्ट आवळून त्यांच्या 'निरंतन मैत्री'चे उत्कृष्ठ उदाहरण आहे हेही विसरू नये. आपला मित्र नीट पारखून निवडावा. सर्वांगीण विचार करता पाकिस्तानला भारताच्या मैत्रीशिवाय पर्यायच नाहीं हे त्यांना पटेल यात मला तरी शंका वाटत नाहीं.
(*१) पुढे त्यांना विचारता ज. मुशर्रफ यांनी केलेल्या "कारगिल" मोहिमेच्या फाजील दुस्साहसाने ही मैत्री रुळावरून जवळ-जवळ खाली उतरलीच होती. पण पुढे नवाज शरीफना सत्य आणि चूक समजून आली व त्यांनी ही मोहीम मागे घेतली. लाहोरला वाजपेयींच्या स्वागताला न आलेल्यात सर्वात नजरेत भरणारी अनुपस्थित व्यक्ती होती पाठीत वार करू पहाणारे मुशर्रफ हीच! पुढे त्यांच्याबरोबर उगीचच समेटाची बोलणी करण्यासाठी त्यांनाच आग्रा शिखर परिषदेसाठी बोलावून त्यांना अस्थानी प्रतिष्ठा देऊन, त्याच्या CEO या बिरुदावलीचे राष्ट्राध्यक्ष (President) मध्ये रूपांतर करायची संधी देऊन वाजपेयींनी एक घोडचूकच केली होती!)

गुलमोहर: 

शरीफ ह्यांचं विधान पेपरमध्ये वाचलं होतं पण त्यांना हा साक्षात्कार अचानक कसा काय झाला हे कळलं नाही. स्वतः इतके वर्ष पंतप्रधान असताना दिल्ली लाहोर बस वगळता बाकी काही भारताशी मैत्री करण्याच्या दृष्टीने त्यांनी काही पावले उचलल्याचं वाचनात आलं नाही.

पण पुढे नवाज शरीफना सत्य आणि चूक समजून आली व त्यांनी ही मोहीम मागे घेतली. >>>> मग आता ते पश्चात्ताप की आगमे जलके वगैरे भारताशी मैत्री करण्याबद्दल बोलत आहेत का? Happy

माझ्या नेहमीच्या लेखांतील विचारांपेक्षा एक वेगळाच विचार मांडणारा लेख) >>> हे मात्र पटलं. Happy

शरीफ यांच्या विधानात सुसंगती आहे. कारगिलचे खलनायक असा शिक्का त्यांच्यावर बसलाय तो मुशर्रफ यांच्यामुळे असं त्यांचं म्हणणं हल्ली खरं वाटू लागलय. शरीफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्यांनी भारताकडेच मदत मागितली होती. त्यांची भूमिका भारताविषयी नेक असल्यानेच अशा आणिबाणीच्या प्रसंगी त्यांना भारत आठवला असावा. म्हणजेच त्यांच्या भूमिकेविषयी भारताला खात्री पटलेली होती असा त्यांना विश्वास असावा असं दिसतंय. हे सगळे अंदाजच आहेत... त्या वेळी मुत्सद्देगिरी करून भारताने त्यांची शिक्षा रद्द करवली होती तर बेनझीर ब्रिट्नच्या मदतीने पाकिस्तानात परतल्या. पण त्यांच्या सुरक्षिततेविषयी पाक लष्कराने दिलेले आश्वासन पाळलेले नाही. त्यांचा करूण अंत झाला.

अशा पार्श्वभूमीवर शरीफ हे विधान करतात याला नक्कीच महत्व आहे. भारताच्या बाजूने विचार करायचा झाल्यास शरीफ यांना सध्या पाकमधे कितपत महत्व आहे आणि यापुढे घटना काय घडतील त्यावर सगळं अवलंबून आहे.

सुधीर हे स्वप्न प्रत्यक्षात आले तर, फारच छान होईल. पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना त्या देशाचे धोरण ठरवता आले नाही कधी. आता काही करु शकले तर !!
बाकी सवयी, संस्कृति बाबत जे म्हणता ते अगदी खरे. मी अनुभवलय ते.

पाकिस्तान कधीही सुधारणे शक्य नाही. तेव्हा आपल्या भोळसट (की बावळट?) भारतीयांनी ही स्वप्ने बघणे सोडुन द्यावे हेच बरे.

कारगिल बद्दल शरिफ यांना भारत जबाबदार धरतच नाहीत. ते सर्व मुशर्रफ चे कारस्थान होते... वाजपेयी यांनी उगाचच त्यांना प्रतिष्ठा मिळवुन दिली, पण नंतर तेच अंगलट आहे. त्या काळी वाजपेयींना शांततेचे नोबेल मिळवण्याचे स्वप्न पडत होते...

मैत्री बद्दल मला तरी खुप आशा नाही. एकमेकांना जेवणावळी नका घालू पण निदान अतिरेकी तरी पाठवू नका एव्हढे जरी साध्य झाले तरी खुप मिळवली...

जरा अवांतर होत आहे, पण भारताची इतकी सर्वांगीण प्रगती कां झाली याबद्दल मी अनेक ठिकाणी-मुख्यतः जकार्ता पोस्टमध्ये-नेहमीच लिहितो कीं भारताच्या प्रगतीला भारतीयांची कल्पकता, मेहनती स्वभाव, कौशल्य आणि चिकाटी हे गुणच जबाबदार आहेत! याच गुणांचा काल रतन टाटा यांनी एका मुलाखतीत खास उल्लेख केला. हा मुद्दा मी येथे माझ्या इंडोनेशियन सहकार्‍यांनाही सांगत असतो.
टाटांचे भाष्य वाचा या दुव्यावरः http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/8497118.cms

कृपया ही दोन्ही पत्रे वाचा:
पहिले माझे आहे. त्या खालील प्रतिसाद वाचा.
http://www.thejakartapost.com/news/2011/05/27/letter-india-pakistan-have...
हे माझ्या पत्राला आलेले एका वाचकाचे उत्तर आहे. तेही वाचा.
http://www.thejakartapost.com/news/2011/05/31/letter-india-pakistan-shou...

काळे साहेब आपला लेख वाचला. छान आहे व नवाब शरीफ, एवढा शरीफ नसला तरी परिस्थीती जाणून आहे व वागतो असे वाटते.

मला वाटते पाकिस्तान कधी सुधारणार नाही. मंदार ह्याना सहमत.

मला वाटते टोकाच्या जिहादामुळे पाकीस्तानाचे तूकडे होतील नजिकच्या काळात त्यात पंजाब प्रांत वेगळा, अफघाणला लागूनचा प्रांत वेगळा होईल.

>>> गेल्याच आठवड्यात नवाज शरीफ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्काच दिला! कराचीत त्यांच्या "पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज" या पक्षाच्या वतीने बोलावलेल्या पत्रकारसंमेलनात त्यांनी "पाकिस्तानने आता भारताला त्याचा सर्वात मोठा शत्रू समजणे सोडून दिले पाहिजे" असे उद्गार काडले

पाकिस्तानी पुढारी सत्तेवर बसले की भारताशी शत्रूत्व निभावणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो, पण ते सत्तेबाहेर आले की, आपण भारताशी उगाचच शत्रूत्व ठेवत होतो असा त्यांना साक्षात्कार होतो. पूर्वी बेनझीर भुट्टो १९८८ ते १९९० या काळात सत्तेवर असताना तिने भारताशी वैर ठेवून भारताविरूध्द प्रक्षोभक भाषणे करणे व अतिरेक्यांना मदत करणे हाच कार्यक्रम ठेवला होता. पण तिचे सरकार बरखास्त केल्यावर, आपण भारताविरूध्द आक्रमक भूमिका (हॉकिश स्टँड) घेतला ही आपली चूक झाली असे तिने मुलाखतीत सांगितले होते.

>>> चेहरेपट्टी, पोषाख, विचार करण्याची पद्धत आणि (गोमांस सोडल्यास) खाण्या-पिण्याच्या आवडी अशा अनेक बाबतीत आपण सारखे आहोत.

हा एक भ्रम आहे. चेहरेपट्टी सोडली तर फारसे साम्य नाही. आचारविचार, संस्कृती, धर्म, इ.त फरक आहे. पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे. भारताला नष्ट करणे हा पाकिस्तानचा एकमेव हेतू आहे. पाकिस्तानची सर्व धोरणे भारतकेंद्रीत आहेत. भारत मात्र पाकिस्तानला नष्ट करावे असा वैरभाव ठेवत नाही. भारताची धोरणे फक्त पाकिस्तानकेंद्रीत नाहीत. भारत व पाकिस्तानची मैत्री तर सोडाच पण सुरळीत संबंध सुध्दा अशक्य आहेत.

काळे साहेब पाकिस्थान हा साप आहे. अटलबिहारींना कधी कधी नेहरुंसारखा अ‍ॅटॅक यायचा आणि जशी त्यांनी हिंदि चिनी भाई भाई म्हणत फसगत करुन घेतली तशीच अटलजींनी बसने जाऊन करुन घेतली.

अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांच्या मागे असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना यानी अंखंड भारताची मागणी अटलबिहारी वाजपेयींच्या कारकिर्दीत सोडली आहे. किंबहुना ते वेगळे आहेत तेच बरे असे आता या सर्वांना जाणवले आहे.

भारतीय बहुसंख्य हिंदु आणि पाकिस्थानातले मुसलमान यात अनेक मुलभुत फरक आहेत.

काल पर्वाच २६/११ चा सुत्रधार म्हणाला की एक मिनीट केलेले दशहतवादी कृत्य हे शंभर वर्षांच्या उपासनेसारखे आहे.

ही जिहादी मानसिकता संपत नाही तोवर भारतीय आणि पाकिस्थानी यांचे एकत्र काही करणे म्हणजे केवळ फक्त भारतीयांचीच फसवणुक असेल.

या सापाला आपण तरी किंवा इतरांनी तरी ठेचला पाहिजे.

ही जिहादी मानसिकता संपत नाही तोवर भारतीय आणि पाकिस्थानी यांचे एकत्र काही करणे म्हणजे केवळ फक्त भारतीयांचीच फसवणुक असेल.

अगदी बरोबर
नितीनचंद्रांना पुर्ण सहमती. पाकिस्तान साप आहे.

या सापाला आपण तरी किंवा इतरांनी तरी ठेचला पाहिजे.
---- आपल्या शेजार्‍यांचा असा टोकाचा द्वेष चांगला नाही. शेजार्‍यावर प्रेम करा असा संदेश थोरांनी दिलेला आहे. ते जेव्हढा द्वेष करतील तेव्हढेच त्यांच्यावर प्रेम करा. Happy आज नाही पण कधी तरी त्यांना याची जाणिव होणार...

ठेचायचाच असेल तर लहान भावंडा बद्दलचा आपल्या मनात दडलेला द्वेष ठेचा. Happy

>>> आज नाही पण कधी तरी त्यांना याची जाणिव होणार...

जेव्हा आपल्या धाकट्या भावाला (!) ही जाणीव होईल तोपर्यंत भारताची पुरती वाट लागलेली असेल. सापाला पाळता येत नाही किंवा त्याला माणसाळता येत नाही. त्याला दूध पाजणार्‍याला सुध्दा तो दंशच करतो.

पाकिस्तानी पुढारी सत्तेवर बसले की भारताशी शत्रूत्व निभावणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो, पण ते सत्तेबाहेर आले की, आपण भारताशी उगाचच शत्रूत्व ठेवत होतो असा त्यांना साक्षात्कार होतो.>>> प्रचंड अनुमोदन, कारण सत्तेत टिकून रहायचे तर लष्कराचा आशिर्वाद हवा आणि तो भारतद्वेष केल्यानेच मिळतो.
धार्मिक फरक तर आहेच पण पाकिस्तान हा अजूनही सरंजामशाही व्यवस्थेचा आणि अत्यंत कमी प्रमाणात मध्यमवर्ग असलेला देश आहे. तिथे लोकशाही न रुजणे आणि दहशतवाद पसरणे याची आर्थिक-सामाजिक कारणे हीच आहेत.

येत्या वीस वर्षात ही परिस्थिती पालटलेली दिसेल. मी आणि माझ्या वयाचे कांहीं लोक तेंव्हां हयात नसतील. पण जेंव्हां असे घडेल तेंव्हां तुम्हाला माझी आठवण जरूर येईल. कारण आतंकवाद विषवल्ली हे त्यांना माहीत आहे व तो पेरल्याबद्दल ते झियांना जबाबदार धरतात.
पाकिस्तानातील बुद्धिवादी लोक कसा विचार करतात याचा मागोवा घ्यायचा असेल तर डॉन व ट्रिब्यूनमधील "वाचकांचा पत्रव्यवहार" वाचा! तिथल्या लोकांना त्यांच्याच मुल्लां-मौलवींबद्दल किती द्वेष आहे हे तुम्हाला दिसून येईल.
पाकिस्तानच्या एका वाचकाने लिहिले होते की Our Armed Forces are self-glorified bunch of nincompoops who have yet to win a single war! हे नक्कीच रणजीता चितळेंना पटेल!
मी वाचतो व मग मला हा बदल जाणवतो.
आपल्या दोन देशांमधली मैत्री अपरिहार्य आहे!

उदय साहेब -

माझे मत

शेजा-यांवर प्रेमकरा हे राष्ट्राला लागू होत नाही. हिंदी चिनी भाई भाई म्हणत बसलो व १९६२ काय झाले. आपण भले प्रेम करु पण आपला शेजारी जर करत नसेल तरी सुद्धा आपण प्रेम आळवायचे हे राष्ट्रनितीला शोभत नाही. मला मास्तुरे ह्यांचा मुद्दा पटतो.

पाकिस्तानातील बुद्धिवादी लोक >>> हे आहेत कोण? मुळात ते पाकिस्तानात आहेत की इंग्लंड-कॅनडात बसून बडबड करताहेत? तिथल्या मिडीआ, राजकारणी आणि धोरण ठरवणार्‍यांवर त्यांचा किती प्रभाव आहे? वरील वाक्यच पहा- यांच्या लष्कराने एखादे युद्ध जिंकले अस्ते तर सर्वकाही आलबेल आहे असा अर्थ देखील त्यातून काढता येतो.
पाकिस्तान ही एक अनैसर्गिक निर्मिती आहे हे प्रथम मान्य केल्याशिवाय त्याच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरे मिळणार नाहीत.

काळे साहेब - पाकिस्तानची चीन बरोबरची मैत्री व चीनी गस्तगारांची गिल्गीट मधले पाकिस्तान बरोबर गस्त घालणे बघीतले तर असे काही वाटत नाही. पाकिस्तानचा जन्मच झाला वैमनस्यातून व जिनांच्या महत्वाकांक्षेतून जर मैत्री झाली तर पाकिस्तान म्हणून दुसरे राष्ट्र असायची गरजच संपते. ते उत्तर पश्चीम जर्मनी सारखे आपले एक राज्य होऊ शकते. द ग्रॅन्ड युनिफिकेशन.

>>> पाकिस्तानातील बुद्धिवादी लोक कसा विचार करतात याचा मागोवा घ्यायचा असेल तर डॉन व ट्रिब्यूनमधील "वाचकांचा पत्रव्यवहार" वाचा!

"भारताबरोबर संबंध सुरळीत करण्यासाठी पाकिस्तानने काश्मीर विसरून जावे" असे या बुध्दिवादी लोकांना सांगा आणि मग त्यांची प्रतिक्रिया बघा. काश्मिरमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मुस्लिम असल्यामुळे त्या प्रदेशावर आपलाच हक्क आहे या दुराग्रहापोटी पाकिस्तानने देशाच्या विकासाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून व आपली सर्व शक्ती काश्मिरवर केंद्रीत करून आपली ६३ वर्षे वाया घालविली. पाकिस्तानी नेतृत्वाने देशाच्या तरूण पिढ्यांना शिक्षणाच्या व आर्थिक प्रगतीच्या मार्गाने न्यायच्या ऐवजी आतंकवाद, कट्टर धार्मिकता, धर्मांधता, इतर धर्मांचा तिरस्कार, मदरसे, धार्मिक शिक्षण व युध्द या सर्वनाशाच्या मार्गाने नेले. यात फक्त नेत्यांचा दोष नसून सारासार विचार न करता त्या मार्गाने जाणार्‍या पाकिस्तानी नागरिकांचा देखील तितकाच दोष आहे. अजूनही त्यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही व भविष्यात पडण्याची शक्यता देखील नाही. पाकिस्तान व पाकिस्तानी सुधारणे अशक्य आहे. ते तुमच्या हयातीत सोडाच पण पुढच्या ५० पिढ्यात देखील होणार नाही. मुळात पाकिस्तानात बुध्दीवादी समजला जाणारा वर्ग हा एकूण लोकसंख्येच्या १ टक्का एवढा सुध्दा नसेल आणि त्यांचे विचार सुध्दा भारत व काश्मिर च्या बाबतीत इतर पाकिस्तान्यांसारखेच असणार. तुम्ही तुमच्या परिचयातल्या पाकिस्तान्यांना काश्मिरबद्दल विचारा आणि मग त्यांची प्रतिक्रिया पहा.

हे पण जरा वाचा.

http://www.indianexpress.com/news/67-per-cent-pakistanis-want-islamisati...

>>> आपल्या दोन देशांमधली मैत्री अपरिहार्य आहे!

तुमच्या आशावादाचे मला कौतुक वाटते. पाकिस्तानचा जन्मच भारतद्वेषावर आधारित आहे. भारतद्वेष हा पाकिस्तानचा पायाच नष्ट झाला तर पाकिस्तान नावाची खचलेली इमारत केव्हाच ढासळेल. त्यामुळे ह्या दोन देशांमधली मैत्री तर सोडाच पण सुरळीत संबध देखील अशक्य आहेत.

पाकिस्तानचा जन्मच झाला वैमनस्यातून व जिनांच्या महत्वाकांक्षेतून जर मैत्री झाली तर पाकिस्तान म्हणून
--- चाचा नेहेरु यांना पण स्वातंत्र देशाचे पंतप्रधान व्हायची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. त्यांनी बॅरिस्टर जिन्ना यांना संधी द्यायला हवी होती. कँसरग्रस्त जिन्ना काही महिन्यांचेच जगाचे सोबती होते हे सर्वांनाच माहित होते, पण...

काल पर्वाच २६/११ चा सुत्रधार म्हणाला की एक मिनीट केलेले दशहतवादी कृत्य हे शंभर वर्षांच्या उपासनेसारखे आहे.

जिंकलास तर राज्य भोगशील आणि मेलास तर स्वर्गाला जाशील ( पण लढ आणि मुडदे पाड) असं आपल्याही धर्मग्रंथात आहेच की.. उगाच त्याना दोष कशाला द्यायचा?

जागोजी खुप मोठा फरक आहे.

आपल्या धर्म ग्रंथात सर्वसामान्य निरपराधी लोकांना मारा असे नाही आहे. असल्यास कोणत्या ग्रथांत आहे ते सांगा (मी पुसुन टाकतो :स्मित:). त्याने मारलेले लोकं यांच्याशी त्याचे काहीच शत्रुत्व नव्हते.

त्याने निरपराधी, निहत्यार लोकांना त्यांचा काहीच दोष नसतांना मारले आहे.

कुणा एका व्यक्तीला उद्देशून हा प्रतिसाद नाहीं!
सरहद्दीच्या दोन्ही बाजूच्या लोकांची मनस्थिती एकाच विषामुळे बिघडलेली आहे. ते विष कुणी लावले याबद्दल मतभेद असतील, पण त्याला खतपाणी घालून वाढविले ते झिया यांनी! हे विष आता उतरू लागलेले आहे पण माझ्या हयातीत तरी ते पूर्णपणे उतरलेले दिसणार नाहीं! पण ते उतरणारच!!
कांहीं वाईट घटना घडतील, एकादी लुटपुटीची का होईना पण लढाईही होईल, पण शेवटी पाकिस्तानला आपल्याशी मैत्री करण्याखेरीज तरुणोपायच नाहीं व हे त्याला समजेल व मैत्री होईलच.
ही काळ्या दगडावरची रेघ आहे!

स्वातंत्र्य पुर्व काळात आपल्या देशात साधारण ७५० मदरसे होते, आता त्यांची संख्या ५०००० च्या घरात आहे. व मदरसात फुटीरतावाद व जिहादी संकल्पना रुजवली जाते. उलट देशात मुसलमानांची वस्तीची घनता कशी पसरत चालली आहे ते बघितले तर त्या पाठीमागे एक प्रकारची व्यवस्था आहे असे दिसून येते. त्याला ग्रिन कॉरीडॉर असे नाव देता येईल. हा ग्रिन कॉरीडॉर पाकिस्तान पासून सुरू होऊन राजस्थान उत्तर प्रदेश बिहार बंगाल असाम ते बंगलादेश पर्यंत पोहोचतो. हा कॉरीडॉरची व्यवस्था भयंकर आहे. पुढच्या फुटीरतेचे बिज आहे त्यात

पण शेवटी पाकिस्तानला आपल्याशी मैत्री करण्याखेरीज तरुणोपायच नाहीं व हे त्याला समजेल व मैत्री होईलच.>>>
नक्कीच! निश्चितच मैत्री होईल. सामान्य जनतेला शत्रूत्व कशाला हवं असेल?

इथं पाकिस्तान कधीही सुधारणे शक्य नाही.>> असं म्हटलंय काय दुर्दम्य आशावाद आहे! पाकिस्तान सुधाण्यासाठी आपण काहीतरी सतत केलं पाहिजे करतो आहोत! ते जास्त मोलाचं नाही का?

>>> हा ग्रिन कॉरीडॉर पाकिस्तान पासून सुरू होऊन राजस्थान उत्तर प्रदेश बिहार बंगाल असाम ते बंगलादेश पर्यंत पोहोचतो. हा कॉरीडॉरची व्यवस्था भयंकर आहे. पुढच्या फुटीरतेचे बिज आहे त्यात

मे २०११ मध्ये झालेल्या आसाम विधानसभेच्या निवडणुकीत बेकायदशीर बांगलादेशी घुसखोरांनी स्थापन केलेला पक्ष दुसर्‍या क्रमांकावर येऊन त्या पक्षाने विरोधी पक्षनेतेपदाचा बहुमान मिळविला (सर्वात मोठा पक्ष कॉन्ग्रेस - ७८ जागा, बांगलादेशी घुसखोरांचा पक्ष (नाव विसरलो) - एकूण २० जागा, आसाम गणपरिषद - १० जागा, भाजप - ५ जागा). २०१६ किंवा २०२१ च्या निवडणूकीत हा पक्ष सत्तेवर आलेला असेल व एक बांगलादेशी आसामचा मुख्यमंत्री असेल. अत्यंत चीड आणणारी गोष्ट म्हणजे बांगलादेशी घुसखोरांविरूध्द गेली ३० वर्षे आंदोलन करणार्‍या आसाम गण परिषद या पक्षाने या निवडणूकीत चक्क या घुसखोरांच्या पक्षाशी युती करून त्यांच्या जागा वाढवायला मदत केली व स्वतःच्या व भाजपच्या जागा कमी करून घेतल्या.

मास्तुरे मला अगदी बरे वाटले आपले अवलोकन पाहून. खुप लोकांना हे दिसत नाही. असेच होणार उप्र निवडणुकांना (२०१२ मधल्या). एक मुस्लीम पक्ष जन्माला येणार व ब-याच जागा जिंकणार.

Pages