पहातोस काय मुजरा कर

Submitted by नितीनचंद्र on 10 May, 2011 - 01:33

आजच सकाळी चिंचवड ते पुणे द ग्रेट पी.एम्.पी.एम्.एल ह्या बस सर्व्हीसने प्रवास करताना बसच्या पुढ्च्या काचेवर एक पोस्टर आत उभे राहुन प्रवास करणार्‍यांना दिसेल अश्या पध्दतीने लावलेले दिसले.

पोस्टरवर छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र होते आणि खाली संदेश होता "पहातोस काय मुजरा कर". मी मनोमन मुजरा केला कारण माझे दोन्ही हात बस पकडण्यात गुंतले होते.

माझा एक मित्र सातार्‍याचा आहे. त्याने मला सांगीतले की सातार्‍याचे लोक शिवाजी महाराजांचे उत्तर अधिकारी छ. उदयनराजे भोसलेंना मुजरा करतात. मला अभिमान आणि आश्चर्य वाटले. अभिमान अश्याचा की शिवाजी महाराजांनी जे घडवले त्यांचे लोकांना स्मरण आहे आणि आश्चर्य अशाचे वाटले आजही लोकांना मुजर्‍यासाठी झुकावेसे वाटते.

महाराष्ट्रातच काय सर्व सामान्य जनता कुणापुढेही झुकायला तयार आहे पण शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन प्रतिशिवाजी बनायला तयार नाही.

"बघतोस काय मुजरा कर" ही भाषा शिवाजी महाराजांना अभिप्रेत नसावी. कामच असे करावे की लोक स्वराज्याला आपले मानतील असे शिवाजी महाराजांना अपेक्षीत असावे.

महाराष्ट्रातला एक समाज सेवक उपोषणाला बसतो आणि पंतप्रधानांनी नेमलेल्या मंत्र्यांच्या कमिटीतीतुन दुसरा महाराष्ट्रातला जेष्ठ मंत्री त्या कमिटीच्या सदस्यत्वाचा राजिनामा देतो कारण तो स्वच्छ नाही यावर सर्वांचे एकमत आहे.

शेतकर्‍यांच्या गवताच्या काडिलाही हात लावु नका हे सांगणारे छ. शिवाजी महाराज जर राज्यकर्त्यांचे आदर्श नसतील तर त्यांचे फोटो, त्यांचे पुतळे हे काय फक्त मुजराकरणार्‍यांसाठी ?

राजे पुन्हा जन्माला या ? कशालाहो ? मढ्याच्या टाळुवरच लोणी खाणारे आपमतलबी राजकारणी आणि त्यांचा उदो उदो करणारे स्वार्थी कार्यकर्ते यांची यादवी पहायला ?

राजे, तुम्ही आत्ता जन्माला आलात तर परकियाशी लढायचे राहुद्या दुर सर्व आयुष्य असल्या स्वकियांशी लढण्यात खर्ची घालावे लागेल.

हे जर खर आहे तर आम्ही सामान्य माणस काय करणार आहोत ? हातावर हात ठेउन उसासे टाकणार आहोत की यदा यदाय धर्मस्य.. या उक्तीवर भरवसा ठेउन हे कधीतरी संभव आहे म्हणुन त्या क्षणाची वाट पहाणार आहोत ?

गुलमोहर: 

राजे तुम्ही परत येऊ नका, आता तुमच्या स्वराज्यात सगळे जण भ्रष्ट आहेत!
बेफिकिरजी,
अनुमोदन !
सत्ता आणि संपत्तीची हाव एकदा निर्माण झाली की पुढे ज्या सामान्य जनतेच्या/शेतकर्‍यांच्या जिवावर आपण मोठे झालो हे देखील माणुस विसरतो.

मग त्यासाठी कोणत्याही रूपातला आय्कॉन आपल्याला चालतो. मग तो मंदिरातला राम असेल, दिल्लीतला कुणी नेता असेल किंवा मातोश्रीच्या आश्रय असेल. आपण स्वतंत्र आहोत, आपल्याला मत आहे, स्वतंत्र मेंदू आणि विचार करण्याची कुवत आहे हेच आपण विसरून गेलोय का? एखाद्याच्या प्रभावाखाली इतकं वाहवत जायचं की त्यात आपल्याला देव दिसावा? भारतीय समाजाचा हाच प्रॉब्लेम आहे. आपण खूप जास्त व्यक्तिपूजा करतो

>>>

कुमार केतकराची व्यक्तीपुजा करतात त्यांच्या बद्दल काय मत आहे Rofl

तिकडे कधीकाळच्या इतिहासातल्या सीतामाईबद्दल काही बोलू नका असं म्हणणारे लोक इथे जित्याजागत्या स्त्रीचा अर्वाच्य भाषेत अपमान करायला कचरत नाहीत.

अहो सीतामाई ती सीतामाई ! ..हिडिंबेला मारताना किंव्वा शुर्पणखेचे नाक कापताना कचरायचे कशाला? Rofl

हा असंबद्ध प्रतिसाद आहे असं वाटत नाही तुम्हाला?

>>> च्यायला हे बरं आहे ..आमच्या श्रध्दा स्थानांविशयी तुम्ही वाटेल ते बोलणार ते आम्ही ऐकुन घ्यायचं अन तुम्हाला तुमची जागा दाखवली की " असंबध" Biggrin

नितीन ,

माझ्या स्वतःच्या गाडीवरही " बघतोस काय मुजरा कर " असे स्टिकर लावलेय ....
महाराजांन्ना मुजरा करायची ज्यांन्ना लाज वाटते त्यांच्याशी बोलण्याचीही इच्छा नाही मला .
.
.

मी तर पैशाला मुजरा करतो. तो मुजरा पैशाच्या मालकाला जाऊन भिडत असल्यास त्यात माझा दोष नाही. ज्यांच्या बद्दल आदर आहे त्याना मात्र नमस्कार करतो. (मुजरा केल्यास त्याना अवघडल्यासारखे होईल Happy )

मला मध्यंतरी एक गृहस्थ म्हणाले की शिवाजी महाराजांकडे फक्त तीन जिल्हे होते, काही विशेष राज्य बिज्य नव्हते.

>>> थोडे अवांतर आहे पण ह्यावर अधिक वाचायला आवडेल... फक्त ३ जिल्हे.. कधीची गोष्ट? १६४६? १६६६? की १६८०?

कारण माझी माहिती थोडे वेगळी आहे...

थोडे अवांतर आहे पण ह्यावर अधिक वाचायला आवडेल... फक्त ३ जिल्हे.. कधीची गोष्ट?>>>>

भटक्या मला पक्के माहीती नाही. रोहन डिटेल्स देवु शकेल. Proud Proud
पण मला वाटते हि माहिती जेव्हा शहाजीराजांनी बाल शिवाजींना दादोजी आणि जिजाऊंच्या सोबत पुनवडी आणि आसपासच्या काही गावांची (जिल्ह्यांची ?) सुभेदारी देवून पुण्यात पाठवले तेव्हाची असावी. त्यानंतर स्वराज्याची महान संकल्पना जिजाऊंनी राजांच्या मनात ठसवली आणि पुढे जे घडले महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात तेजस्वी असे सोनेरी पान ठरले.

नितीनजी नि बघतोस काई मुजरा कर या चित्रपटा बद्धल खूप छान अनुवाद व्यक्त केला आहे. आजची परिस्तिथी खूप हलाखी ची आहे त्यात हा चित्रपट खूप काही नवीन शिकवून जातो.
बघतोस काई मुजरा कर या चित्रपटात शिवछत्रपतींनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी रक्त सांडले. अनेक लढाया आपल्या रयतेसाठी केल्या. त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि काही किल्ले दुश्मनांना रोखण्यासाठी स्वत: उभारले. पण त्याच किल्ल्यांचा विसर आज छत्रपतींच्या रयतेला आणि त्यांच्या नावाने राजकारण करणा-या राजकीय मंडळींना पडला आहे. हे एक उघड सत्य आहे. आपल्या जनतेसाठी ज्या राजाने आपले उभे आयुष्य खर्ची केले त्या राजाचे किल्ले, गड हे आज गळून पडत आहेत, हे किल्ले आज पिकनिक पॉंईट झाले आहे. येथे लोक कचरा करतात, घाण करतात, दारू पितात, किल्ल्यांच्या भींतीवर शेरो शायरी लिहितात. हे लोक कोण असतात? हे तेच असतात जे शिवाजी महाराजांना गळ्यात घालून फिरतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांना हेच लोक कधीही मनात घुसू देत नाहीत. अनेकांना त्यांच्यातील योद्धा दिसतो, पण त्यांच्यातील माणसाकडे दुर्लक्ष केले जाते. खूपकाही या विषयावर लिहिले गेले आहे, बोलले गेले आहे. ‘बघतोस काय मुजरा कर’ हा चित्रपटही आता याच विषयावर भाष्य करतो.

Pages