लोक बिरादरी प्रकल्प - मदतीचे आवाहन

Submitted by prafullashimpi on 6 May, 2011 - 21:29

मायबोलीकरांनो,

अनिकेत आमटे यांनी सर्व कनवाळु लोकांना मदतीचे आवाहन केले आहे.

"
लोक बिरादरी प्रकल्पात बोरवेल करावे लागणार....उन्हाळ्यामुळे पाण्याची भीषण टंचाई जाणवते आहे....एका बोरवेलचा खर्च अंदाजे रु.५० ते रु.५५ हजार इतका येईल...मदत अपेक्षित आहे..."

आमच्या कडे २ विहिरी आहेत. त्यात उन्हाळ्यात अगदी अत्यल्प पाणी साठ होतो. तसेच ६ बोर आहेत. पाणी कमी असल्यामुळे त्यावर hand pump बसवले आहेत. १ बोर आहे त्याला बरे पाणी आहे. त्या मध्ये आम्ही submersible pump टाकला आहे. इकडची जमीन रेताड आहे. पाणी धरून ठेवायची क्षमता या मातीत नाही. पावसाचे पाणी नदीला जाऊन मिळते आणि वाहून जाते. म्हणून एकंदरीत पाऊस खूप पडून सुद्धा पाणी जमिनीत खोल मुरत नाही म्हणून बोरला किंवा विहिरीला चांगले पाणी लागत नाही.

जवळपास हेमलकसा मध्ये रोज १००० लोक पाण्याचा वापर करतात. इतक्या लोकांना पाणी देण्याकरिता तशी सोय करणे आवश्यक आहे. हेमलकसा येथून ३ किलो मीटरवर ३ नद्यांचा संगम आहे. उन्हाळ्यात २ नद्या आटतात. तिथून पाणी आणायचे म्हणजे भला मोठा खर्च आहे. तो आवाक्या बाहेरचा आहे. नविन डेअरी आम्ही सुरु केली आहे. गाई करिता हिरवा चारा लागतो. ३ एकर शेतीसाठी सुद्धा पाणी पुरात नाही. म्हणून बोर करण्याचा आमचा विचार आहे.

पैसे ऑन लाईन कसे पाठवायचे ते वेब साईट वर दिले आहे. सोबत दिलेली लिंक बघावी. http://lokbiradariprakalp.org/contribution.html

क्रुपया होता होईल तेवढी ऐपतीनुसार फुल ना फुलाची पाकळी म्हणुन मदत करून त्यांच्या कार्यात थोडाफार का होईना हातभार लावावा ही नम्र विनंती.

गुलमोहर: 

बँक तपशील द्यायचा राहिला, आता देतोय. वरील दूव्यावर ही ऊपलब्ध आहे.

लोक बिरादरी प्रकल्पासाठी ऑनलाइन मनी ट्रान्सफर (कोर बैंकिंग)
(आवर्ती जमा खाते)
1. आवर्ती जमा खाते (recurring funds account)
* खातेदाराचे नाव : महारोगी सेवा समिती, वरोरा
* बचत खाते क्र. : २०२४४२३८८२३.
* बँकेचे नाव: बैंक ऑफ़ महाराष्ट्र, भाम्रागढ़ शाखा
* IFS कोड MAHB0001108
सर्व देणग्या भारतीय आयकर नियमांच्या भाग ८० G अंतर्गत करात सूट मिलवू शकतात
(हे खाते फ़क्त ५००० रुपये पेक्षा कमी देणगी साठीच आहे)
पावती साठी देणगीदाराचे नाव आणि पत्ता जरुरी आहे
******************************************************************
1. संग्रहीत जमा खाते (corpus funds account)
* खातेदाराचे नाव : महारोगी सेवा समिती, वरोरा
* बचत खाते क्र. : २०२४४२०९९९३.
* बँकेचे नाव: बैंक ऑफ़ महाराष्ट्र, भाम्रागढ़ शाखा
* IFS कोड MAHB0001108
हे खाते प्रकल्पसाठी संग्रहीत देणगी (CORPUS FUNDS) जमा करण्यासाठी आहे. सर्व देणग्या भारतीय आयकर नियमांच्या भाग ३५ AC अंतर्गत करात १००% सूट मिलवू शकतात
(हे खाते ५००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त देणगी साठीच आहे)
पावती साठी देणगीदाराचे नाव, पत्ता आणि PAN नंबर जरुरी आहे

.

धन्यवाद दिनेशजी.

आपण सर्वांनी थोडाफार जरी हातभार लावला, तरी ' बुंद बुंद से सागर बनता है' ह्या उक्तीप्रमाणे भरपूर मदत गोळा होऊ शकते.

मी ही direct transfer केले आहे.

बाहेरच्या देशातुन मदत पाठवण्यासाठी खालील तपशील वापरता येईल.

देशाच्या बाहेरील निधी महारोगी सेवा समितीला स्विफ्ट द्वारे समितीसाठी जमा करण्यासाठी तपशील
लाभार्थींचे नावः
महारोगी सेवा समिती, वरोरा
==>लाभार्थींचे पत्ता :
आनंदवन, तालुका- वरोरा,
जिल्हा- चंद्रपूर.
महाराष्ट्र राज्य (भारत),
पिनकोड :४४२ ९१४.
दूरध्वनी :+९१-७१७६-२८२०३४,२८२४२५.
Fax: +९१-७१७६-२८२०३४
E-mail: lbp@sancharnet.in
aniketamte@gmail.com
लाभार्थींचे बँक खाते क्र.
०४८०१०१००३०१३४३
लाभार्थींचे नावः
महारोगी सेवा समिती, वरोरा
लाभार्थींचे पत्ता:
एम.जी. हाउस, रवींद्रनाथ टागोर मार्ग,
बोर्ड ऑफिस च्या बाजूला,
सिविल लाइन्स,
नागपूर - - ४४० ००१,
महाराष्ट्र राज्य ( भारत ).
दूरध्वनी: +९१ -७१२ -२५५५६४७ / २६०१६९९
लाभार्थींचे बँक स्विफ्ट कोड:
AXISINBB048

महारोगी सेवा समितीला विदेशी देणगी ठराव कायद्याची मंजुरी आहे.
Registration No. ०८३८१०००६

कृपया हे नमूद करा की ही देणगी पुढील नावे आहे . लोक बिरादरी प्रकल्प , हेमलकसा , तालुका : भामरागड , जिल्हा : गडचिरोली - ४४२७१० , महाराष्ट्र राज्य (भारत) , दूरध्वनी +९१ -७१३४ -२२०००१ , भ्रमणध्वनी - ९४२३१२१८०३ / ९४२३२०८८०२. Email: lbp@sancharnet.in aniketamte@gmail.com