रूपक कथा - २

Submitted by zaad on 6 May, 2011 - 15:50

"मला गोष्ट सांग ना.."
स्त्रीहट्टावर वरकडी करणारा प्रेयसीहट्ट झाल्यावर प्रियकरापुढे दुसरा मार्ग उरला नाही. हातातली कवितांची वही बाजूला ठेवून तो गोष्ट सांगू लागला.

एक आटपाट नगर होतं. त्यात एक तरूण राहत होता. एकदा त्याचं त्याच नगरीतल्या एका तरूणीवर मन जडलं. त्याने जाऊन तिला मागणी घातली असता तिने एक अट घातली. 'माझ्याच नजरेत माझे, माझ्या पसंतीला उतरेल असे अन माझ्या विवेकास पटेल असे एकमेवाद्वितीय मूल्य निर्माण करशील तर मी तुझी होईल.' तरूणाने प्रयत्नांची शिकस्त केली. परंतु कधी तरूणीला अत्यंत आवडलेले मूल्य अवाजवी भासे तर कधी पटत असलेले मूल्य अतिशय नापसंत ठरे. युगं लोटली पण तरूणीच्या सर्व नियमांना पूर्ण करेल असं मूल्य काही तरूणाला निर्माण करता आले नाही..आणि अर्थात ती काही त्याची झाली नाही!

"झाली गोष्ट!"

"झाली??आणि पुढे काय झालं? ही काय गोष्ट आहे का???? एक तर कधी नव्हे ते तू गोष्ट सांगतोय म्हणून मी छान तुझ्या खांद्यावर डोकं ठेऊन, डोळे मिटून सैलावून बसले तितक्यात तुझी गोष्ट संपलीसुद्धा. त्यात ती अर्धी तर समजलीच नाही. शिवाय मी इतक्या romantic mood मध्ये असताना असली sad ending ची गोष्ट सांगितलीस. चल आता मीच तुला अट घालते. या कथेचा शेवट.... "

इथे ती हळवी होते. नजरेत काहीतरी खूप खोलवर समजल्याचा भाव येतो. कवितांची वही हातात घेऊन छातीशी घट्ट कवटाळते. त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन, डोळे मिटून आता अधिकच सैलावून बसून राहते. पुढची कित्येक युगं...!

गुलमोहर: 

आवडेश Happy

वाचुन अगदी पाणी आलं डोळ्यात.
अस वाटतेय कि ती हट्टी तरुणी मीच आहे.......................

पु.ले.शु.

खर सांगायच तर मी हि कथा वाचल्यावर लगेच माझ्य नवर्‍याला फोन केला आणि त्यांना सांगितली.
अगदी असाच हट्ट आहे माझा आताही.
आमच जेव्हा गुपचुप प्रेम प्रकरण चालु होत तेव्हा मी रोझ संध्याकाळी आम्ही भेटायचो. अशिच एखादी गोष्ट त्याने मला सांगावी असा माझा अट्टहास असायचा. कितीही तास जरी त्याला भेटलो, बोललो, दिवस भर त्याच्या सोबत जरी राहीले तरी रोझ रात्री घरी जाताना मी त्याच्या कडुन हेच वचन घेउन निघायचे कि "उद्या भेटणार ना?"

आज नात्याने, मनाने, सगळ्या बाबतीत त्याचीच झाली आहे. आम्ही एकत्रच राह्तो. तरी अजुनही मला रोझ सकाळी तो कामाला जाताना वाटत कि त्याने मला सोडुन जाउच नये. माझ्या जवळ्च बसाव बोलत राहाव............ तो रहतो हि कधी कधी मी हट्ट केल्यावर घरी पण तरीही अस वाटत कि कधी कधी रोझ यावा...................
वेडी आहे ना मी ?
अगदि FILMY.........?