.

Submitted by क्ष... on 5 May, 2011 - 00:24
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो... आवडते मला ही पण भाजी! चिवळच्या भाजीची पाने बारीक असतात हाच काय तो फरक!
कधी ही भाजी आंबटसर लागते...अगदी बरोबर!
चिवळच्या भाजीचे आमच्याकडे फुनके/मुटकुळे करतात. Happy

आमच्या तिकडे फार पॉप्युलर, पण वेगळ्या पद्धतीने करतात.
मुळ्याच्या फोडी, कैरीच्या फोडी टाकुन तुरीच्या डाळीच्या वरणातील पातळभाजी. आंबटगोड चव असते.

मुलींनो, तुमच्या सगळ्यांच्या रेसिपीज पण इथे डिटेलमधे लिहा. मला इथे घोळीची भाजी नेहेमी फार्मर्स मार्केट्मधे मिळते.

घोळीची भाजी आम्ही दोन प्रकारे करतो
एक वाटी तुरदाळ (डाळभाजी)
एक पाव घोळ
लसुण,बारिक चिरलेला कांदा,एक टोमॅटो,दोन मिरच्या आणी शेंगदाणे

कृती
वरिल सगळे साहित्य एकत्र करुन शिजवुन घेणे
फोड्णी साठी, तेल, मोहरी, हिंग घालुन फोडणी घालणे..
दुसरा प्रकार असाच फक्त तुरदाळ ऐवजी बेस्न घालुन करतो.. छान लागते Happy

आमच्याकडे ही अशिच उगवलेली असते. पण कमी प्रमाणात असल्यामुळे मला त्याची भाजी करायला नाही मिळत.
रेसिपी छान.

मिनोती, घोळेच्या भाजीलाच गरगट्याची भाजीही म्हणतात ना?

विकीच्या दुव्याबद्दल धन्यवाद. बर्‍याच जणांना ठाऊकही नसलेली भाजी विकीपिडीयावर अशी बैजवार मिळाल्यावर मस्तच वाटले.

विदर्भात पण वरणातली करतात >>>>> मला वाटले बी आला डु आय घेऊन की काय! Happy

मी केव्हातरी सिझनल भाज्या या प्रकारात लिहिली होति

शेतात तण म्हणुनच उगवलेले असते तेच शेतकरी काढून आणून भाजी करतो.

अरेच्च्या, असे दिसणारे तण माझ्या कुंडीत कितीतरी वेळा येते, मी उपटुन टाकते. हीच घोळीची भाजी हे माहितच नव्हते. (इथे फोटो टाकायला हवा नक्की घोळच का ते समजायला)

मुंबईला याच भाजीला रव असा पण शब्द वापरताना ऐकला आहे
आमच्या गावी परसामध्ये बहुतेक वेळा पालेभाज्या लावतात. दोन्-चार पाने जमिनीतुन उगवुन आली की ती मुळासकट काढतात नी त्याची भाजी करतात (मुळासकटच). ही दोन-चार पाने असलेली भाजी असते त्याला रव म्हणतात. मग ती कुठलीही असु शकते. मी गावी मोस्टली लाल माठाचा रव पाहिलाय.

मुंबईला याच भाजीला रव असा पण शब्द वापरताना ऐकला आहे.>
हो साधना. लाल मठाच्या छोट्या भालीला रव (रोव) म्हणतात. मसुरच्या आमटीत घालुनही मस्त लागतो हा लाल भाजीचा रोव. सावंतवाडीला भरपुर मिळायचा. इथे मुंबइत कधिच दिसला नाही. Sad

चिवेची भाजी अगदी वेगळी दिसत नाही त्यामुळे गफलत होणे सहाजीक आहे.

चिवेचा फोटो आहे, रेसिपी टाकेन तेव्हा तिकडे डकवेन.