मासे २७) वडा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 May, 2011 - 03:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वडा हा मासा ओळखायला एकदम सोप्पा. जास्त करुन हा मासा खाडीच्या भागात मिळतो. पापलेट्-हलव्याचा आकार लाभलेला पण अंगावर काळे ठिपके असलेला मासा म्हणजे वडा.

नेहमीप्रमाणेच वड्याच्या तुकड्या करुन घ्या. कालवण आणि फ्राय दोन्ही करायचे असल्यास डोके, शेपुट हा भाग कालवणासाठी घ्यावा व मधल्या तुकड्या तळण्यासाठी वापराव्यात.

बाकीचे नेहमीचेच साहित्य म्हणजे कालवणासाठी - '
हिंग, हळद, मसाला,
आले, लसुण, मिरची कोथिंबीर, ओल खोबर वाटण
चिंचेचा कोळ
मिठ,
ठेचलेल्या ५-६ लसुण पाकळ्या
तेल.

तळण्यासाठी
हिंग, हळद, मसाला, मिठ, तेल

क्रमवार पाककृती: 

कालवणः
भांड्यात तेल मस्त तापवा. त्यात सुर्रकन लसणाची घमघमीत फोडणी द्या. त्यावर पटापट हिंग, हळद मसाला टाका. लगेच वाटण, चिंचेचा कोळ व तुकड्या टाका, गरजेपुरते पाणी घाला, मिठ टाका. ५ ते ७ मिनिटे उकळवुन गॅस बंद करा झाले कालवण.

तळण्यासाठी :
तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद लावुन थोडा वेळ मुरवा.

तवा गरम करुन तेल सोडून त्यावर तुकड्या मस्त खरपुस शॅलो फ्राय करा. वास येतोय का ?

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी.
अधिक टिपा: 

वाटण हे ऑप्शनल आहे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्स्स्स्स्स्स्स्स......... स्लर्प!!!!!!!!!
बापरे आता पुन्हा जावं लागेल आज मासे आणायला.. हे आमच्याइथे मिळतात Happy
रस्सा तर टॉप च आहे

चवीला कसा असतो गं हा? मी कदाचित बघितला असेल मार्केटमध्ये पण आता आठवत नाहीय.

काही मासे चवीला एकदम फालतु लागतात. एकदा सुरमईसारखा दिसणारा, तशाच आकाराचा पण जरासा फुगीर शिवाय प्रचंड स्वस्त असा मासा मी घेतला. त्याचे मांस लाल होते (बहुतेक मासे पांढरे असतात). कोळणीने त्याचे नाव उपा की असेच काहीतरी सांगितले आणि वर तुम्ही हा मासा खाता म्हणुन आश्चर्य व्यक्त केले. मी तेव्हाच सावध व्हायला पाहिजे होते पण त्या दिवशी पैसे वाया जाणे नशिबी लिहिलेले. मासा घरी आणुन तळला आणि पहिला घास तोंडात घालताच फेकुन दिला. मी सहसा अन्न फेकत नाही, अगदी चवहीन असले तरी खाते. पण हा मासा अजिबातच खायच्या लायकीचा नव्हता. तसे बेचव मासे नंतरही घेतले गेले माझ्याकडुन पण मी ते खाऊ शकले. तो मासा मात्र खाताच येईना.

तेव्हापासुन अनोळखी मासे आणायला जीवावर येते. मार्केटमध्ये जागुचे फोटो (म्हणजे तिच्या माशांचे...) आठवुन, कोळणीला नाव चारचारदा विचारुन मगच घेते.

हा मासा बघितलाय मी.
जागू या रेसिपीज माहेरच्या कि सासरच्या ? कोकणात खोबर्‍याशिवाय कालवण हि कल्पनाच सहन होणार नाही. त्या वाटणावरुनच नावे, सुके, लिपते, दबदबीत, कालवण वगैरे.

कोकणात खोबर्‍याशिवाय कालवण हि कल्पनाच सहन होणार नाही
जागुच्या माशाच्या आमटीच्या रेसिपी आमच्याकडे एकदम बाद. कोणीही खाणार नाही. Happy आताच्या गावभेटीच्या सहा दिवसात तिन दिवस मासे खाल्ले. माशाची आमटी तर.. आहाहा.. मस्त गंधासारख्या वाटलेल्या ओल्या खोब-याच्या त्या आमट्या.. भुक लागली लोकहो.. असल्या आठवणी नको.

तळलेले खायला मात्र सगळे धावतील माझ्यासकट.

कोकणात खोबर्‍याशिवाय कालवण हि कल्पनाच सहन होणार नाही

बरोबर. कित्येक वर्ष माझं मत होतं की कांदा आणी नारळाशिवाय स्वयंपाक होवुच शकत नाही.

दिनेशदा, साधना.
माझ्या रश्यात खोबर असतच. पण आमच्या इथली जी गावे आहेत त्या गावांमध्ये बिनखोबर्‍याची कालवणे करतात. साधना एकदा खाउन बघा माश्याची खरी चव ह्या बिनवाटणाच्या रश्याला येते.
आत्त्ता मला कळल ही चर्चा तुम्ही का करताय ते. मी वरती वाटणात खोबर लिहायला विसरलेय. मला पुरवण्यासाठीतरी खोबर घालावच लागत.

अश्वे तुला कुठे ग मुंडावळ्या दिसल्या ?

जागु, Happy
हा मासा एकदम गुबगुबित पण दिसतोय.. Happy
कुठुन शोधुन काढतेस इतके माश्यांचे प्रकार? तु माश्यांच्या पाकृ चा क्लास उघड.
मी क्लासला नक्की येईन.. आनंदाने...
खात नाही, पण करायला शिकायला काय प्रॉब्लेम आहे?

>>.खात नाही, पण करायला शिकायला काय प्रॉब्लेम आहे?>>> दक्षे तुझ्यातलो ह्यो आमूलाग्र बदल बघून मन भरुन ईला Proud

जागु सगळी शाकारी आवर्जून तुझ्या बाफ ला भेट देतात.. तो दिवस दूर नाही....... Proud

बरं जागु तुझ्या घरी गटग करुया म्हणतोय Happy

साधना एकदा खाउन बघा माश्याची खरी चव ह्या बिनवाटणाच्या रश्याला येते.

येते येते बाई. मी तुझ्या कृतीनेही केलेय कालवण... Happy अर्थात तुझ्या हातची चव येणार नाही पण तरी....

अश्विनी - इश गोवा म्हणजे त्याना आजोळी गेल्यासारख वाटेल. फॉरेनची पाठव.

नीलु - कधी करायचा ती तारिख तुम्ही ठरवा आणि मला कळवा.

भांड्यात तेल मस्त तापवा. त्यात सुर्रकन लसणाची घमघमीत फोडणी द्या. >>>अहाहहाह...! काय फोडणी दरवळीली इथ प्रर्यंत.

तवा गरम करुन तेल सोडून त्यावर तुकड्या मस्त खरपुस शॅलो फ्राय करा. वास येतोय का ?
>> ।नको जागु माते अंत असा पाहु.।

तो शेवटचा प्रचि :3D%20Smiles%20(46).gif

अत्ता लगेच मेस गाठतो, पण अशी चव असेल का..?

जागू, नाही मला नाही वाटलं कि खोबरे लिहायला विसरलीस असे. पण उत्तर कोकणात तसाही खोबर्‍याचा वापर कमीच असतो. कोकणात, नवी सून नारळ खोवते कसा आणि किती बारिक वाटते, यावर तिचा सुगरणपणा ठरतो.
डावीकडच्या माश्याचा चेहरा, गांधीजींसारखा वाटतोय का ?

मला तर दोघेही जागुकडे पाहताहेत अणि मनात 'मै तवे पे फ्राय होगा के वाटण मे उकळेगा?' असा विचार करताहेत असे वाटतेय..

जागू, हा स्कॅट, खाडीत मिळतो बहुधा. पाण्यातले मीठाचे प्रमाण कमी करत करत हळूहळू गोड्या पाण्यात सेट करता येतो.

हा टॅन्कमध्ये पाळता येउ शकतो Happy

बाबु, तू पाळ तुझ्या टँकात आणि मोठे झाले की मग गट(म्म)ग करु आपण! Happy

साधना, "तो" मासा मी पाहिलाय. माझ्यामते ओरीसा भागातले लोकं खातात तो.

डावीकडच्या माश्याचा चेहरा, गांधीजींसारखा वाटतोय का ?
चश्मा लावुन खात्री करावी लागेल.

'मै तवे पे फ्राय होगा के वाटण मे उकळेगा? Lol

बागुलबुवा प्रयोग करुन बघ.

चातक मग घरी आणुन कर. रेसिपी वर आहेच.

वाडाचे कोळणिंनी वडा केल असेल. पण आमच्याइथे वडाच म्हणतात.

हक्काचे किचन नाही ? मग हक्क दाखवणारी आली की हक्काने करुन माग.

साधना.. आपल्याकडे त्याला 'बुगडी' म्हणतात बहुतेक.. कापल्यावर लालभडक दिसतो म्हणून खात नाहीत बहुतेक लोक.. Happy

जागुडे, कसली ग एकेक वर्णनं टाकतेस? इथे जीव हुळहुळतो.

डावीकडच्या माश्याचा चेहरा, गांधीजींसारखा वाटतोय का ? >>> हे काय दिनेशदा? Rofl Rofl Rofl

Pages