पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे धन्यवाद. पुढच्यावेळेससाठी लक्षात ठेवेन. आभारी आहे खरंच.
दाणे अगदी जेमतेम १.५ वाटी निघाले. ते मुलीने खाऊन टाकले. Happy

काल चेंबुरच्या भाजी बाजारात फिरताना एक कंद पहायला मिळाले. अळकुड्या (अरवी/ अरबी) सारखे दिसणारे पण आकाराने लहान. नाव विचारल्यावर कळले की त्याला कूर्का म्हणतात. भाजी विकत घ्यायला आलेल्या एका काकांनी सांगितले की केरळमध्ये अतिशय लोकप्रिय आहे हा कंद.
मराठीत काय म्हणतात याला? महाराष्ट्रात खाल्ला जातो का?

मला चांगला चहा कसा करायचा ते कुणी सांगेल का? मी सगळ्या प्रकारनी ट्राय केला पण काही केल्या जमत नाही. मी एका कपाला २ ते २/१२ चमचे साखर (ईथली साखर कमी गोड असते म्हणुन) आणी १ चमचा चहा कधी कधी दिड चमचा चहा पावडर घालते.दुधही होल मिल्क, २%, स्कीम मिल्क, हाफ अ‍ॅड हाफ सगळे ट्राय केल आहे पण काही केल्या नीट चहा होत नाही. मला खुप गोड नको आहे पण साखर/चहा कमी घातला तर खुपच पाण्चंट लागतो चहा आणि खुप strong ही नको आहे. मला कुणाला काही टिप्स माहीती असतील तर ईथे टाकाव्यात...कंटाळा आला बेक्कार चहा पिऊन... रच्याकने, मी ब्रूक बॉण्ड रेड लेबल. वाघ बकरी ई चहाचे ब्रॅड ट्राय केले आहेत...

अमि खूप वर्षापूर्वी, चेंबूरच्याच एका मित्राकडे खाल्ल्याचे आठवतेय. साधारण बटाट्यासारखाच लागला.
जर तोच प्रकार असेल तर त्याला चायनीज ट्रफल पण म्हणतात. खरे ट्रफल खूप महाग असतात कारण ते जमिनीखाली तयार होतात आणि ते शोधण्यासाठी खास प्रशिक्षित कुत्र्यांची मदत घ्यावी लागते. अर्थात किमतीला पण ते लई भारी असतात.
त्या मानाने हे फारच मुबलक पिकतात, हे सोलणे जरा त्रासाचे असते, पण सोलून मीठ घातलेल्या पाण्यात अर्धवट उकडून, भाजी वगैरे करता येते.

झी चहावर इथे खूप चर्चा झाली होती. जून्या मयबोलीवर असेल अजून.

कूर्काची बटाट्यासारखीच चव असते व लागते. आमच्याकडे बर्‍याच्वेळा असायची मुंबईत कारण केरळी शेजार.

नुसती हिरवी मिरची, आले, कडीपत्ता व उडीद डाळ अशी भजी केली तर मस्त लागते.

कूर्काची बटाट्यासारखीच चव असते व लागते. आमच्याकडे बर्‍याच्वेळा असायची मुंबईत कारण केरळी शेजार.

नुसती हिरवी मिरची, आले, कडीपत्ता व उडीद डाळ अशी भजी केली तर मस्त लागते.

धन्यवाद दिनेशदा, मनस्विनी.
ते माहिती देणारे आजोबा माझ्यावर नाराज झाले...मी कूर्का घेतले नाहीत म्हणून. त्यांची आवडती भाजी असावी. Happy
पुढच्या वेळी नक्की घेऊन येईन.

\चहा ची क्रुती माझ्या अंदाजाने
जितके कप चहा त्यापेक्षा एक कप कमी इतके पाणी गरम करावे. कपास साधारण दीड चमचा साखर घालावी. उकळी आल्यावर कपास एक चमचा इतका चहा घालावा. ( रेड लेबल) व उकळी येऊन द्यावी. मग गॅस बंद करून झाकण ठेवावे. दरम्यान दुसृया गॅस वर एक कप दूध गरम करून घ्यावे. आता चहा गाळावा. व त्यात हवे तितके दूध घालावे व लगेच सर्व करावे. फार उकळल्यास चहा कडू लागतो. कमी उकळल्यास फिका पड्तो. दूध जास्त घातल्यास मजा जाते. साखर जास्त घातल्यास गोड मिट्ट. सर्व पदार्थ परफेक्ट पड्ले पाहिजेत. यात वैयक्तिक प्रेफरन्सेस आलेच. चहा बरोबर बिस्किटे, गोड/ खारी/ अगोड आली पाहिजेत. म्हणजे ग्रुहिणीचे आतिथ्य दिसते. परवा पुण्यात मला चहा बरोबर खारी हवी का असे विचारले गेले तेव्हा मला लै हसू आले. हिंदुस्थानच्या खारीसाठी जीव टाकतो आपण नाही का.

हे रेसिपी सदरात हलविण्याइतके नाही म्हणून इथेच लिहीले आहे.

अमा, लै भारी लिवली की च्या ची कृती तुम्ही! Happy

झी, मला अमृततुल्य मध्ये मिळणारा, पण कमी गोड \चहा आवडतो. त्यासाठी मी निम्मे पाणी निम्मे दूध एकत्र उकळते. त्यात एका कपासाठी अर्धा चमचा चहा पावडर, अर्धा ते एक चमचा साखर, किसलेले आले, वेलदोडा टाकते. उकळी आल्यावर दोनदा - तीनदा भुस्सदिशी वर येऊ देते. सध्याच्या थंडीच्या मौसमात त्यात थोडा गवतीचहा ही कातरून टाकते. लगेच गाळते. मुरू वगैरे काही देत नाही.
प्रत्येकाची चहाची टेस्ट वेगळी असते. वरच्या पध्दतीने केलेला चहा अमृततुल्यच्या जवळपास कोठेतरी जातो म्हणून आवडतो मला.

बाकी खेडेगावांत डायरेक्ट दुधातच चहा करायची पध्दत आहे. अनेक बॅचलर्सही असाच चहा करताना पाहिलेत.

हि माझी विचित्र पद्धत. केनयातले दूध अति दाट आणि भरपूर मलाई असलेले असते.
ते रात्री तापवून निवले, कि सगळी साय काढून टाकायची, आणि त्यातले कपभर दुध
भांड्यात ठेवायचे (बाकिच्याचे विरजण लावायचे) आणि रात्रीच त्यात चहाची पावडर
टाकायची.

रात्रभर ती पावडर दूधात मूरते. सकाळी फक्त ते दूध गरम करायचे. वर आले कि
चहा तयार.मी साखर खात नसल्याने, मला ती वर्ज्य.

रच्याकने, भारतात जो चहा मिळतो त्यात जवळजवळ ३० टक्के भेसळ असते.
(मागणीच्या मानाने चहाच्या लागवडीखालचे क्षेत्र वाढलेले नाही.) त्यामूळे अस्सल
चहा आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचाच आहे आता.

दिनेश, अ मा, अ.कु, तिघांनाही खुप खुप धन्यवाद!! मी जुन्या मा.बो. वर जाऊन सर्व वाचले. आता तुमच्या कृतीप्रमाणेही करुन पाहाते. खुप कंटाळा आला आहे गोड, पांचट, फिक्का चहा प्यायचा.
अकु, मलासुद्धा अमृततुल्यचा चहा आवडेल पण मी तेवढ्या high expectations ठेवल्या नाहीत फक्त ठीक ठीक चहा मिळावा हीच ईछा !! भारतात असतांना माझा चहा बरा व्हायचा ईथे आल्यापासुन चहाचे गणित काही केल्या जमले नाही. धन्यवाद परत एकदा!!

माझी चहाची पध्दत : एका कप पाणी चांगले उकळू द्यावे (उकळताना थोडे कमी होतेच, म्हणून एक कप पूर्ण घेतले तरी चालते). मस्तपैकी उकळले की, भांडे गॅसवरून उतरवून त्यात एक चमचा+थोडी जास्त अशी चहाची पावडर घालावी. लगेच झाकून ठेवावे. पाचेक मिनिटांनी चहा खाली बसतो. मग वरचा चहा गाळून घ्यावा आणि त्यात गरम दूध, साखर घालावी. चहापावडर घालून न उकळल्यामुळे या प्रकारे केलेल्या चहाला चहाचा खुप छान स्चाद आणि सुगंध येतो. मला सोसायटी टी आवडतो.

मी एकदा पाण्यात थोडी चहा पावडर टाकून रात्रभर मुरू दिली व दुसर्‍या दिवशी सकाळी ते पाणी उकळले. पण अतिशय कडू कडू झाला होता तो चहा. पुन्हा असे धाडस केले नाही.

नाही रिमा, माझा तरी नासत नाही.
इथे चहाचे मळे आहेत, त्यामुळे अगदी पिवर चहा मिळतो.
पण असे भिजवल्यावर जास्त उकळायची गरज नसते, दुध वर आली कि झाले.
वरती मामीनी लिहिली आहे ती खरी ब्रिटिश पद्धत. केटलमधे चहा असाच करतात.
(आता जपानी टी सेरेमनी वर एक सचित्र लेख आला पाहिजे, तमाम जपानवासी मायबोलीकरांनो... )

हो मामीचा चहा तो ताज महाल वगैरे चा नाहीतर दार्जिलिंग/ असाम/ माकाइ बाडी ऑरेंज पिको. मी हाटेलात राहिले की तिथे \चा करून पिणे मला खूप आवडते. अगदी पहाटे \चा पिते मी. बरोबर मारी नैतर खारी.
दिनेश ते तसले दूध म्हणजे हाय कोलेस्टेरॉल असेल काय? नाहीतर शुगर नॉर्मल अन कोलेस्टेरॉल हाय व्हायचे
सध्या आरोग्यशास्त्रज्ञाचे पुस्तक वाचत आहे त्याचा परिणाम.

मी परवा मॉल मधुन लाल व पिवळ्या भोपळी मिरच्या आणल्या आहेत. त्याच काय करु ?
दिनेशदा तुम्ही लिहीलेली रताळ घालून केलेली पाकृ पाहीली. अजुन काय करता येईल ?

जागु, लाल भोपळा नि लाल पिवळ्या भोपळी मिर्च्या समप्रमाणात घेऊन सूप करता येईल. मस्त केशरी रंगाचे दाट "सनराईज सूप" तयार होते Happy आमच्याकडे सगळ्यांना फार आवडते हे सूप. रेसिपी हवी असेल तर टाकेन.

मी लापशीचा रवा आणलाय, (निदान पाकिटावर तरी तसं लिहिलय). हा रवा सांज्या सारखा दिसतोय. याचा शिरा कसा करायचा? कारण पाकिटावर असं लिहिलय की शिरा करता येतो.

रंगासेठ, नेहमीच्या शिऱ्‍यासारखाच पण गूळाचा केला तर मस्त खमंग लागतो. पाणी आणि तूप नेहमीच्या रव्यापेक्षा जास्त लागतं.

कच्च्या पपईची भाजी कशी करतात?....भाजीव्यतिरिक्त अजून काय करतात आणि कसं? कृपया कोणीतरी लिहा/लिंक द्या.

मिती, कच्च्या पपईचे अनेक प्रकार आहेत इथे. थाई पद्धतीचे सलाद, गुजराथी पद्धतीचे काप, मारवाडी पद्धतीचे लोणचे, साधी बटाट्यासारखी भाजी वगैरे अनेक प्रकार करता येतात.

मंजूडी, धन्यवाद. एक वाटी लापशीचा रवा घेतल्यास पाणी आणि तूप किती प्रमाणात घ्यावे आणि गूळ तर नाहीये सध्या तर साखर किती प्रमाणात घ्यावी??

Pages