पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तरी दूध घालत नाही. आणि म्हणूनच पूर्ण पिकलेली सिताफळं घ्यायची की ज्याचा गर बीपासून सहज वेगळा होतो.

साधना सकाळिच काय सिताफळ खातेस ? मी मस्त वाकटी फ्राय खाउन आले.

मी डायटचा भारी विचार करते बाई. सकाळी सकाळी फ्राय खायचा विचार जरी मनात आला तरी महापाप. Proud

अगं रविवारी मार्केटात गेलेले. भरपुर वाकट्या होत्या, पण मी माझ्यासाठी घ्यायला गेले नव्हते ना, एकाने खास फर्माईश केलेली मासे करुन द्यायची म्हणुन मग वाकट्या घेतल्या नाहीत. ... मार्केट माशांनी इतके मस्त भरलेले ना.. आहाहा बरे वाटले. मी बांगडे घेतले, खाण्या-यांना तळुन दिले आणि मी मात्र वाफवुन खाल्ले Proud

सिताफळ रबडीसाठी दुध अन सिताफळाच्या गराचं किंवा रबडी आणि गराचं प्रमाण काय घ्यावं?

ओके. Happy वाटीभर गर निघालाय आणि दिड-दोन लिटर दुध असेल. मला वाट्लं गर कमी पडेल की काय म्हणून विचारलं. Happy

रोचीन Lol

अल्पना, बिया पण क्रश झाल्या का?
एखादं सिताफळ शिल्लक असेल आणि पेशन्स असतील तर त्याच्या गरातल्या बिया हाताने वेगळ्या कर आणि सिताफळाचे ते फ्लेक्स आटवलेल्या दुधात घाल. खाताना ते फ्लेक्स मधे मधे तोंडात येतील, मस्त लागतात.

हो... पण रबडी खूप घट्ट असते. बासुंदीच्या पुढची स्टेप म्हणजे रबडी आणि आधीची स्टेप म्हणजे दूधपाक Happy

नाय नाय बिया नाय झाल्या क्रश. एक आहे अजून सिताफळ, लेकाला खायचंय म्हणून ठेवल. त्यातलेच थोडे फ्लेक्स घेते. Happy
आता हा दूधपाक काय प्रकार असतो? मसाला दूधासारखं थोडंसं आटवलेलं दूध का?

>>दूधपाक म्हणजे पाणचट बासुंदी
अगदी, अजिबात घशाखालि उतरत नाही!!!! मला बाई घट्ट खानदेशी बासुंदीच आवडते.

वाडीची बासुंदी......!!! :तोंडाला पाणी सुटलेली बाहुली:

दुकानात "दगडी पोहे" दिसले. कशासाठी वापरतात विचारले तर दुकाणदार म्हणे लक्ष्मीनारायण चिवडा करण्यासाठी.. कुणाला रेसिपी माहित आहे का ? Uhoh

कुणाला आक्खा साबुदाणा तळून त्याचा चिवडा कसा करायचा ते माहीत आहे का?? असेल तर क्रमवार क्रुती टाका प्लिज!!

रोचीन, वर ती लिंक दिलीय त्यात किंवा जुन्या हितगुजवर उपासाचे पदार्थमध्ये त्या चिवड्याची कृती मिळेल तुला..

ताक केल्या केल्या जरा गोडसर असेल तर त्याचा कशा कशा साठी उपयोग करता येईल???
कढी, उकड, ताकातली पालकाची भाजी इ. साठी आंबट ताक लागते. त्यामुळे लोणी काढल्या काढल्या ताक गोड असल्यास ते जरा आंबट होईस्तोवर थोडे दिवस थांबावे लागते. नुस्ते पिऊनही बरेच उरते. म्हणून गोड ताकाचे काही करता येईल का हे जाणून घ्यायचे आहे. मठ्ठा करता येईल का? कसा करतात ??

गोड ताकाची सोलकढी चांगली होते. नारळाच्या दूधाऐवजी ताक वापरायचे.
मठ्ठा इथे बर्‍याच जणांनी लिहिला होता.

साबुदाण्याची ताकातली लापशी करता येईल. >>> साबुची लापशी मी तरी फक्त पोट बिघडले की खायची म्हणूनच ऐकली आहे Wink

रवा डोशाचा ऑप्शन छान आहे. Happy
धन्स, मंजूडी

सोलकढी ताकात पण बनवता येते का?? नवीन माहिती आहे हि माझ्यासाठी. करून बघेन आता Happy
धन्स, दिनेशदा...

मठ्ठ्याची लिंक कुणी देऊ शकेल का?? मला तरी पाकृ विभागात सापडत नाहीये आणि जुन्या मायबोली वर शोधता येत नाही मला Sad

Pages