इंडोचाइन रेस्टॉरंट, एशियन सिव्हिलायझेशन म्यूझियम, सिंगापूर

Submitted by संकल्प द्रविड on 6 July, 2008 - 12:49

इ.स. १८१९ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सिंगापुराच्या भूमीवर पाय रोवून उभं करणार्‍या स्टॅम्फर्ड रॅफल्साच्या 'रॅफल्स प्लेस' भागातल्या पुतळ्याजवळ एक संग्रहालय आहे. 'एशियन सिव्हिलायझेशन म्यूझियम' असं त्याचं नाव. त्या संग्रहालयाच्या नदीतीराच्या बाजूला 'इंडोचाइन' नावाचं एक रेस्टॉरंट आहे. सिंगापूर नदीतीरावरून कॅवेना पुलाकडे चालत जाणार्‍या प्रवाशांना थांबून फोटोबंद कराविशी वाटणारी, जुन्या सिंगापुराची कहाणी कथणारी छान धातुशिल्पं याच रेस्टॉरंटाच्या कुशीत आहेत. संग्रहालयाच्या ब्रिटिश धाटणीच्या इमारतीचं सौंदर्य, कडेने लावलेल्या बगीच्यातली विषुववृत्तीय सदाबहार झुडपं, बाजूने वाहणारी सिंगापूर नदी आणि बोट कीचा रिव्हरसाइड हॉटेलांनी गजबजलेला पैलतीर असा सगळा छान नजारा इथून पाहता येतो. त्या हॉटेलाचा हा एक निवांत कोपरा:

इंडोचाइन रेस्टॉरंट, एशियन सिव्हिलायझेशन म्यूझियम, सिंगापूर
माध्यमः पेन

20080706__AsianCivilisationMuseum_1.jpg

गुलमोहर: 

रेखांकन चांगले जमलयं. पेन या माध्यमाचे लिमीटेशन म्हणजे सगळे स्ट्रोक्स येकाच ताकदीचे येतात आणि त्यामुळे चित्रात छाया प्रकाशाचे भेद व्यवस्थीत येत नाहीत. IMHO हे चित्र Hatching ,Crosshatching ,Stippling ,Scumbling (झाडाच्या पालवीसाठी) सारखी टेक्नीक वापरुन आणखी सुंदर बनवता आले असते. अर्थात अशा बीझी स्पॉटवर कमीवेळात इतक सगळं करणं हे कठीणच.

फ दादा, एकदम सहीच...
==================
डिंग डाँग डिंग

फ.... एकदम मस्त...
खुप मस्त अठवणी जाग्या झाल्या...
ह्या हॉटेलच्या बाहेर बसुन समोरचा व्हु रेखाटायचा प्रयत्न केला होता...
बरेचदा नुसतेच जावुन धमाल केली आहे इथे....

मस्त रे फ. चांगला उद्योग आहे. Happy

हे पेनने काढलंय ह्यावर विश्वासच बसत नाहीये ..

अतिशय सुंदर ..!

सुंदर रेखांकन, हि वास्तू लक्षात आहे माझ्या. गोव्यात पण अश्या चित्रकाराला आव्हान देतील अश्या अनेक वास्तू आहेत.

अगदी अप्रतिम Happy

सुपर्ब !!!

-प्रिन्सेस...

मस्तच रे......डीटेलींग जबरी आहे Happy

मस्त आहे. बारकावे मस्त उतरलेत.

    ***
    comfortably numb